pdf डाऊनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा
प्र 1) उत्तम समाजव्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही?
(1) शक्तीची
(2) आदेशाची
(3) माणुसकीची
(4) प्रेमभावाची
संभाव्य उत्तर : (3) माणुसकीची
प्र 2) उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?
(1) राणीमाशी इतकेच कामकरी माश्यांना महत्व असते
(2) आजची समाजव्यवस्था संकरीत झालेली आहे
(3) सहकारापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येते
(4) सार्वजनिक कार्य हे मधमाश्यांचे पोळे बनवण्यासारखे आहे
संभाव्य उत्तर : (3) सहकारापेक्षा स्पर्धेतून अधिक काही कमवता येते
प्र 3) पुढीलपैकी कोणता शब्द उतार्यात विशेषण म्हणून आला नाही?
(1) संकरित
(2) सामूहिक
(3) प्रत्येक
(4) दक्षता
संभाव्य उत्तर : (4) दक्षता
प्र 4) कवितेतील वर्णनानुसार दु:ख कोणाला झाले आहे?
(1) काळोख्या रात्रीला
(2) गळून पडलेल्या पानांस
(3) धगधगत्या सूर्याला
(5) ओसाड माळाला
संभाव्य उत्तर : (2) गळून पडलेल्या पानांस
प्र 5) कवितेतील नाम व त्याला दिलेले विशेषण यातील अयोग्य जोडी ओळखा
(1) क्षुब्ध वात
(2) जीर्ण पाचोळा
(3) मोकळा तळ
(4) विशाळ तरु
संभाव्य उत्तर : (3) मोकळा तळ
प्र 6) पाचोळ्याचा उपहास कोण करत आहे?
(1) झाडावरील पाने व गवत
(2) वन व दिन
(3) वृक्ष व माळ
(4) उषा व निषा
संभाव्य उत्तर : (1) झाडावरील पाने व गवत
प्र 7) पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा
(1) उनाड
(2) अवखळ
(3) दुर्दशा
(4) अनिर्बंध
प्र 8) 'क्लेश' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
(1) दु:ख
(2) क्रोध
(3) सुख
(4) खंत
प्र 9) पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?
अधुनिक, नावीन्य, मूल्य, नातेवाईक, वैद्यकीय, स्वीकार, येऊन, ठेवून, ठराविक
(1) पाच
(2) चार
(3) सहा
(4) तीन
प्र 10) गावातील सर्व गावकरी त्याच्या त्या गोष्टीची पुनःपुन्हा चर्चा करत होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या अर्थाचा योग्य आलंकारिक शब्द निवडा.
(1) अंधेरनगरी
(2) चर्वितचर्वण
(3) तारेवरची कसरत
(4) यक्षप्रक्ष
प्र 11) 'उपरती होणे या वाक्प्रचारचा योग्य समानार्थी वाक्प्रचार कोणता?
(1) परावृत्त होणे
(2) उपकार स्मरणे
(3) भ्रमनिरास होणे
(4) स्मरण होणे
प्र 12) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील म्हणीचा अर्थ योग्य आहे? (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा)
(1) दे माय धरणी ठाय - अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे
(2) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - ओळखीच्या माणसांना एकमेकांची वर्मे माहीत असतात
(3) ओळखीचा चोर जीवे न सोडी - अनोळखी माणसे धोका-दायक असतात
(4) आपला हात जगन्नाथ - स्वतःहून एखादी पीडा मागे लावून घेणे
प्र 13) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दात अनुस्वाराचा उच्चार अयोग्य अनुनासिक वापरुन लिहिला आहे?
(1) संजय - सञ्जय
(2) चंचल - चंन्चल
(3) भांडण - भाण्डण
(4) रंग - राङ्ग
प्र 14) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील जोडशब्दांची संधीफोड योग्य नाही?
(1) अल्पोपाहार - अल्प + उपहार
(2) अजादी - अच् + आदी
(3) सच्चरित्र - सत् + चरित्र
(4) दुष्कर - दु: + कर
प्र 15) पुढीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य निवडा (अचूक दोन पर्याय निवडा)
(1) मी गुरांना पाणी पाजले; शिवाय चारा टाकला
(2) पूर्वी निकाल जाहीर झाला; की प्रवेशासाठी कॉलेजवर गर्दी दिसायची
(3) नऊ वाजताच बस चुकली; सबब शाळेत जायला उशीर झाला
(4) तुला सर्व वस्तु दिल्या आहेत; आणखी काय हवे असल्यास सांग
प्र 16) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
(1) नऊ
(2) पाच
(3) दहा
(4) बारा
प्र 17) वचनबदलानुसार विसंगत जोडी ओळखा
(1) साध्वी - साध्वी
(2) टिच - टिचा
(3) आसू - आसवे
(4) तिथी - तिथ्या
प्र 18) पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेल्या सामान्य रूपातील शब्दाचा मूळ शब्द कोणता?
तो रखवालीच्या पवित्र्यात पलंगाखाली बसून राहिला
(1) पवित्र
(2) पावित्र्य
(3) पवित्रा
(4) पवित्र्या
प्र 19) पुढीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य कोणते?
(अचूक दोन पर्याय निवडा)
(1) मी संगणकावरही ई-पुस्तक वाचतो
(2) गाईने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला
(3) कालच मला वेतन मिळाले
(4) कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला
प्र 20) 'मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो होतो.' या वाक्याचा अर्थ न बदलता कोणते अकरणरूपी वाक्य तयार होईल?
(1) मी मुद्दामच त्या ठिकाणी जात नाही
(2) मी मुद्दामच त्या ठिकाणी गेलो नाही
(3) मी सहजच त्या ठिकाणी गेलो
(4) मी सहजच त्या ठिकाणी गेलो नव्हतो
प्र 21) पुढील ओळीतील क्रियापदाचा अर्थ ओळखा?
'सुखी सगळ्यांना ठेव देवराया,
मागणे हे अमुचे तुझ्या पाया'
(1) स्वार्थ
(2) आज्ञार्थ
(3) संकेतार्थ
(4) विद्यर्थ
प्र 22) पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते?
(1) गतवैभव
(2) गैरहजर
(3) स्त्रीपुरुष
(4) ग्रंथकार
प्र 23) पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार नाही?
(1) वाटे
(2) जणू
(3) की
(4) गत
प्र 24) तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले?
(1) ग्रामगीता
(2) रामचरितमानस
(3) गोमंतक
(4) अखंड
प्र 25) साहित्यिक व त्यांची टोपणनावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे?
(1) विनायक - नारायण वामन टिळक
(2) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
(3) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
(4) ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे
डाऊनलोड पेपर १ - मराठी मीडियम pdf - Download
tags : class 8 scholarship exam Marathi, 8th scholarship question paper pdf download, 8th std scholarship exam sample papers, navneet scholarship books 8th std pdf marathi medium, 8th std scholarship books in marathi pdf, स्कॉलरशिप परीक्षा 2022 कधी आहे, स्कॉलरशिप परीक्षा 2022 इयत्ता पाचवी, Maharashtra Scholarship exam 2022, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 MSCE Pune, स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार बावीस, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, Maharashtra scholarship exam date 2022, scholarship exam questions and answers pdf
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू