1) एकवचनी शब्द ओळखा
1) टाके 2) नखे 3) डोके 4) बाके
2) एकवचनी शब्द ओळखा
1) गोळे 2) सुळे 3) मुळे 4) तळे
3) एकवचनी शब्द ओळखा
1) तारा 2) धारा 3) गारा 4) वारा
4) एकवचनी शब्द ओळखा
1) लाडू 2) खडू 3) लेकरू 4) झाडू
5) अनेकवचनी रूप ओळखा : लोटी
1) लोटा 2) लोटे 3) लोट्या 4) यापैकी नाही
6) अनेकवचनी रूप ओळखा : विहिण
1) विहीणी 2) विहिण्या 3) विहिणी 4) विहिण
7) अनेकवचनी रूप ओळखा : जीभ
1) जिभली 2) जिभल्या 3) जीभ 4) जिभा
8) अनेकवचनी रूप ओळखा : पिसू
1) पिसवा 2) पिसू 3) पिसव्या 4) यापैकी नाही
9) अनेकवचनी रूप ओळखा : विळी
1) विळे 2) विळ्या 3) विळी 4) वीळ्या
10) अनेकवचनी रूप ओळखा : तोंड
1) तोंडा 2) तोंडी 3) तोंडं 4) तोंडे
11) अनेकवचनी रूप ओळखा : वधू
1) वधवा 2) वधूरी 3) वधू 4) वध्या
12) अनेकवचनी रूप ओळखा : डोळा
1) डोळा 2) नयन 3) नयना 4) डोळे
13) अनेकवचनी रूप ओळखा : नक्कल
1) नकला 2) नक्कला 3) नकल्या 4) नकली
14) अनेकवचनी रूप ओळखा : खारीक
1) खार्का 2) खारीके 3) खारीका 4) खारका
15) अनेकवचनी रूप ओळखा : म्हैस
1) म्हैसी 2) म्हसी 3) म्हशी 4) म्हैसिणी
16) अनेकवचनी शब्द ओळखा
1) कोल्हा 2) चित्ता 3) हरिण 4) गिधाड
17) अनेकवचनी शब्द ओळखा
1) हत्ती 2) ससा 3) लांडगा 4) माकड
18) गटात न बसणारी जोडी ओळखा
1) भाषा - भाषा 2) सभा - सभा 3) फोटो - फोटो 4) घोडा- घोडे
19) 'उंदीर' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) उंदरे 2) उंदरं 3) उंदीर 4) अनेकवचन होत नाही
20) 'पणत्या' या शब्दाचे वचन कोणते ?
1) एकवचन 2) द्विवचन 3) बहुवचन 4) अनाम वचन
21) 'दासी' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) दासीया 2) दास्या 3) दासी 4) दासवा
22) 'जळू' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) जळा 2) जळे 3) जळवा 4) जळवे
23) 'सासू' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) सासू 2) सास्या 3) सासवा 4) अनेकवचन होत नाही
24) 'चूक' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) चुकी 2) चूका 3) चुका 4) चूकी
25) वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा
1) दरी 2) डोंगर 3) नदी 4) पाणी
26) वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा
1) तळी 2) पोळी 3) जाळी 4) यापैकी नाही
27) ज्या वेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असते; त्यावेळी एकवचनी शब्दप्रयोग करतात, त्याला खालीलपैकी काय म्हणतात ?
1) एकवचन 2) विपुलतादर्शक एकवचन 3) बहुवचन 4) आदरार्थी अनेकवचन
28) नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला _____ म्हणतात
1) वचन 2) संख्यावचन 3) बहुवचन 4) द्विवचन
29) खालीलपैकी कोणत्या नामाचे 'या' कारान्त होत नाही ?
1) पोळी 2) पक्षी 3) वही 4) काठी
30) 'ती परीक्षा देते' या वाक्यातील 'ती' चे व्याकरण चालवा
1) सर्वनाम, एकवचनी, स्त्रीलिंग-कर्म 2) विशेषनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता
3) सर्वनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता 4) सर्वनाम, स्त्रीलिंगी, अनेकवचनी-कर्म
31) खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते ?
1) गणू शाळेत गेला 2) आई घरी आली
3) कुत्रा झाडाखाली झोपला 4) बाबा गावाला गेले
32) खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते ?
1) खूप पेरु खाली पडले 2) शबरीने बोरे वेचली
3) हे आंबे कच्चे आहेत 4) यंदा जरा जास्तच पपई आली
33) नेहमी अनेकवचनी असणारे नाम कोणते ?
1) माणसे 2) घरे 3) डोहाळे 4) दारे
34) 'दिवस' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) दिवशी 2) दिवस 3) दिवसे 4) दीवस
35) 'हार' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ?
1) हारे 2) हारतुरे 3) हार 4) हारी
36) खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता ?
1) पर्वत 2) विषय 3) बोका 4) हत्ती
37) खालीलपैकी अनेकवचनी रूप कोणते ?
1) युवत्या 2) युवती 3) युवता 4) यापैकी नाही
38) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे ______
1) आगम 2) वचन 3) अनेकवचन 4) बहुवचन
39) अयोग्य विधान ओळखा
1) वचनाचे एकवचन आणि अनेकवचन असे मुख्य दोनच प्रकार पडतात
2) फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते
3) विशेषनाम व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही
4) सर्व प्रकारच्या नामाचे अनेकवचन होते
40) 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द कोणता ?
1) कुत्रा 2) मासा 3) राक्षस 4) घोडा
41) तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल ?
1) एकवचन 2) अनेकवचन 3) बहुवचन 4) आदरार्थी अनेकवचन
42) खालीलपैकी योग्य विधान निवडा
1) पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होते
2) विशेषनामाचे अनेकवचन होते
3) विशेषनाम समान गुणधर्म दाखविण्यासाठी वापरल्यास त्याचे सामान्य नामाप्रमाणे अनेकवचन होते
4) भाववाचक नामाचे अनेकवचन होते
43) पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा
1) फूल 2) मोत्ये 3) मूल 4) जळू
44) 'स्नेहलने ग्रंथ वाचले' या वाक्यातील ग्रंथ या नामाचे वचन कोणते ?
1) एकवचन 2) द्विवचन 3) अनेकवचन 4) अनामवचन
45) 'गुरुजी शाळेत आत्ताच आले' हे वाक्य व्याकरण दृष्ट्या
अ) अनेकवचनी आहे ब) आदरार्थी आहे
क) आदरार्थी अनेकवचन आहे ड) आदरार्थी बहुवचन आहे
1) अ आणि ब बरोबर 2) क आणि ड बरोबर 3) अ आणि क बरोबर 4) सर्व चूक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू