MCQ विरुद्धार्थी शब्द

1) 'नम्रता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) मृदुता 2) सदयता 3) उर्मटपणा 4) मलिनता

2) 'बलवान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) बावळट 2) दुर्बल  3) निःसत्व 4) सशक्त

3) 'अनुज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अग्रज  2) बहीण 3) लहान भाऊ 4) जनक

4) 'कृपण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उदार 2) कृतघ्न 3) गरीब  4) अपूर्व

5) 'ऋणको' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) धनी  2) मालक 3) सावकार 4) धनको

6) विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा 
1) तुटणे-जुळणे 2) सुस्त-धांदरट 3) एवढे-तेवढे 4) पगारी-बिनपगारी

7) 'नगर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) प्रांत 2) अनगर 3) शहर 4) ग्राम

8) विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा
1) सल्ला-बदसल्ला 2) अनुभवी-अनअनुभवी 3) सुसंगत-विसंगत 4) प्राचीन-नवीन

9) 'ज्येष्ठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) धाकटा 2) छोटा 3) लहान 4) कनिष्ठ

10) 'निरागस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) पापी 2) रागावलेला 3) चतुर 4) लोभस

11) विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखा
1) कृपा x अवकृपा 2) कृत्रिम x नैसर्गिक 3) कृपण x उदार 4) प्रसरण x अप्रसरण

12) 'मूर्तिपूजक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) मूर्तिभंजक 2) अमूर्त 3) मूर्तिकार 4) मूर्तिचोर

13) 'सत्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) पथ्य  2) मिथ्य 3) काथ्य 4) अमूर्त

14) 'पडछाया' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) प्रतिबिंब 2) पडसाद 3) छाया 4) पडताळा

15) 'अनुराग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) राग 2) मैत्री 3) प्रेम 4) वात्सल्य

16) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) संमुख 2) उन्मुख 3) विमुख 4) दुर्मुख

17) 'नम्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) विनय 2) गर्व 3) उद्धट 4) विनम्र

18) 'विसंवादी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) न बोलणारा 2) वियोगी 3) योगी 4) संवादी

19) 'जहाल' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उग्र 2) तिखट  3) मवाळ  4) जलाल

20) 'निमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) निमंत्रण 2) आमंत्रण 3) आगंतुक  4) यजमान

21) विरुद्धर्थी असलेली योग्य जोडी कोणती ?
1) उपकार x मदत 2) उपकार x असहाय्य 3) उपकार x अपकार 4) उपकार x परोपकार

22) 'भंग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) भग्न 2) निर्भंग 3) सभंग 4) अभंग

23) 'सोक्षमोक्ष लावणे' चा विरुद्ध अर्थ असलेला पर्याय निवडा
1) घोळत ठेवणे 2) साक्षी पुरावे करणे 3) एकदाचे संपवून टाकणे  4) नको असलेले करणे

24) 'राजमार्ग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) हमरस्ता 2) आडमार्ग 3) अराजमार्ग 4) कुमार्ग

25) 'कुविख्यात' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) सुविख्यात 2) प्रख्यात 3) आख्यात 4) सुख्यात

26) 'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) प्रगती 2) सरळ 3) तेजस्वी 4) विघातक

27) 'वाचाळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उपकर्ष 2) यश 3) बडबडा 4) अबोल

28) 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अपकर्ष 2) अकर्ष 3) विकर्ष 4) अनुत्कर्ष

29) 'वात्रट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) सद्गुणी 2) हुशार 3) शांत 4) रागीट

30) 'अंत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) सुरुवात 2) अनंत 3) आजीव 4) चिरंजीव

31) 'प्रसरण' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अवतरण 2) आकुंचन  3) अवरण 4) अनुतरण

32) 'श्रेष्ठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) कनिष्ठ 2) ज्येष्ठ 3) वृद्ध 4) वरिष्ठ

33) 'धीट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) शूर 2) दयाळू 3) गंभीर 4) भेकड

34) 'उदंड' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) भरपूर 2) कमी 3) पुष्कळ 4) तुटपुंजे

35) 'रणशूर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) पराक्रमी 2) पळपुटा 3) भित्रा 4) रणबीर

36) 'त्याज्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) आद्य 2) मंदी 3) निंद्य 4) ग्राह्य

37) 'नीटनेटका' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
   1) ओबडधोबड 2) गचाळा 3) अजागळ 4) गबाळा

38) 'सुसंगत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) असंगत 2) विसंवादी 3) पारंगत 4) विसंगत

39) 'कुचकामी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) फलोदाई 2) फलदायी 3) भाग्योदयी 4) भाग्यशाली

40) 'माजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) प्रतिगामी 2) विद्यमान 3) जिवंत 4) पुरोगामी

41) 'ऐच्छिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अपरिहार्य 2) आमंत्रित 3) आगंतुक 4) स्वतंत्र

42) 'मर्त्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) मृत 2) अमृत 3) अमर 4) माती

43) 'शाप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उ:शाप 2) वरदान 3) निशाप  4) अशाप

44) 'सुज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) तज्ञ 2) सुजाण 3) अडाणी 4) अज्ञ

45) 'बोध' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) दुर्बोध 2) अबोध 3) प्रबोध 4) सुबोध

46) 'हलकी वाहने' यातील 'हलकी'  या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) फुलकी 2) अवजड 3) जाड 4) यापैकी नाही

47) 'अनाहूत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) आमंत्रित 2) आगंतुक 3) अकस्मात 4) यापैकी नाही

48) 'निरर्थक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) अर्थपूर्ण 2) अर्थशून्य 3) अर्थगर्भ 4) अर्थात


49) 'उन्नत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उत्कर्ष 2) प्रगत 3) अवगत 4) अधोगत

50) 'भोग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) भाग्य 2) स्वार्थ 3) त्याग 4) यापैकी नाही

51) 'अनासक्ती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) नासक्ती 2) आसक्ती 3) सक्ती 4) सक्तीविना

52) 'स्वार्थ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) आप्पलपोटा 2) प्रपंच 3) परमार्थ 4) पोटार्थ

53) 'सुगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) उगम 2) सोपा 3) दुर्गम 4) सहज

54) 'पुढारी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) नेता 2) प्रमुख 3) गुलाम 4) अनुयायी

55) 'आग्रही' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) विग्रही 2) दुराग्रही 3) ग्रहविरहित 4) अनाग्रही

56) 'भद्रजन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) सज्जन 2) दुर्जन 3) प्रेमीजन 4) विद्वत्जन

57) 'सुवाच्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) गिचमिड 2) दुर्बोध 3) अवाचनीय 4) वरील सर्व

58) 'गुळगुळीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) रेखीव 2) ओबडधोबड 3) पारदर्शी 4) खरखरीत

59) 'आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) आत्मशांती 2) आत्मचरित्र 3) आत्मपुराण 4) आत्मस्तुती

60) 'शाश्वत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) चिरंतन 2) चिरकाल 3) चिरायु 4) अल्पकाळ

61) 'वडीलार्जीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) सनातनी 2) उधळ्या 3) स्वकष्टार्जित 4) अवलक्षणी

62) 'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) कुचराई 2) लगबग 3) ताबडतोब 4) तात्पुरता

63) 'कृतज्ञ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) कृतार्थ 2) कृपाळू 3) कृतान्त 4) कृतघ्न

टिप्पण्या