१) गो. ग. आगरकरांचा 'सुधारक' हे वृत्तपत्र काढण्यामागचा उद्देश काय होता ?
१) पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार २) स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार ३) नवीन वैचारिक दृष्टीकोणाचा स्वीकार ४) व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार
२) महर्षी कर्वे यांनी १९४४ मध्ये स्थापन केलेला 'समता संघ' पुढे कोणत्या संस्थेत अंतर्भूत झाला ?
१) जाती निर्मूलन संस्था २) स्त्री-पुरुष समानता संघ ३) स्त्री-पुरुष शिक्षण संघ ४) सर्व धर्मीय संघ
३) 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते ?
१) जगन्नाथ शंकर शेठ २) बाळशास्त्री जांभेकर ३) भाऊ दाजी लाड ४) छत्रपती शाहू महाराज
४) 'पंडिता रमाबाई' यांच्याशी निगडीत चुकीचे विधान ओळखा
१) शारदासदन आणि मुक्तिसदनची स्थापना २) 'स्त्रीकोश' पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन
३) निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन व प्रितीसदन ४) त्यांना 'कैसर-ई-हिंद' ही पदवी बहाल
५) कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
१) नंदाताई गवळी २) जाईबाई चौधरी ३) वेणूताई भटकर ४) तुळसाबाई बनसोडे
६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या ?
१) अस्पृश्यता व जातिभेद निवारण २) पडदा पद्धतीस विरोध ३) बालविवाहास विरोध
४) सतीच्या चालीस बंदी
७) 'सेवासदन' या संस्थेचा उद्देश काय होता ?
अ) हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे
क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
१) अ, ब आणि क २) फक्त अ आणि ब ३) अ, ब आणि ड ४) वरील सर्व
८) 'ज्ञानोदय' मधील लिखाणास प्रतीउत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली ?
अ) विचारलहरी ब) चंद्रिका क) सद्धर्मदीपिका ड) इंदूप्रकाश
१) फक्त अ २) ब आणि क ३) फक्त ड ४) अ, ब आणि क
९) पुढील विधानांमध्ये कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा
अ) १८७५ पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे ब) त्यांनी पुण्यात 'सुशिक्षणगृह' सुरू केले
क) विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या ड) १८७३ पासून कार्याला सुरुवात
१) आर्य महिला समाज २) सत्यशोधक समाज ३) प्रार्थना समाज ४) ब्राम्हो समाज
१०) 'डेक्कन रयत समाज' ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ?
अ) आण्णासाहेब लठ्ठे ब) वालचंद कोठारी क) मुकुंदराव पाटील ड) दिनकरराव जवळकर
१) अ, ब आणि क २) फक्त अ आणि ब ३) फक्त क आणि ड ४) फक्त क
११) गो. ग. आगरकरांनी 'बालविवाह' ही प्रथा बंद करण्यासाठी 'कायद्याने ही प्रथा बंद करावी' अशी बाजू कोणत्या साप्ताहिकातून मांडली ?
१) मराठा २) केसरी ३) मूकनायक ४) दर्पण
१२) आगरकर हे पंडिता रामबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते ?
१) महिलाश्रम २) स्त्री-सुधारकेंद्र ३) कृपासदन ४) शारदासदन
१३) महात्मा फुले यांच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित होता ?
१) सामाजिक स्थितीवर २) धार्मिक स्थितीवर ३) स्त्रियांच्या स्थितीवर ४) शैक्षणिक स्थितीवर
१४) सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ?
१) स्त्री-गुलामगिरी २) धार्मिक गुलामगिरी ३) सामाजिक गुलामगिरी ४) शेतकर्यांची गुलामगिरी
१५) शाहू महाराजांचे वर्णन' नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत' या शब्दांत कोणी केले आहे ?
१) धनंजय कीर २) रा. ब. पारसणीस ३) वि. रा. शिंदे ४) य. दि. फडके
१६) कोणता कायदा म्हणजे स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे शाहू महाराजांचे एक क्रांतिकारी पाऊल होते ?
१) विधवा पुनर्विवाह कायदा २) आंतरजातीय विवाह कायदा ३) घटस्फोटाचा कायदा
४) वारसाचा कायदा
१७) महर्षी कर्वे यांनी ३ जून १९१६ रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली ?
१) अमेरिका वुमेन्स यूनिवर्सिटी २) मॉस्को वुमेन्स यूनिवर्सिटी ३) जपान वुमेन्स यूनिवर्सिटी
४) फ्रान्स वुमेन्स यूनिवर्सिटी
१८) ______ मधील डॉ. आंबेडकरांचे लेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होत ?
१) मूकनायक २) बहिष्कृत भारत ३) समतापत्र ४) प्रबुद्ध भारत
१९) सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता ?
१) मानवता धर्मानुसार नवसमाजाची निर्मिती २) इंग्रजी शासनाला विरोध
३) धार्मिक भावना रुजविणे ४) लोकशाहीचा पुरस्कार
२०) गोपाळ गणेश आगरकर धार्मिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत ?
१) मराठा २) केसरी ३) ज्ञानप्रकाश ४) दर्पण
२१) महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राम्हणेतराने मोठ्या धैर्याने, परोपकार बुद्धीने ब्राम्हण विधवांसाठी काढली ?
१) अनाथालय २) बालहत्या प्रतिबंध गृह ३) महिलाश्रम ४) पुनर्विवाह मंडळ
२२) मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली ?
१) नारायण लोखंडे २) श्रीपाद डांगे ३) नारायण जोशी ४) डॉ. आंबेडकर
२३) महात्मा फुलेंनी १८५५ साली लिहलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे ?
१) शेतकर्यांवर २) अस्पृश्यांवर ३) ब्राम्हणी मूर्तीपूजेवर ४) स्त्री दास्यावर
२४) डॉ. आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला ?
१) शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन २) स्वतंत्र मजूर पक्ष ३) समता पक्ष ४) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
२५) राजर्षी शाहू महाराजांनी १९११ मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला ?
१) आर्य समाज २) सत्यशोधक समाज ३) प्रार्थना समाज ४) ब्राम्हो समाज
२६) राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता ?
१) दलित बोर्डिंग २) मुस्लिम बोर्डिंग ३) वसतिगृह ४) मराठा बोर्डिंग
२७) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९९ मध्ये सुरू केलेल्या 'अनाथाश्रम' चा उद्देश काय होता ?
१) अनाथ मुलींना शिक्षण २) विधवांना शिक्षण ३) विधवा पुनर्विवाहितांना आधार ४) विधवांच्या मुलांना शिक्षण
२८) 'मानवी समता' हे मासिक कोणी चालू केले ?
१) बाळशास्त्री जांभेकर २) धोंडो केशव कर्वे ३) महात्मा फुले ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२९) राजर्षी शाहू महाराजांनी 'क्षात्रजगदगुरु' या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली ?
१) गंगाधर कांबळे २) सदाशिव लक्ष्मण पाटील ३) नारायण भटजी ४) दत्तोबा साळवी
३०) डॉ. आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी 'जनता पत्र' व ______ या वृत्तपत्रांचा वापर केला
१) मूकनायक २) सुधारक ३) वर्तमान दीपिका ४) विचारलहरी
३१) जातिभेद व अस्पृश्यता निवरणासाठी ______ यांनी १९४४ मध्ये 'समता मंच' स्थापन केला
१) गोपाळ कृष्ण गोखले २) अनी बेझंट ३) महर्षी धोंडो केशव कर्वे ४) न्यायमूर्ती रानडे
३२) धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान व संरक्षण या विषयाबाबत दूरदर्शी संकल्पना सर्वप्रथम ______ यांनी मांडल्या
१) न्या. रानडे २) महात्मा जोतिबा फुले ३) महाराजा सयाजीराव गायकवाड ४) लोकमान्य टिळक
३३) ______ म्हणाले की, "सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे"
१) आर. जी. भांडारकर २) जी. के. गोखले ३) डी. के. कर्वे ४) जी. जी. आगरकर
३४) राजर्षी शाहू महाराज १९२० साली ______ येथे झालेल्या ब्राम्हणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते
१) हुबळी २) कोल्हापूर ३) बेळगाव ४) माणगाव
३५) डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत _________ ची मागणी केली
१) स्वतंत्र मतदारसंघ २) आरक्षण ३) स्त्री शिक्षण ४) मंदिर प्रवेश
३६) _______ हे सामाजिक क्रांतिचे जनक होते
१) भाऊ दाजी लाड २) विष्णुशास्त्री चिपळूणकर ३) डॉ. आंबेडकर ४) महात्मा फुले
३७) राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ?
१) बडोदा २) राजकोट ३) जयपूर ४) ग्वाल्हेर
३८) अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 'डिप्रेस्ड क्लासेस एजुकेशन सोसायटी' ची स्थापना कोणी केली ?
१) वि. रा. शिंदे २) डॉ. आंबेडकर ३) डी. के. कर्वे ४) महात्मा फुले
३९) मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली ?
१) जगन्नाथ शंकरशेठ २) महात्मा फुले ३) विष्णुशास्त्री चिपळूणकर ४) डॉ. आंबेडकर
४०) डॉ. आंबेडकरांनी आपला 'हू वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?
१) मार्टिन ल्युथर २) महात्मा फुले ३) वि. रा. शिंदे ४) महात्मा गांधी
४१) महात्मा फुले यांच्या ______ या ग्रंथाचा 'विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' या शब्दांत गौरव केला जातो
१) गुलामगिरी २) शेतकर्याचा आसूड ३) सार्वजनिक सत्यधर्म ४) ब्राम्हणाचे कसब
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू