Last Updated : 15 जुलै 2022
नमस्कार ! 2022 ची शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै 2022 रोजी आयोजित केलेली आहे.
या पेजवर इयत्ता 5 वी साठी मराठी विषयाच्या 2021 ते 2017 अशा पाच प्रश्नपत्रिकामध्ये आलेले सर्व प्रश्न उत्तरांसह दिलेल आहेत.
या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत सूटसुटीतपणे, जाहिरातीशिवाय व्यवस्थित पहाण्यासाठी ई-बुक खरेदी करा - ई-बुकसाठी अमेझोन ला भेट देऊन Class 5 Scholarship marathi question papers TCA असे सर्च करा
इंग्लिश विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
ऑगस्ट 2021 - सेक्शन 1 - मराठी
प्रश्न क्र. 1 ते 3 साठी सूचना - पुढील उतारा वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्याची लांबी सुमारे दहा फूट असते. त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो. काही वेळा तर ते ताशी ४0 ते ६0 मैल वेगाने पोहतात.
डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही, तर तो सस्तन प्राणी आहे. माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते.
डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो; ओरडूही शकतो. शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार 'पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो 'म्याऊ' असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो.
डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते. आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनिलहरींनी संपर्क साधतात.
1) डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा.
(1) डॉल्फिन मासा अंडी घालतो.
(2) डॉल्फिन मासा अनेक आवाज काढत नाही.
(3) डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते.
(4) डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते.
2) पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उताऱ्यात आला नाही?
(1) मीन (2) पारध (3) उथळ (4) विहग
3) डॉल्फिनला कशासाठी सारखे पाण्याबाहेर यावे लागते?
1) शत्रूला घाबरवण्यासाठी 2) एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी
3) श्वास घेण्यासाठी 4) माणसांना भेटण्यासाठी
प्रश्न क्र. 4 ते 6 साठी सूचना : कविता वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा
भारतवासी आम्ही सारे, भारतीय भाई
जमीन पावन भारतातली ही अमुची आई।॥
अनेक भाषा अनेक भूषा
अनेक सीमा अनेक रेषा
वंद्य तरी हा एक नकाशा
भिन्न देवळे भिन्न देव पण भेदभाव नाही।॥।
विविध पाकळ्या एक फुलाच्या
विविध तारका एक नभाच्या
अनेक धारा एक नदीच्या
अनेकतेवर एक तिरंगा झळकत हा राही।॥
अमंगलाचे तोडून बंधन
न्यायनीतिला करून वंदन
इथे उभारू नवीन नंदन
हीच प्रतिज्ञा घुमवू आम्ही दिशांतून दाही।॥
भारतवासी आम्ही सारे, भारतीय भाई|।।
4) पुढीलपैकी विशेषण-नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही?
(1) भेद भाव (2) विविध तारका (3) अमुची आई (4) अनेक भाषा
5) कवितेतील वर्णनाशी न जुळणारा पर्याय कोणता आहे?
1) भारतात अनेक भाषा बोलल्या जातात
2) अमंगलाचे बंधन तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली
3) आम्ही सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत
4) भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे
6) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे?
1) पण 2) ध्वज 3) प्रदेश 4) अन्याय
1) तीन 2) ठसा 3) तीन इंच 4) लांब
8) पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायांत दिला आहे?
मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो
1) मुंगी 2) कीटक 3) वसाहत 4) समाजप्रिय
9) पुढील वाक्यात आलेले विरामचिन्ह दर्शविणारा पर्याय निवडा
शिवानी दोन - दोन तास न थकता बोलायची
1) संयोगचिन्ह 2) अपसरणचिन्ह 3) उद्गारचिन्ह 4) प्रश्नचिन्ह
10) पुढीलपैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी नामाचा पर्याय निवडा
1) आसूड 2) खोंडे 3) गोंडे 4) वशिंडे
11) एकवचन - अनेकवचन याचीअयोग्य जोडी निवडा
1) कौल - कौले 2) पातळ - पातळे 3) शिंग - शिंगे 4) डोकं - डोके
12) वाक्प्रचार व त्याचा अर्थ याची अयोग्य जोडी निवडा
1) तत्पर असणे - तयार असणे 2) फैलावणे - जोराने ओरडणे
3) दुलदुलणे - हलणे 4) दाह होणे - आग होणे
13) पुढील अक्षरांपासून अर्थपूर्ण म्हण तयार केल्यानंतर म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास 'सविता' या शब्दाचा समानार्थी शब्द मिळेल ? म, खे, वी, वी, क, खे, जे, दे, ते, दे, र
1) 6 वे, 2 रे 2) 5 वे, 11 वे 3) 6 वे, 4 थे 4) 3 रे, 5 वे
प्रश्न क्र 14 ते 16 साठी सूचना : पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
14) आज सारसबाग मुलांनी ____ होती
1) आनंदी 2) खेळत 3) दु:खी 4) गजबजली
15) निमित्त होते ____
1) दिवाळीचे 2) बालमेळाव्याचे 3) उन्हाळ्याचे 4) सुट्टीचे
16) बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज ____ करण्याचे ठरविले
1) रडगाणे 2) धमाल 3) त्रास 4) अभ्यास
17) खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय निवडा
आई म्हणाली, "अग दीपा, तुझं कुणाशी बिनसलंय का?"
1) आई म्हणाली, 2) "अग दीपा, 3) तुझं कुणाशी 4) बिनसलंय का?"
18) पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला पर्याय निवडा
1) दूम - पत्ता 2) उत्तुंग - उत्सुक 3) धनी - श्रीमंती 4) समर्थन - खंबीर
19) 'निरुत्साह' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायांतून निवडा
1) कंटाळा 2) थकवा 3) हुरूप 4) आनंद
20) 'क, स, र, ला, कु' या अक्षरांपासून तयार होणार्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास 'पाणि' या शब्दाचा समानार्थी शब्द मिळेल?
1) पहिले व तिसरे 2) तिसरे व चौथे 3) चौथे व पाचवे 4) पहिले व पाचवे
21) 'सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे' या अर्थाचा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा
1) पांढरा हत्ती 2) द्राविडी प्राणायाम 3) नस्ती उठाठेव 4) चांडाळ चौकडी
22) चुकीची जोडी निवडा
1) घोडा - पागा 2) साप - बीळ 3) ससा - ढोली 4) कोंबडी - खुराडे
23) 'ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा
1) मासिक 2) पाक्षिक 3) वार्षिक 4) नियतकालिक
24) 'अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध | साहिल्या विविध नाना कळा ||' या काव्यपंक्ती कोणी रचल्या?
1) संत नामदेव 2) संत जनाबाई 3) संत सेनामहाराज 4) संत एकनाथ
25) लेख व लेखक यांची अचूक जोडी ओळखा
1) ढोल - द.मा. मिरासदार 2) जनाई - सदाशिव माळी
3) कठीण समय येता - मनोहर भोसले 4) कारागिरी - श्रीराम पचिंद्रे
--------------------------------------------
उत्तरे : 1-4, 2-3, 3-3, 4-1, 5-2, 6-1, 7-4, 8-4, 9-1, 10-3, 11-4, 12-2, 13-2, 14-4, 15-2, 16-2, 17-2, 18-1, 19-3, 20-4, 21-2, 22-3, 23-4, 24-1, 25-3
--------------------------------------------
फेब्रुवारी 2020 - सेक्शन - 1 - मराठी
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना : खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा
सत्पुरुष म्हणाला, “बाबांनो, या गरीब बिचार्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगडयांबरोबर या रानावनात राहतो. गवत-पाला खातो. ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत-बागडत असतो. कुणालातरी यानं त्रास दिला आहे का? सांगा पाहू! मग कशाकरता याचा जीव घ्यायचा?"
पारध्यांनी त्या सत्पुरुपाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.
पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरूषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला.
1) पारध्यांनी कोणती शपथ घेतली?
1) सशाला त्रास देणार नाही. 2) सत्पुरुषाची क्षमा मागू.
3) सशाला जंगलात पाठवू. 4) यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही.
2) 'मित्र' या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उताऱ्यात आला आहे?
1) वात्सल्य 2) सवंगडी 3) सूर्य 4) सत्पुरुष
3) ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही?
1) गवतपाला खातो. 2) ओढयाचे पाणी पितो.
3) सर्वांना त्रास देतो. 4) हसत बागडत असतो.
प्रश्न 4 ते 6 साठी सूचना : खालील जाहिरात लक्षपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा
4) पुढीलपैकी कोणती वस्तु विक्रीसाठी उपलब्ध नाही?
1) रांगोळी 2) उटणे 3) साबण 4) फटाके
5) जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती?
1) ठराविक वस्तूंसाठी 'एकावर एक फ्री' ऑफर
2) सर्व वस्तु विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत
3) फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी
4) चुकवू नये असे काही
6) 'सेल' चा कालावधी किती दिवसांचा आहे?
1) दोन 2) एक 3) चार 4) तीन
7) खालील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायांतून निवडा
'मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक ____'
1) मिळवला 2) मिळवू 3) मिळवते 4) मिळाला
8) खालीलपैकी नपुंसकलिंगी नाम असलेला पर्याय निवडा
1) घरे 2) शाळा 3) धनुष्य 4) बाण
9) खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते
'स्वच्छ भारत' हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल
1) झाले 2) झाले असेल 3) होते 4) होऊ दे
10) खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह असलेले वाक्य कोणते?
1) काय हवंय तुला?
2) मी रोज भाज्या खाते.
3) अगं बाई, कागद कुणी घेतले!
4) आई म्हणाली, "इकडे ये."
11) खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती?
सेनापति बापट यांणी हे सफाइचे वत्र अबोलपणे आयुश्यभर राबवले.
1) पाच 2) सहा 3) चार 4) सात
12) पुढील अक्षरे जुळवून तयार होणार्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायतून निवडा
ने, णी, भं, ग, र, ठी, त, ही, ना, पा, दु, ल्या, का, मा
1) एकीमध्ये खरी ताकद असते
2) खरी मैत्री कितीही किल्मिष दाखवून तुटत नाही
3) कठोर माणसाशी सगळे दबून असतात
4) दोन बाणेदार माणसे एकत्र राहू शकत नाहीत
प्रश्न क्र 13 ते 15 साठी सूचना : पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
13) ____ हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे
1) राष्ट्रध्वज 2) अशोकस्तंभ 3) राष्ट्रीय मुद्रा 4) राष्ट्रगीत
14) याची रचना ____ यांनी केली
1) बंकिमचंद्र चॅटर्जी 2) सम्राट अशोक 3) म. गांधी 4) रवींद्रनाथ टागोर
15) याच्यामुळे आपल्यामध्ये _____ जागा होतो
1) अहंकार 2) देशाभिमान 3) स्वातंत्र्य 4) गर्विष्ठपणा
16) अधोरेखित शब्दाचे सर्वात योग्य रूप पर्यायातून निवडा
माझे घर शाळा अगदी जवळ आहे
1) शाळेकडे 2) शाळेत 3) शाळेच्या 4) शाळेतील
17) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
1) स्क्रीन-पडदा 2) व्हिजन-दृष्टी 3) डिस्क-शिडी 4) प्रिंट-छापील प्रत
18) '__कड, __कड, __कड, __कड' रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणत्या पर्यायतील अक्षरे घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
1) मा, भा, चौ, प 2) प, पा, ख, का 3) मा, धा, भा, सा 4) सा, भा, चा, मा
19) 'मी काय ____ आहे का तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला?' रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा
1) घरकोंबडा 2) बोकेसंन्यासी 3) अक्षरशत्रू 4) नंदीबैल
20) योग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1) उंट-तबेला 2) वाघ-जाळी 3) सिंह-ढोली 4) कासव-बीळ
21) 'देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायतील अक्षरांनी तयार होईल?
1) म, ई, स 2) दा, नं, प, दी 3) रं, ज, नि, न 4) ण, म, ला, वा, दि
22) अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा
चपला पाहून मी एकदम दचकलोच. केवढा तो प्रकाश!
1) अग्नी 2) वीज 3) चपळ 4) वहाणा
23) अयोग्य जोडी ओळखा
1) 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव 2) 60 वर्षे - हिरक महोत्सव
3) 75 वर्षे - अमृत महोत्सव 4) 125 वर्षे - रौप्य महोत्सव
24) वर्णानुक्रमे लावल्यास खालील शब्दांचा योग्य क्रम लावणारा पर्याय निवडा
अ) रवी ब) अग्नी क) पाणी ड) वारा
1) अ, ब, क, ड 2) ब, क, अ, ड 3) ब, क, ड, अ 4) ड, क, ब, अ
25) 'ढग' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?
1) जलद 2) मेघ 3) पयोधि 4) अंबुद
--------------------------------------------
उत्तरे : 1-4, 2-2, 3-3, 4-4, 5-1, 6-2, 7-4, 8-3, 9-1, 10-3, 11-1, 12-2, 13-4, 14-4, 15-2, 16-3, 17-3, 18-1, 19-4, 20-1, 21-2, 22-2, 23-4, 24-2, 25-3
--------------------------------------------
फेब्रुवारी 2019 - सेक्शन - 1 - मराठी
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना - खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
मायाला दोन बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकवून स्वत:च्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्यांचे कपडे शिवून अर्थार्जन केले. खूप कष्ट केले पण मुलींच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही.
प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे देदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. दोन वर्षे नोकरी करून पैसे जमवले. जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले. “शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठीच काम कर.'' माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
1) पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले ?
1) शिवणकाम 2) धुणीभांडी 3) नोकरी 4) भाजीविक्री
2) “माया हुशार मुलगी होती.' हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही ?
1) तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले 2) ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली
3) तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले 4) तिचे वडील सतत आजारी असत.
3) मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते ?
1) मुलींना शिकवले 2) मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितले
3) खूप कष्ट केले 4) मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले
प्रश्न 4 ते 6 साठी सूचना - पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
उभारून कर उभे माड हे
शिरीं वीरांपरी झेलीत वृष्टी
जरा पहावे क्षितिजावर तर
बुडून जाते धुक्यात दृष्टी
हिरवी झाडे - शामल डोंगर
धुसर निळसर तलम हवा ही
लाल गढूळ जलातून वाहे
उसळत खिदळत चंचल काही
भिजून गेले पंख तरीही
बसला तारांवरती पक्षी
मधेच ठिबके थेंब कोवळा
फुलवित जळी वलयांची नक्षी
ध्वज मिरवीत काजळी घुराचा
आगगाडी ये दुरून उत्सुक
खडखड धडधड आज तिचीपण
भिजून झाली हळवी नाजूक
4) माडांना कोणाची उपमा दिली आहे ?
1) क्षितिजाची 2) डोंगराची 3) वीराची 4) धूराची
5) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही ?
1) पाणी 2) नेत्र 3) पाऊस 4) झेंडा
6) पाण्यावर वर्तुळांची नक्षी कोण फुलविते ?
1) निळसर तलम हवा 2) धुक्यात हरवलेली दृष्टी
3) दुरून येणारी आगगाडी 4) पक्ष्याच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब
7) खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत ?
'दारमागे कोण लपलंय ? त्यांना मी पाहिलंय बरं का !'
1) तीन 2) चार 3) देत 4) पाच
8) अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा :
"रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते."
1) नपुंसकलिंग 2) उभयलिंग 3) पुल्लिंग 4) स्त्रीलिंग
9) खाली दिलेल्या वाक्यातील काळ कोणता ?
"खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या."
1) वर्तमानकाळ 2) साधाकाळ 3) भूतकाळ 4) भविष्यकाळ
10) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा
1) दुर्घटना 2) मैत्रीणी 3) उत्तुंग 4) सुरपारंबी
11) पुढीलपैकी एकवचन-अनेकवचनाची अयोग्य जोडी कोणती ?
1) चादर - चादरी 2) झालर - झालरी 3) किनार - किनारी 4) वानर - वानरी
12) खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहन चे/च्या/ची ____
1) पाय लटलट कापले 2) पोटात बाकबूक झाले
3) बोबडी वळली 4) वरील सर्व पर्याय योग्य
13) खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा
'क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात'
1) गाढवाला गुळाची चव काय? 2) कोल्ह्याला द्राक्षे आंबट
3) कोल्हा काकडीला राजी 4) अडला हरी गाढवाचे पाय धरी
प्रश्न क्र. 14 ते 16 साठी सूचना : खाली दिलेला संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांतून निवडा
"सूरज तिकडे बघ कोण आलंय."
"येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे."
"अरे, तुझी ताई आली आहे, मला वाटते तुलाच शोधत आहे ती."
"ए अक्षय, सूरज दिसला का तुला ?"
"ताई, तो तिकडे कोर्टवर यशसोबत खेळतोय."
"त्याला आज आईसोबत मामांकडे जायचंय."
"पण ताई, उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना !"
"उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी-आजोबा पण आजच गावाहून आलेत, म्हणून आई आज चाललीये."
सूरज तइकडे जात म्हणाला, "मी नाही जात आईसोबत. ताई तूच जा !"
"पण आई तुझ्यासाठी थांबलीये, आता अंधार पण पडेल!"
"मला सराव करायचा आहे, मॅच नाही का उद्या ?"
"नुसता खेळतच असतो रे, अभ्यासला जराही वेळ देत नाहीस !"
"पण ताई, खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना !"
"ठीक आहे, तू थांब. मी सांगते आईला."
14) वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे ?
1) आठ 2) चार 3) पाच 4) सहा
15) वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी ?
1) संध्याकाळ 2) रात्र 3) दुपार 4) सकाळ
16) सूरजला मामांकडे का जायचे नव्हते ?
1) मित्र जाऊ देत नव्हते म्हणून 2) त्याची मॅच होती म्हणून
2) मामाचा वाढदिवस होता म्हणून 4) ताईचा राग आला होता म्हणून
17) खालील वाक्यातील चुकीचा भाग पर्यायांतून निवडा
अचानक इतक्यात जयेश ओरडला, "ए s s सा s s प ! तो बघ !"
1) इतक्यात 2) जयेश ओरडला, 3) "ए s s सा s s प ! 4) तो बघ !"
18) समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1) वात्सल्य - प्रेम 2) झिम्मड - रिमझिम 3) पर्वा - फिकीर 4) सदावर्त - अन्नछत्र
19) रिकाम्या जागी कोणती अक्षरे अनुक्रमे वापरल्यास गूढ, दृष्टी, निर्मिती या अर्थाचे शब्द मिळतील?
अ)__हन ब) न__र क) र__ना.
1) ग, ज, च 2) म, ज, च 3) ग, ज, का 4) कं, का, का
20) रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा
आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा राजू म्हणजे ____ च जणू
1) कुंभकर्ण 2) भाट 3) वामनमूर्ती 4) नारद
21) 'उपकाराखाली दबलेला' या शब्दसमुहासाठी अचूक पर्याय निवडा
1) कृतज्ञ 2) अपकार 3) पोरका 4) मिंधा
22) अयोग्य पर्याय निवडा
1) पिकत घातलेल्या आंब्यांची - अढी 2) केळींचा - घोस
3) काजूंची - गाथण 4) लाकडांची - मोळी
23) पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दूसरा येणारा शब्द कोणता?
विश्व, विषय, विजार, विचार, विसंवाद
1) विश्व 2) विषय 3) विसंवाद 4) विजार
24) अयोग्य पर्याय निवडा
1) यश x अपयश 2) सतेज x निस्तेज 3) काळजी x चिंता 4) स्वातंत्र्य x पारतंत्र्य
25) पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा
1) कापणी - सरोजिनी बाबर 2) वासरू - बालकवी
3) रानवेडी - तुकाराम धांडे 4) सुगी - बहिणाबाई चौधरी
--------------------------------------------
उत्तरे : 1-1, 2-4, 3-2, 4-3, 5-2, 6-4, 7-1, 8-3, 9-3, 10-2, 11-4, 12-4, 13-3, 14-1, 15-1, 16-2, 17-1, 18-2, 19-1, 20-3, 21-4, 22-2, 23-2, 24-3, 25-3
--------------------------------------------
फेब्रुवारी 2018 - सेक्शन - 1 - मराठी
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना - खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले. झाडावरदेखील खूपशा पक्षांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले, की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा आगोदर ते तेर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्याभोवती गिरट्या घातल्या, किलबिलाट केला; पण चेंडू कसला वस्ताद! तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही.
1) पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे ?
1) सकाळ 2) दुपार 3) रात्र 4) संध्याकाळ
2) 'आगंतुक पाहुणा' कोण आहे ?
1) चेंडू 2) दूसरा पक्षी 3) घरटे 4) निरुपद्रवी प्राणी
3) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही ?
1) अतिथी 2) द्विज 3) त्रासदायक 4) आराम
प्रश्न 4 ते 6 साठी सूचना - खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिकबंदी
नवी दिल्ली
'स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक' मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली.
सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरत करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
4) 'प्लास्टिकबंदी' हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे ?
1) स्वच्छ भारत, सुंदर भारत 2) स्वच्छ भारत, स्वच्छ स्मारक
3) स्वच्छ भारत, आमचा भारत 4) स्वच्छ स्मारक, स्वच्छ पर्यटक
5) मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले गेले ?
अ) स्वच्छतागृह ब) उपहारगृह क) प्लास्टिक वस्तू
1) फक्त ब 2) अ, ब आणि क 3) फक्त क 4) अ आणि ब
6) मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली गेली ?
1) 3 ऑक्टोबर 2) 31 जुलै 3) 2 ऑगस्ट 4) 1 ऑगस्ट
7) पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती ?
'अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडीदेखील छान चालली होती'
1) तीन 2) चार 3) दोन 4) पाच
8) पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय निवडा
1) नशीब 2) गुलाब 3) जबाब 4) हिशेब
9) पुढील वाक्याचा काळ ओळखा
आपण चमचमणार्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ
1) भूतकाळ 2) भविष्यकाळ 3) वर्तमानकाळ 4) साधाकाळ
10) पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता ?
1) अरण्यलिपी 2) उद्यमशील 3) निपचीत 4) तंत्रशुद्ध
11) पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय निवडा
1) वेळ 2) ढेकर 3) बाग 4) हिरा
12) अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा ________
वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
1) श्रीगणेशा करणे 2) निगराणी करणे
3) बंदोबस्त करणे 4) फन्ना उडवणे
13) पुढील अक्षरे जुळवून तयार होणार्या म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते ?
ल, पा, रा, ळे, खी, ल, चा, खी, तो, णी, त
1) पा 2) चा 3) णी 4) खी
प्रश्न क्र 14 ते 16 साठी सूचना : पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा
14) दुष्काळी प्रदेश ____ हिरवाईने नटला.
1) उन्हामुळे 2) पावसामुळे 3) महागाईमुळे 4) नापिकीमुळे
15) सर्व ____ दुथडी भरून वाहू लागले.
1) नदी-नाले 2) डबकी 3) तलाव 4) धरणे
16) निसर्गाच्या कृपेने बळीराजा ____
1) धास्तावला 2) झेपावला 3) सुखावला 4) निर्ढावला
17) पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही ?
1) युझर 2) प्रिंट 3) न्यूजपेपर 4) नेटवर्क
18) गटात न बसणारा शब्द निवडा
1) तुरंग 2) अश्व 3) वारू 4) कुंजर
19) 'शिक्षा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
1) प्रगती 2) बक्षीस 3) कृपा 4) प्रशंसा
20) खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा
1) सूर्यवंशी - लवकर झोपेतून उठणारा
2) लंकेची पार्वती - अंगावर दागिने नसलेली स्त्री
3) आतल्या गाठीचा - सगळं मनात ठेवणारा
4) सांगकाम्या - स्वतःच्या मनाने काहीही न करणारा
21) 'दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा' यासाठी योग्य शब्द असलेला पर्याय निवडा
1) उगम 2) निगम 3) संगम 4) निर्गम
22) खालील शब्दसमूह कोणत्या नामासाठी वापरला जातो ते निवडा
'मांदियाळी'
1) भक्तांची 2) धान्याची 3) करवंदांची 4) सैनिकांची
23) पुढीलपैकी अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1) गाय - वासरू 2) हरिण - शावक 3) वाघ - बछडा 4) मेंढी - करडू
24) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुळविली असता 'वीज' या अर्थाचा शब्द तयार होईल ?
1) नी, या, मि 2) मि, दा, नी, सौ 3) गि, त, णी, रं 4) गि, रा, णी
25) 'माझ्या भावाला कारल्याचा भाव जास्तच वाटला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ निवडा
1) भाऊ 2) अंदाज 3) दर 4) हिशेब
--------------------------------------------
उत्तरे : 1-4, 2-1, 3-3, 4-2, 5-4, 6-3, 7-1, 8-1, 9-2, 10-3, 11-4, 12-4, 13-1, 14-2, 15-1, 16-3, 17-3, 18-4, 19-2, 20-1, 21-3, 22-1, 23-4, 24-2, 25-3
--------------------------------------------
फेब्रुवारी 2017 - सेक्शन - 1 - मराठी
प्रश्न 1 ते 3 साठी सूचना - खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.
नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसर्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबूजे यांचे अमृततळे. कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली, की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत एक-दोन महीने सारखी वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही मग वीट येणे दूरच राहिले.
1) 'महाराष्ट्रमाता' कोणत्या नदीला म्हणतात ?
1) कृष्णा 2) वेण्णा 3) कोयना 4) गोदावरी
2) कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृततळे फुलतात ?
अ) काकड्या ब) कलिंगडे क) टरबूजे
1) अ, ब आणि क 2) फक्त अ आणि ब 3) फक्त अ 4) फक्त क आणि ब
3) पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यात आलेला नाही ?
1) मन न भरणे 2) पूर्ण करणे 3) कंटाळा येणे 4) चव घेणे
प्रश्न क्र. 4 ते 6 साठी सूचना - खालील कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडा
लहान, सुंदर, गोजिरवाणी दिसे कशी ही खार
गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार ||१||
लहान डोळे लुकलुक बघती, दृष्टी कितीतरी छान
खुटकन कोठे सहज वाजले, तरीही ऐकती कान ||२||
उभे करोनी शेपूट बैसे, ऐटीमध्ये फार
मालकीण की जणू रानाची दिसे अशी ही खार ||३||
काम करी ही आनंदाने, मधेच खेळे खेळ
दवडी नच ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ ||४||
भारी अचपळ जरी असशी, गरीब तरी तू फार
येईन भेटायास वनी तुजला वारंवार ||५||
4) कवीला, खार 'रानाची मालकीण' केव्हा वाटते ?
1) ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा 2) आनंदाने काम करते तेव्हा
3) गोजिरवाणी दिसते तेव्हा 4) ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा
5) वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती ?
1) गुलगुलीत अंग 2) लहान खार 3) लुकलुक डोळे 4) गोंडेदार शेपूट
6) कवितेतील 'अचपळ' या शब्दाचा अचूक अर्थ कोणता ?
1) मंद 2) चंचल 3) शांत 4) खोडकर
7) खालील वाक्यामध्ये एकूण किती नामे दिली आहेत ?
'सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे'
1) पाच 2) सात 3) सहा 4) चार
8) वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते ?
'पिंपाळची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली'
1) स्त्रीलिंग 2) पुल्लिंग 3) उभयलिंग 4) नपुंसकलिंग
9) खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे ?
"का आम्ही आहोत की," साधना आणि जया एकदम बोलल्या.
1) पूर्णविराम 2) प्रश्नचिन्ह 3) स्वल्पविराम 4) उद्गारवाचक चिन्ह
10) पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता ?
1) शिर्षक 2) कार्यक्रम 3) भवितव्य 4) ऐटीत
11) खालील वाक्याचा काळ ओळखा
'कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची.'
1) भविष्यकाळ 2) भूतकाळ 3) वर्तमानकाळ 4) साधाकाळ
12) अयोग्य जोडी निवडा
1) रुंजी घालणे - भोवती फिरणे 2) कोसळणे - जोरात पडणे
3) झेंडू फुटणे - झेंडूला फुले येणे 4) धूम ठोकणे - पळून जाणे
13) खालील अक्षरे वापरुन तयार होणार्या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता ?
ची, वी, वा, पो, वी, त्या, वा, टा, ची, ज्या, ळी, ळी, ज, खा
1) पुष्कळ लोक बोलतात तेच खरे असते 2) अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे
3) पैशाने सर्व कामे साध्य होतात 4) ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो
प्रश्न क्र. 14 ते 16 साठी सूचना - खालील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडा
"स्नेहल, तू रांगोळी काढ."
"बाई, मी साक्षीला सोबत घेऊ?"
"घे ना, पण लवकर काढा. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत."
"अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे."
"हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय, आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे."
"साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली ?"
"तुला माहीत नाही ! आपण 'लेक वाचवा' अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे."
"अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती."
"स्नेहल, झाली का तुमची कामं ? चला, कार्यक्रम सुरू होईल आता."
"झालंच आहे बाई, साक्षीने बघा किती छान रंग भरलेत !"
"हो ! पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी."
14) वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा ?
1) सहा 2) तीन 3) पाच 4) चार
15) वरील संवादावरुन शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही ?
1) पथनाट्य 2) बक्षीस समारंभ 3) विविध गुणदर्शन 4) स्नेहसंमेलन
16) वरील संवाद कोठे घडला असावा ?
1) व्हरांड्यात 2) मैदानावर 3) हॉलमध्ये 4) वर्गात
17) खाली दिलेल्या गटात माहिती-तंत्रज्ञानविषयक किती शब्द आहेत ?
मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल
1) पाच 2) सहा 3) चार 4) तीन
18) समानअर्थी शब्दांची अयोग्य जोडी निवडा
1) झणी - लवकर 2) अलगत - हळुवार 3) कवन - कविता 4) वेल - कुंज
19) 'मंजुळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा
1) नाजुक 2) गोड 3) कर्कश 4) मऊ
20) अं_ण, अं_र, अं_र, अं_न
वरील रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे भरल्यास चार अर्थपूर्ण शब्द तयार होतील
1) ग, जी, धा, ज 2) ज, ग, जी, धा 3) ग, ज, धा, जी 4) ग, ज, जी, धा
21) पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता ?
1) हालहवाल 2) शेतीवाडी 3) पाऊसपाणी 4) मनोमनी
22) रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा
राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे ______ तयार होते.
1) गट 2) जत्था 3) पथक 4) झुंड
23) दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास 'श्रद्धा' या शब्दाच्या अर्थाचा शब्द मिळेल ?
भा जा व बा र
1) 1ल्या व 3र्या 2) 1ल्या व 5व्या 3) 2र्या व 4थ्या 4) 4थ्या व 5व्या
24) दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा
'प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला.'
1) माळ 2) पराभव 3) दागिणा 4) ओझे
25) 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
1) संत ज्ञानेश्वर 2) संत गाडगेबाबा
3) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 4) संत तुकाराम महाराज
--------------------------------------------
उत्तरे : 1-4, 2-1, 3-2, 4-1, 5-3, 6-1, 7-3, 8-4, 9-2, 10-1, 11-2, 12-3, 13-2, 14-2, 15-1, 16-1, 17-3, 18-4, 19-3, 20-1, 21-4, 22-3, 23-4, 24-2, 25-3
--------------------------------------------
tags : class 5 scholarship exam Marathi, 5th scholarship question paper pdf download, 5th std scholarship exam sample papers, navneet scholarship books 5th std pdf marathi medium, 5th std scholarship books in marathi pdf, स्कॉलरशिप परीक्षा 2022 कधी आहे, स्कॉलरशिप परीक्षा 2022 इयत्ता पाचवी, Maharashtra Scholarship exam 2022, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 MSCE Pune, स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार बावीस, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, Maharashtra scholarship exam date 2022, scholarship exam questions and answers pdf
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू