1) योग्य विधान ओळखा
1) लिंग हे नामाच्या रूपावरुन ओळखले जाते
2) लिंग हे नामाच्या अर्थावरुन ओळखले जाते
3) लिंग हे नामाच्या जातीवरुन ओळखले जाते
4) लिंग हे नामाच्या कार्यावरुन ओळखले जाते
2) 'पोर' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
1) स्त्रीलिंग व पुल्लिंग 2) नपुंसक लिंग
3) पुल्लिंग व नपुंसक लिंग 4) स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसक लिंग
3) 'नर्तिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) नर्तन 2) नर्तनकार 3) नर्तक 4) नृत्यक
4) 'हंस' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) हंसी 2) हंसि 3) हंसा 4) हंसिन
5) 'साखरभात' या शब्दाचे लिंग कोणते ?
1) उभय 2) पुल्लिंग 3) स्त्रीलिंग 4) लिंग नाही
6) 'सिंह' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) सिंहिण 2) सिंहीण 3) सिंह 4) सिंहा
7) 'बोकड' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) बोकडी 2) बोकडीन 3) शेळी 4) मेंढी
8) 'कवी' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) कवी 2) कवयित्री 3) कवयत्री 4) कवीण
9) 'जनक' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) जानकी 2) जननी 3) जनका 4) यापैकी नाही
10) 'सुत' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) सुता 2) सुती 3) सुत 4) सुतिण
11) पुल्लिंगी शब्द ओळखा
1) पान 2) ताण 3) रान 4) नाक
12) स्त्रीलिंगी शब्द ओळखा
1) सिंह 2) वाघ 3) लांडोर 4) काळवीट
13) नपुंसक लिंगी शब्द ओळखा
1) निसर्ग 2) चंद्र 3) मित्र 4) खडग्
14) 'झाडे' या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?
1) पुल्लिंग 2) स्त्रीलिंग 3) नपुंसक लिंग 4) उभय लिंग
15) 'लठ्ठपणा' या शब्दाचे लिंग कोणते ?
1) पुल्लिंग 2) नपुंसक लिंग 3) उभयलिंग 4) लिंग नाही
16) 'चकचकाट' या शब्दाचे लिंग कोणते ?
1) पुल्लिंग 2) नपुंसक लिंग 3) उभयलिंग 4) लिंग नाही
17) खालीलपैकी स्त्रीलिंग व पुल्लिंग या दोन्ही प्रकारे लिंग होते असा शब्द कोणता ?
1) ग्रंथकर्ता 2) मोटार 3) सुरवंट 4) व्याधी
18) खालीलपैकी स्त्रीलिंग व पुल्लिंग या दोन्ही प्रकारे लिंग होते असा शब्द कोणता ?
1) मजा 2) साखरभात 3) हरीण 4) नेत्र
19) खालीलपैकी स्त्रीलिंग व पुल्लिंग या दोन्ही प्रकारे लिंग होते असा शब्द कोणता ?
1) बाग 2) टेबल 3) त्रिकोण 4) घड्याळ
20) 'वानर' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) वानरीन 2) वानरी 3) वानरीण 4) वानरा
21) 'कन्या' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) मुलगी 2) मुलगा 3) वर 4) पुत्र
22) 'वाघ' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) वाघिण 2) वाघिन 3) वाघीण 4) वाघीन
23) 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ?
1) नुपुंसक 2) पुरुष 3) स्त्री 4) उभय
24) अयोग्य विधान ओळखा
1) लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात
2) लिंगनिश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेलेले नाहीत
3) काल्पनिक घटकांनासुद्धा लिंग मानले जाते
4) लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होत नाही
25) वेगळी जोडी ओळखा
1) लोटा - लोटी 2) दांडा - दांडी 3) आरसा - आरशी 4) बोकड - शेळी
26) वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो. त्या बदलास _____ म्हणतात
1) प्रत्यय 2) प्रकृती 3) परिवर्तन 4) विकार
27) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता ?
1) सुंदर 2) कडू 3) रानटी 4) शहाणा
28) पुढीलपैकी कोणता शब्द तिन्हीलिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ?
1) बाग 2) मुंगूस 3) पोर 4) वेळ
29) खालीलपैकी एकाच अर्थाच्या व तीन वेगळ्या लिंगांमध्ये आढळणार्या शब्दांचा गट निवडा
1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी
2) रुमाल, पागोटे, पगडी
3) लोटा, लोटी, लाटणे
4) झरा, ओढा, नदी
30) 'विधाता' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) विधाती 2) विधाते 3) विद्यादेवता 4) विधात्री
31) 'बोका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
1) बोकी 2) मांजर 3) बोकीन 4) भाटी
32) 'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे 'या' कारान्त सामान्यरूप कसे होते याचे पुढील योग्य उदाहरण ओळखा
1) साने - सान्या - सान्यांनी 2) कुत्रा - कुत्र्यास - कुत्र्या
3) पाणी - पाण्या - पाण्याने 4) केळे - केळ्या - केळ्याला
33) व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) खुन 2) खून 3) खूण 4) खुण
34) परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरते ?
1) त्याच्या वाक्याच्या अर्थवरून 2) त्याच्या कर्त्याच्या लिंगावरून
3) त्याच्या कर्मावरून 4) त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून
35) ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात ?
1) उभयलिंगी व बहुलिंगी 2) अनेकलिंगी 3) द्विलिंगी 4) यापैकी नाही
36) निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना आपण काय करतो ?
1) काल्पनिक पुरुषत्व लादतो 2) काल्पनिक स्त्रीत्व लादतो
3) काल्पनिक स्त्रीत्व व पुरुषत्व लादून त्या वस्तूमागे तो, ती, ते हे शब्द वापरतो
4) काल्पनिक नपुंसंकत्व लादतो
37) 'पगडी' या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप कोणते ?
1) पगडे 2) पागोटे 3) पागोडे 4) यापैकी नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू