मराठी प्रश्नपत्रिका (Marathi Question Papers July 2022) Class 5 Scholarship Exam Maharashtra with answers
नमस्कार ! 31 जुलै 2022 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता 5 वी पेपर 1 - मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका
खाली संभाव्य उत्तरे दिली आहेत (अजून 2 ऑगस्ट अखेर उत्तर तालिका (answer key) आलेली नाही)
प्र. 1 ते 3 साठी सूचना : उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
खेडीपाडी आनंदात होती. भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या. सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते. प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते. अंगणामधली तुळशीवृंदावने मंजिर्यांनी डवरून डोलत होती. ओसार्यांवरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते. दुष्काळ ठाऊकच नव्हता. गोठ्यांत गाईवासरांची दाटी होती. सांजसकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते. गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या. कुणाचीही लक्ष्मी सोन्यामोत्यावाचून रिती नव्हती. पोरेबाळे, लेकीसुना, शेतभाते, गुरेवासरे, पशुपक्षी आनंदात होते. झाडे झुडपे सुद्धा! महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती.
प्र1) खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते?
अ) नद्या सुप्रसन्न वाहत होत्या
ब) दुष्काळ ठाऊकच नव्हता
क) गोठ्यात गाईवासरांची दाटी होती
ड) महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती
(1) फक्त अ बरोबर
(2) फक्त ब व क बरोबर
(3) अ, ब, क, ड बरोबर
(4) फक्त ड बरोबर
संभाव्य उत्तर : (3) अ, ब, क, ड बरोबर
प्र2) उतार्यात किती जोडशब्द आले आहेत?
(1) दहा
(2) बारा
(3) अकरा
(4) नऊ
संभाव्य उत्तर : (3) अकरा
प्र3) 'गोग्रास' या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता?
(1) गाय गवत खाते
(2) गाय गवताचा घास घेते
(3) गाईला गोमाता म्हणतात
(4) गाईला घातलेला घास
संभाव्य उत्तर : (4) गाईला घातलेला घास
प्र. 4 ते 6 साठी सूचना : कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
प्र4) या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे?
(1) मित्रांसंगे खेळण्याचे
(2) गवतफुलाचे
(3) गवताचे
(4) वारा आणि झोपाळा यांचे
संभाव्य उत्तर : (2) गवतफुलाचे
प्र5) कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची वरोबर जोडी कोणती?
(1) लाल पाकळी
(2) निळे पराग
(3) इवली पाती
(4) काळी रात्र
संभाव्य उत्तर : (1) लाल पाकळी
प्र6) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
(1) गवतफुला तुला पाहून मी हरखून गेलो
(2) तुझे रंग पाहताना भान हरपून गेले
(3) शाळा, घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे
(4) मी तुला अंगाईचे गीत गावे
संभाव्य उत्तर : (4) मी तुला अंगाईचे गीत गावे
प्र7) खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत?
ती त्याला म्हणाली, "मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो."
(1) पाच
(2) सहा
(3) चार
(4) सात
संभाव्य उत्तर : (2) सहा
प्र8) वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा
घडा, सडा, खडा, ....
(1) घोडा
(2) कडे
(3) झाडा
(4) माड
संभाव्य उत्तर : (1) घोडा
प्र9) खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते?
(1) मधुरा पाणी पिते
(2) माझे जेवण झाले
(3) मी चांगले भाषण करेन
(4) तो गावाला गेला होता
संभाव्य उत्तर : (3) मी चांगले भाषण करेन
प्र10) योग्य विधेय वापरुन वाक्य पूर्ण करा
जयश्रीने .........
(1) अक्षर सुंदर आहे
(2) मैदानावर गेली
(3) इकडे ये
(4) छान कविता केली
संभाव्य उत्तर : (4) छान कविता केली
प्र11) पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा
(1) प्रार्थना
(2) प्रार्थणा
(3) पार्थना
(4) प्राथना
संभाव्य उत्तर : (1) प्रार्थना
प्र. क्र. 12 ते 14 साठी सूचना : पुढील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
प्र12) वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे?
(1) पाच
(2) सात
(3) सहा
(4) आठ
संभाव्य उत्तर : (4) आठ
प्र13) "अरेच्या! तारीख विसरलेच गं मी." असे गीता कोणाला म्हणाली?
(1) बाबा
(2) आई
(3) आत्या
(4) दीप्ती
संभाव्य उत्तर : (2) आई
प्र14) आत्या, दीप्ती आणि दिपू गावाला केव्हा जाणार आहेत?
(1) 5 तारखेला
(2) 6 तारखेला
(3) पुढच्या महिन्यात
(4) पुढच्या महिन्यात 5/6 तारखेला
संभाव्य उत्तर : (4) पुढच्या महिन्यात 5/6 तारखेला
प्र15) चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणार्या म्हणीतील 5, 6, 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणार्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
(1) नवरी
(2) चढण
(3) खाली
(4) हुशार
संभाव्य उत्तर : (1) नवरी [म्हण : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग]
प्र16) खालील वाक्य चार भागात विभागले आहे. त्यातील चुकीचा भाग ओळखा.
मडक्यांची | थप्पी | लावली | होती.
(1) मडक्यांची
(2) लावली
(3) थप्पी
(4) होती
संभाव्य उत्तर : (3) थप्पी [मडक्यांची उतरंड असते]
प्र17) 'मेज' हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे?
(1) रेडिओ
(2) वेब
(3) फोन
(4) टेबल
संभाव्य उत्तर : (4) टेबल
प्र18) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
सर्वांनी पाण्याची बचत करावी
(1) निर्मळ
(2) जीवन
(3) सलिल
(4) जल
संभाव्य उत्तर : (1) निर्मळ
प्र19) पुढीलपैकी आलंकारिक शब्द ओळखा.
अ) अक्षरशत्रू
ब) अनासक्त
क) देशभक्त
ड) अरण्यपंडित
(1) फक्त अ
(2) फक्त ड
(3) अ आणि ड
(4) ब आणि क
संभाव्य उत्तर : (3) अ आणि ड
प्र20) 'तिठा' हा शब्द कोणत्या शब्दसमुहाबद्दल आला आहे ते दिलेल्या पर्यायांतून निवडा.
(1) चार रस्ते जेथे एकत्र मिळतात
(2) तीन रस्ते जेथे एकत्र मिळतात
(3) घाटातील रस्ता
(4) पूलावरून जाणारा रस्ता
संभाव्य उत्तर : (2) तीन रस्ते जेथे एकत्र मिळतात
प्र21) गटात न बसणारा शब्द निवडा.
(1) झाडेवेली
(2) झाडेझुडपे
(3) झाडांवर
(4) झाडझाडोरा
संभाव्य उत्तर : (3) झाडांवर
प्र22) पुढीलपैकी पिलुदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
(1) शेळीचे - करडू
(2) म्हैस - कोकरू
(3) घोडा - शिंगरु
(4) हरिणी - पाडस
संभाव्य उत्तर : (2) म्हैस - कोकरू
प्र23) दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि त्या शब्दातील पहिल्या तीन अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा.
भ, व, अ, ति, थी, न
(1) पाहुणा
(2) दिवस
(3) सदन
(4) घर
संभाव्य उत्तर : (1) पाहुणा [ शब्द - अतिथीभवन]
प्र24) स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल?
(1) स्वच्छ
(2) स्वरा
(3) स्वप्न
(4) स्विकार
संभाव्य उत्तर : (2) स्वरा
प्र25) पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय निवडा
(1) शिक्षक दिन - 11 नोव्हेंबर
(2) बालिकादिन - 14 नोव्हेंबर
(3) हुतात्मादिन - 2 ऑक्टोबर
(4) विज्ञानदिन - 29 फेब्रुवारी
संभाव्य उत्तर : (3) हुतात्मादिन - 2 ऑक्टोबर
---------------
tags : class 5 scholarship exam Marathi, 5th scholarship question paper pdf download, 5th std scholarship exam sample papers, navneet scholarship books 5th std pdf marathi medium, 5th std scholarship books in marathi pdf, स्कॉलरशिप परीक्षा 2022 कधी आहे, स्कॉलरशिप परीक्षा 2022 इयत्ता पाचवी, Maharashtra Scholarship exam 2022, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 MSCE Pune, स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार बावीस, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, Maharashtra scholarship exam date 2022, scholarship exam questions and answers pdf
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू