१) महाराष्ट्रातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग ज्या शहरात एकत्रित मिळतात असा कोणता पर्याय बरोबर आहे ?
अ) NH6 व NH7 : नागपूर ब) NH3 व NH6 : धुळे क) NH6 व NH69 : नागपूर
ड) NH9 व NH13 : सोलापूर
१) अ, ब, ड २) ब, क, ड ३) अ, ब, क ४) अ, ब, क, ड
२) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
१) पश्चिम घाट २) सातपुडा रांगा ३) मेळघाट प्रदेश ४) चिखलदरा टेकड्या
३) सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
१) अती पर्जण्याचा प्रदेश २) ओल्या दुष्काळाचा प्रदेश ३) पर्जन्य छायेचा प्रदेश ४) तराई
४) महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे ?
१) पश्चिम महाराष्ट्र २) विदर्भ आणि मराठवाडा ३) कोकण ४) उत्तर महाराष्ट्र
५) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
१) वैतरणा २) तानसा ३) कोयना ४) शास्त्री
६) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) ठाणे २) पुणे ३) नाशिक ४) कोल्हापूर
७) खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?
१) पाली २) रांजणगाव ३) मोरगांव ४) गणपतीपुळे
८) उद्योग व त्यांचे स्थान यांच्या जोड्या लावा
अ) आय. टी. हार्डवेअर पार्क १) कुडाळ
ब) सिप्झ (SEEPZ) २) नाशिक
क) मेल्ट्रोन सेमीकंडक्टर्स लि. ३) मुंबई
ड) मायक्रो प्रॉसेसर आधारित प्रणाली प्रकल्प ४) द्रोणागिरी
१) अ-३, ब-१, क-४, ड-२ २) अ-१, ब-३, क-२, ड-४ ३) अ-४, ब-३, क-२, ड-१
९) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये _______ हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो
१) सागवान २) किंडल ३) आवळा ४) आईन
१०) महाराष्ट्रात दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर कोणत्या जिल्ह्यात होतो ?
१) ठाणे २) बृहन्मुंबई ३) रायगड ४) सांगली
११) महाराष्ट्रात दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर कोणत्या जिल्ह्यात होतो ?
१) ठाणे २) सोलापूर ३) रायगड ४) सांगली
१२) महाराष्ट्रात दरडोई औद्योगिक विजेचा सर्वात जास्त वापर कोणत्या जिल्ह्यात होतो ?
१) ठाणे २) औरंगाबाद ३) रायगड ४) कोल्हापूर
१३) महाराष्ट्रात दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर कोणत्या जिल्ह्यात होतो ?
१) ठाणे २) उस्मानाबाद ३) रायगड ४) लातूर
१४) खालील कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रती एक लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे
ब) नाशिक आणि सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता प्रती १०० चौ.किमी सर्वात अधिक आहे
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब दोन्ही ४) अ आणि ब दोन्ही चूक
१५) माथेरान हे _____ वस्तीचे उदाहरण आहे
१) रेषीय २) जुळी ३) गोलाकार ४) डोंगरमाथा
१६) खालीलपैकी कोणते तळे चंद्रपुर जिल्ह्यात नाही ?
१) ताडोबा २) नवेगाव ३) घोडझरी ४) असोलामेंढा
१७) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो ?
१) NH13 २) NH16 ३) NH17 ४) NH7
१८) खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास करणीभूत झाले आहेत ?
अ) सरळ समुद्र किनारा ब) विस्तीर्ण समुद्र बुड क) सहकारी संस्था ड) सरकारी आधार
१) अ, ब, क २) ब, क, ड ३) अ, क, ड ४) अ, ब, क, ड
१९) पर्यटन स्थळे व जिल्हे यांच्या जोड्या लावा
अ) राजापूर १) पुणे
ब) शिवापूर २) सातारा
क) मांढरदेव ३) रत्नागिरी
ड) हाजीमलंग ४) ठाणे
१) अ-२. ब-१, क-४, ड-३ २) अ-१, ब-३, क-२, ड-४ ३) अ-३, ब-१, क-२, ड-४
२०) खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे ?
१) कोराडी २) पारस ३) चोला ४) डहाणू
२१) तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प ब) आशियामधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प
क) अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प
ड) फ्रान्सच्या सहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात
१) अ, ब आणि क २) अ आणि ब ३) ड आणि क ४) ब, क आणि ड
२२) पर्यटन स्थळ आणि तेथील प्रसिद्ध ठिकाण यांच्या जोड्या लावा
अ) लोणावळा १) गाविलगड किल्ला
ब) पन्हाळा २) लिंगमळा
क) चिखलदरा ३) तुंगार्ली
ड) महाबळेश्वर ४) तबक उद्यान
१) अ-३. ब-४, क-१, ड-२ २) अ-४, ब-२, क-१, ड-३ ३) अ-२, ब-१, क-३, ड-४
२३) रेड्डी बंदर हे ______ च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे
१) आंबा २) नैसर्गिक वायू ३) कोळसा ४) लोह खनिज
२४) महाराष्ट्रातील ______ या जलविद्युत प्रकल्पास 'आर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा' असे संबोधले जाते
१) कोयना २) खोपोली ३) जायकवाडी ४) भिवपुरी
२५) १९५६ मध्ये तुर्भे येथे 'अप्सरा' ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास _____ या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले
१) फ्रान्स २) जर्मनी ३) जपान ४) ब्रिटन
२६) जिल्हा व डोंगर यांच्या जोड्या लावा
अ) औरंगाबाद १) गाळणा डोंगर
ब) नांदेड २) वेरूळ डोंगर
क) गडचिरोली ३) मुदखेड डोंगर
ड) धुळे ४) सुरजगड डोंगर
१) अ-२, ब-१, क-३, ड-४ २) अ-२, ब-३, क-४, ड-१ ३) अ-१, ब-३, क-२, ड-४
२७) महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
१) तापी २) वैनगंगा ३) नर्मदा ४) कृष्णा
२८) कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे ______ यांनी निश्चित केली आहे
१) अचरा ते दमणगंगा नदीपर्यन्त २) दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यन्त
३) तानसा ते गोड नदीपर्यन्त ४) वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यन्त
२९) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये _____ मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते
१) काळी २) तांबडी ३) गाळाची ४) जांभी
३०) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो
ब) चुनखडी खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणालीत आढळतो
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब ४) दोन्ही नाही
३१) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र 'भाट्ये' येथे आहे
ब) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब ४) दोन्ही नाही
३२) महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा
अ) सरकारी कालवे ब) खासगी कालवे क) विहिरी ड) तलाव
१) अ, ब, क, ड २) क, अ, ड, ब ३) क, अ, ब, ड ४) क, ब, अ, ड
३३) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) मालवण जवळील कुरटे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे
ब) एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर आढळतात
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब ४) दोन्ही नाही
३४) धबधबे आणि त्यांच्या ठिकाणांच्या जोड्या लावा
अ) मार्लेश्वर १) सातारा
ब) ठोसेघर २) रत्नागिरी
क) सौताडा ३) अहमदनगर
ड) रंधा ४) बीड
१) अ-२, ब-३, क-१, ड-४ २) अ-४, ब-३, क-२, ड-१ ३) अ-२, ब-१, क-४, ड-३
३५) खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?
१) उरण २) खापरखेडा ३) अंबरनाथ ४) परळी
३६) पर्जन्य छायेच्या प्रदेशात ____ चे स्थान आहे
१) महाड २) वाई ३) महाबळेश्वर ४) नाशिक
३७) खालीलपैकी भाताची कोणती जात संकरीत नाही ?
१) इंद्रायणी २) जया ३) हंसा ४) हिरामोती
३८) आदिवासी जात व त्यांच्या राहण्याचे प्रदेश यांच्या जोड्या लावा
अ) गोंड १) अमरावती जिल्हा
ब) भिल्ल २) ठाणे जिल्हा
क) कोरकू ३) धुळे व नंदुरबार जिल्हा
ड) वारली ४) चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा
१) अ-१, ब-२, क-३, ड-४ २) अ-२, ब-१, क-४, ड-३ ३) अ-४, ब-३. क-१, ड-२
३९) मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक _____ आहे
१) सोळा २) सतरा ३) अठरा ४) वीस
४०) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
१) औषध निर्माण २) कातडी वस्तू ३) कागद ४) होजिअरी
४१) महाराष्ट्रातील ______ हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे
१) नागपूर-चंद्रपूर २) रायगड-रत्नागिरी ३) मुंबई-पुणे ४) नाशिक-जळगाव
४२) महाराष्ट्रातील ______ या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात
१) नागपूर व गोंदिया २) सातारा व सांगली ३) धुळे व जळगांव ४) यवतमाळ व परभणी
४३) हापूस आंब्याची झाडे ______ जिल्ह्यात आढळतात
१) सिंधुदुर्ग २) रायगड ३) रत्नागिरी ४) वरील सर्व
४४) महाराष्ट्रातील ______ जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत
१) धुळे व नाशिक २) पुणे व नाशिक ३) सांगली व नाशिक ४) सातारा व नाशिक
४५) मान्सूनपूर्व पडणार्या सरींना महाराष्ट्रात ______ म्हणतात
१) चेरी ब्लॉझम शॉवर्स २) कालबैसाखी ३) नार्वेस्टर ४) आम्रसरी
४६) शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले ?
१) जागतिकीकरण २) आधुनिकीकरण ३) औद्योगीकरण ४) सर्व बरोबर
४७) नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचे कारण
१) शहरी जीवनाचा वाढता खर्च २) जागेची टंचाई
३) व्यावसायिक गतीशीलता ४) सर्व बरोबर
४८) वनहक्क कायद्याच्या बजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे ?
१) भंडारा २) ठाणे ३) गडचिरोली ४) चंद्रपूर
४९) रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते ?
१) दख्खनचा पठरी प्रदेश २) कोकणातील डोंगराळ प्रदेश
३) कोकण किनारपट्टीची चिंचोळी मैदाने ४) भामरागडचा डोंगरी प्रदेश
५०) महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
१) ईशान्य २) पश्चिम ३) आग्नेय ४) मध्य
५१) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
१) भूप्रक्षोभ २) संचयन ३) भूकंप ४) भ्रंशमूलक उद्रेक
५२) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजसंपत्ती विपुल आहे ?
१) पुणे २) चंद्रपूर ३) बीड ४) सोलापूर
५३) महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?
१) औष्णिक विद्युत ऊर्जा २) आण्विक ऊर्जा ३) जल विद्युत ऊर्जा ४) यापैकी नाही
५४) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात ______ मृदा आढळते
१) गाळाची मृदा २) रेगुर मृदा ३) वन मृदा ४) जांभी मृदा
५५) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) बॉक्साईटपासून क्रोमाईटचे उत्पादन केले जाते
ब) सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते
क) पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत
१) अ, ब बरोबर २) ब, क बरोबर ३) सर्व बरोबर ४) सर्व चूक
५६) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत
ब) जांभा दगड हा बेसाल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो
क) महाराष्ट्राच्या ८०% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत
१) अ, ब बरोबर २) अ, क बरोबर ३) सर्व बरोबर ४) सर्व चूक
५७) अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
१) सिंधुदुर्ग २) कणकवली ३) राजेवाडी ४) वसई
५८) राज्यात ______ जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे
१) सिंधुदुर्ग २) गडचिरोली ३) लातूर ४) सोलापूर
५९) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) ठाणे जिल्ह्यातील अकलोली येथे गरम पाण्याचे झरे आहेत
ब) ऊरुळी कांचन येथे वैद्यकीय पर्यटन केंद्र आहे
१) अ, ब बरोबर २) फक्त ब बरोबर ३) फक्त अ बरोबर ४) सर्व चूक
६०) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) सर्व पोलिस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे
ब) सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे
१) अ, ब बरोबर २) दोन्ही चूक ३) फक्त अ बरोबर ४) फक्त ब बरोबर
६१) सोलापूर-धुळे महामार्गावर प्रवास करताना अनुक्रमे कोणती शहरे लागतात ?
अ) तुळजापूर ब) लातूर क) बीड ड) उस्मानाबाद इ) चाळीसगाव
१) अ, ब, ड, इ २) अ, ड, क, इ ३) अ, ब, क, इ ४) अ, ब, क, ड, इ
६२) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणार्या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय असे आहेत
ब) महाराष्ट्रामध्ये गुजराती, तेलगु, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणार्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणार्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे
१) अ, ब बरोबर २) दोन्ही चूक ३) फक्त अ बरोबर ४) फक्त ब बरोबर
६३) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) मुंबईत २६ जुलै २००५ रोजी ९०० मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला होता
ब) मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते
क) दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते
१) अ, ब बरोबर २) ब, क बरोबर ३) फक्त अ बरोबर ४) सर्व बरोबर
६४) गाय व तिचे आढळस्थान याच्या जोड्या लावा
अ) देवणी १) अहमदनगर
ब) डांगी २) नागपूर
क) गौळाऊ ३) उस्मानाबाद
ड) सोरटी ४) रायगड
१) अ-४, ब-३, क-२, ड-१ २) अ-३, ब-४, क-१, ड-२ ३) अ-३, ब-४, क-२, ड-१
६५) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात
१) योग्य २) अयोग्य
६६) विधाने पाहून योग्य पर्याय निवडा
अ) २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४५.२% लोकसंख्या नागरी भागात राहते
ब) २००१ मध्ये हेच प्रमाण ४२.४% होते
१) अ, ब बरोबर २) फक्त ब बरोबर ३) फक्त अ बरोबर ४) सर्व चूक
६७) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण
१) उन्हाळ्यात पाऊस पडत नाही २) उन्हाळ्यात तापमान जास्त असते
३) उन्हाळ्यात हवामान विषम असते ४) बाष्पीभवन कमी करण्यासाठी
६८) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) सहस्त्रकुंड धबधबा पेनगंगा नदीवर आहे ब) वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब दोन्ही ४) अ आणि ब दोन्ही चूक
६९) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते ?
१) हिमाचल प्रदेश २) महाराष्ट्र ३) गुजरात ४) राजस्थान
७०) देशातील घन कचर्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या पालिकेने सुरू केला आहे ?
१) पिंपरी चिंचवड २) पुणे ३) नागपूर ४) ठाणे
७१) कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो ?
१) सिंधुदुर्ग २) रत्नागिरी ३) सातारा ४) कोल्हापूर
७२) कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापूंजी असे म्हटले जाते ?
१) माथेरान २) आंबोली ३) रामटेक ४) लोणावळा
७३) कोणता जिल्हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?
१) पुणे २) ठाणे ३) कोल्हापूर ४) नागपूर
७४) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
१) लोणंद २) पाडेगाव (सातारा) ३) शेखमिरेवाडी ४) कागल
७५) जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो ?
अ) शनिवार वाडा व शिंद्यांची छत्री ब) अजिंठा आणि वेरूळ
क) कसचे पठार व छत्रपती शिवाजी टर्मिनस ड) नांदेड गुरुद्वारा व संत ज्ञानेश्वर समाधी
१) अ आणि ब २) ब आणि क ३) फक्त ब ४) वरील सर्व
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू