1) अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा : अष्टपैलू
1) सर्वगुणसंपन्न 2) आठ पैलू असलेला 3) आठवडा 4) यापैकी नाही
2) अकलेचा कांदा
1) एक खाण्याचा पदार्थ 2) हुशार माणूस 3) मूर्ख 4) शहाणा
3) उंबराचे फूल
1) मोठे फूल 2) दुर्मिळ वस्तू 3) सहज मिळणारी वस्तू 4) झाड
4) कुंभकर्ण
1) रावणाचा भाऊ 2) खूप खादाड 3) अतिशय झोपाळू 4) हडकुळा
5) चर्पट पंजरी
1) पोपट 2) पाठांतर 3) निरर्थक बडबड 4) शत्रुत्व
6) जमदग्नी
1) साधू 2) माणूस 3) शांत माणूस 4) खूप रागीट माणूस
7) मेषपात्र
1) बावळट 2) मेंढा 3) भांडे 4) बैल
8) सूर्यवंशी
1) सूर्याचे वंशज 2) चांगले लोक 3) पुरुष 4) उशिरा उठणारा
9) पांढरा कावळा
1) निसर्गात नसलेली वस्तू 2) भाकडकथा 3) रंग 4) कावळा
10) रामबाण
1) अचूक गुणकारी 2) रामाचा बाण 3) थोर पुरुष 4) राजा
Answers: 1-1, 2-3, 3-2, 4-3, 5-3, 6-4, 7-1, 8-4, 9-1, 10-1
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू