MCQ समानार्थी शब्द

1) 'चपला' चा समान अर्थ नसलेला शब्द कोणता ?
1) स्त्री 2) विद्युल्लता 3) सौदामिनी 4) वीज

2) 'अजातशत्रू' चा समानार्थी शब्द कोणता ?
1) सर्व बाजूंनी शत्रू 2) कोणाशीही शत्रुत्व नसलेला 3) हितशत्रू 4) अनेक जातींचे शत्रू

3) 'भार्या' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) भारा 2) नवरा 3) कांत 4) पत्नी

4) 'सव्यापसव्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) आजूबाजूला 2) नसती उठाठेव 3) हमरीतुमरी 4) अघळपघळ

5) 'अंबर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) आकाश 2) संतोष 3) अंबुज 4) लोचन

6) 'मधुकर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) सखा 2) मधुर 3) मधमाशी 4) भ्रमर

7) 'खळ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) इन्द्रधनुष्य 2) सज्जन 3) दुर्जन 4) दंड

8) 'पाणिग्रहण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) मुंज 2) अर्ध्य 3) नमस्कार 4) विवाह

9) 'गडणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) पक्षी 2) मित्र 3) शत्रू 4) मैत्रीण

10) 'अश्वत्थ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वड 2) पिंपळ 3) कदंब 4) उंबर

11) 'सोने' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) ताम्र 2) हेम 3) लोह 4) काष्ठ

12) 'प्रदोष' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) विशेष दोष असलेले 2) दोष नसलेले 3) पहाटेचा समय  4) मुद्दाम दोष ठेवलेले

13) 'बोलभांड' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) बडबड्या 2) बोलता बोलता भांडणारा 3) भांडणावरुण बोलणारा 4) यापैकी नाही

14) 'पंक्तिप्रपंच' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) प्रपंचाची दिशा 2) पक्षपातीपणा 3) पंगतीमधील प्रपंच 4) संसारी पंगत

15) समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी ओळखा
1) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
2) घर- सदन, भवन, गृह, आलय
3) अमृत - सुधा, पीयूष, रस, चिरंजीवी
4) चंद्र - इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी

16) 'मग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) नंतर 2) मापन 3) वेळ 4) अगोदर

17) 'वीट' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) तीटकारा 2) तिरस्कार 3) कंटाळा 4) सिमेंट

18) 'सार्वजनिक' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) सर्वांमध्ये 2) सर्वत्र 3) सर्व ठिकाणी 4) सर्वजण

19) 'कर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) हात 2) उत्पन्नावरील अधिभार 3) किरण 4) वरील सर्व

20) 'खग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) घोडा 2) वाटा 3) द्विज 4) वारू

21) अली, मधुप, मिलिंद म्हणजे
1) डोंगर 2) भ्रमर 3) मकरंद 4) मधमाशी

22) 'कौमुदी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कमळ 2) चांदणे 3) होडी 4) कुमारिका

23) 'जल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अनल 2) सलिल 3) वात 4) सलील

24) 'मारुत' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) पर्वत 2) वारा 3) वावटळ 4) वादळ

25) 'वारू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वारा 2) चरणारा 3) चारचाकी 4) घोडा

26) 'चंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) ज्योत्स्ना, क्षीर 2) कौमुदी, चंद्रिका 3) इंदू, शशी       4) आदित्य, सविता

27) 'ताप' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) त्रास 2) वैताग 3) ज्वर 4) वरील सर्व

28) 'कलत्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) काल 2) रात्र 3) बायको 4) कपडा

29) 'तनू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) नाजूक 2) ताणणे 3) लहान 4) शरीर

30) 'किंकर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) दास 2) काकण 3) बांगड्या 4) अद्रक

31) 'वात' चा अर्थ नसलेला शब्द ओळखा
1) वारा 2) कनात 3) एक रोग 4) अनिल

32) 'डोळा' चा अर्थ नसलेला शब्द ओळखा
1) अक्ष 2) चक्षू 3) लोचन 4) दृश्य

33) 'भानू' चा अर्थ नसलेला शब्द ओळखा
1) सविता 2) आदित्य 3) मित्र 4) हेम

34) 'प्रणिपात' म्हणजे काय ?
1) नमस्कार 2) अभिवादन 3) नमन 4) वरील सर्व

35) 'अनुभूती' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वेगळेपणा 2) अनुभवी 3) साक्षात्कार 4) जाणीव

36) 'दंडक' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) सक्त 2) कडक 3) नियम 4) ताकीद

37) 'तनया' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) तनू  2) कन्या  3) कुलीन 4) आत्मा

38) 'वापिका व शुक' या शब्दांचे अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा
1) नदी-वीज 2) स्त्री-इंद्र 3) विहीर-पोपट 4) सूर्य-नानर

39) 'वल्लरी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) स्त्री 2) पान 3) लता 4) पावक

40) 'अनल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वारा  2) अणल 3) पावक 4) व्योम

41) 'कंदुक' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वेदना 2) खटाटोप 3) कुर्‍हाड 4) चेंडू

42) 'वैनतेय' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) गरुड 2) वायस 3) सारंग 4) मंडूक

43) 'प्रघात' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) चाबूक 2) पद्धत 3) आघात 4) घात

44) 'कावळा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वायस 2) एकाक्ष 3) काक 4) वरील सर्व

45) अ) तनुज, पादप  ब) मिलिंद, भ्रमर  क) सारंग, समीरण  ड) अली, मधुप या गटातील कोणते शब्द 'भुंगा' या शब्दासाठी वापरले जातात ?
1) फक्त अ 2) अ आणि ब 3) ब आणि ड 4) अ, ब, क, ड

46) 'दीन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) गरीब 2) दिवस 3) दयाळू 4) यापैकी नाही

47) खालील शब्दांतून 'वस्त्र व आकाश' हे अर्थ असलेला शब्द निवडा
1) नभा 2) गगन 3) पट 4) अंबर

48) 'जे खळांची व्यंकटी सांडो' अधोरेखित शब्दाचा अर्थ काय ?
1) खळबळ 2) धोरण 3) सज्जन 4) दुर्जन

49) खालीलपैकी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता ?
1) केसरी 2) पंचानन 3) मृगेंद्र 4) शाखामृग

50) 'नवोढा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कुमारिका 2) गृहिणी 3) लेकुरवाळी 4) नववधू

51) 'अभिनिवेश' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) जोम 2) अभिनय 3) गुंतवणूक 4) प्रवेश

52) 'अद्वैत' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वैर 2) ऐक्य 3) द्वंद्व 4) दुही

53) 'मिठी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) आवड 2) मिती 3) तिथी 4) प्रमाण

54) 'मौळी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) छातीचा पिंजरा 2) मस्तक 3) मान 4) गाल    

55) 'विमोचन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) मुक्ती 2) आकुंचन 3) प्रसारण 4) संश्लेषण

56) 'प्रतीती व प्रतीची' म्हणजे काय ?
1) संकेत व अनुभव 2) पश्चिम दिशा व अनुभव 3) अनुभव व पश्चिम दिशा 4) यापैकी नाही

57) 'प्रत्यही व प्रतीक' म्हणजे काय ?
1) नेहमी व संकेत 2) संकेत व नेहमी 3) प्रत्येक व संकेत 4) यापैकी नाही

58) 'द्विज' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) दात 2) ब्राम्हण 3) पक्षी 4) वरील सर्व

59) 'अश्व' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) वारू 2) हय 3) तुरंग 4) वरील सर्व

60) 'संगर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) नांगर 2) लढाई 3) सागर 4) संदल

61) विस्तव, पावक, अग्नी, वन्ही या शब्दांचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अमृत 2) अनल 3) अनिल 4) आकाश

62) 'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) चाप 2) कोदंड  3) तीरकमठा 4) वरील सर्व

63) 'मानमोहर' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) आदरसत्कार 2) मानवंदना 3) मानपत्र 4) मानपान

64) गटात न बसणारा शब्द कोणता ?
1) रवी 2) भानू 3) आदित्य  4) सुधाकर

65) गटात न बसणारा शब्द कोणता ?
1) सोम 2) शशी 3) इंदू 4) अर्णव

66) 'पिपीलिका' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) मुंगळा 2) मच्छर, डास 3) मुंगी 4) माशी

67) 'पाणी' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
1) पेय 2) क्षीर 3) जल 4) तोय 

 68) 'प्रमाण' या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते ?
1) पुरावा, आधार, प्रत्यंतर 2) माप, परिमाण, पातळी 3) आदर्श, नमूना, मापक   4) वरील सर्व

69) 'धुरीण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) नेता 2) धूळ 3) स्थिर 4) अग्नी

70) 'हलाहल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अमृत 2) हालहाल 3) विष 4) नांगर

71) 'पाणि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) पेय 2) जल 3) पाणिनी 4) हात

72) खालीलपैकी विसंगत शब्द कोणता ?
1) तडित 2) विद्युत 3) सौदामिनी 4) आकाश

73) 'हत्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) रवी 2) मधुप 3) सारंग 4) नंदन

74) 'योग्य व भांडे' हे दोन्ही अर्थ असणारा शब्द कोणता ?
1) कर 2) द्विज 3) पात्र 4) सुधा

75) 'अंक' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते ?
1) आकडा व मान 2) आकडा व मांडी 3) आकडा  व विशेषांक 4) मांडी व विशेषांक

76) 'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अनिल  2) समीर 3) समीरण 4) वरील सर्व

77) 'नाग' या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?
1) सर्प व हत्ती 2) सर्प व वाघ 3) सर्प व तुरंग 4) भुजंग व विहंग

78) 'मला गेह नाही' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय ?
1) धन 2) धर्म 3) गृह 4) हर्ष

79) 'लवण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) लावण्य 2) लावणी 3) मीठ 4) पीठ

80) 'थड' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) गार 2) किनारा 3) आधात 4) नदी

81) अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता ?
1) अमृत 2) गुलाब 3) कमळ 4) चंद्रिका

82) 'कानन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) विपिन 2) अरण्य 3) जंगल 4) वरील सर्व

83) खालीलपैकी समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती ?
1) कुंजर-सारंग 2) कनक-हेम 3) अर्णव-अनिल  4) भुज-बाहू

84) 'क्षमा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अभिनेत्री 2) क्षमस्व 3) पृथ्वी 4) ललना

85) 'ग्रह' या शब्दाला कोणते अर्थ आहेत ?
1) स्वीकार, सूर्यमालेतील गोल, समजूत 2) घर, स्वीकार, समजूत
3) इमारत, समजूत, पृथ्वी 4) घर, सूर्यमालेतील गोल, स्वीकार

86) 'काळोख' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अहन 2) तम 3) इंदू 4) यापैकी नाही
87) 'दिवस' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) इंदू 2) दीन 3) यामिनी 4) अहन

88) 'अमृत' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) सुधा 2) पीयूष 3) 1 व 2 दोन्ही 4) यापैकी नाही

89) 'अही' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कांता 2) भुजंग 3) पावक 4) मर्कट

90) 'कपी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कांता 2) भुजंग 3) पावक 4) मर्कट

91) 'लक्ष्मी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कमला 2) रमा, वैष्णवी 3) ज्योत्स्ना 4) वरील सर्व

92) 'अनघ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) ढग 2) मुलगा 3) निष्पाप 4) सुंदर

93) 'जरा' म्हणजे काय ?
1) म्हातारपण 2) तारुण्य 3) विधवा 4) पती

94) 'गारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) भरीव वस्तू 2) कमतरता 3) चिखल 4) अंबर

95) सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य शब्द कोणता ?
1) माता 2) धारणी 3) लक्ष्मी 4) मुलगी

96) 'अज' या शब्दाचा एक अर्थ बोकड असा आहे तर दूसरा अर्थ कोणता ?
1) माणूस 2) राक्षस 3) ईश्वर 4) गाढव

97) 'व्याज' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) कपट 2) सोंग 3) भाडे 4) वरील सर्व

98) 'भूपति' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) रमापती 2) उमापती 3) नरेश 4) दशानन

99) 'पायंडा व मृत्यू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अवसान व आरंभ 2) अलंकार व आळशी 3) आरंभ व अवसान 4) यापैकी नाही

100) 'ऐदी व आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) उत्साही व आवरण 2) उत्साही व अलंकार 3) आळशी व अलंकार 4) यापैकी नाही

101) 'उत्कर्ष' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अभ्युदय 2) अमाप 3) उदय 4) कमाल

102) 'गरुड' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) अद्री 2) वैनतेय 3) विहंग 4) अंडज

103) 'वेदांग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) शिक्षा 2) कल्प 3) 1 व 2 दोन्ही  4) यापैकी नाही

104) 


 

टिप्पण्या