1) 'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीचा खाली दिलेल्यांपैकी योग्य अर्थ कोणता ?
1) तळे हे थेंब थेंब पाणी साठूनच तयार होते
2) तळ्यात थेंब साठतात
3) पावसाचे थेंब थेंब पाणी पडून तळे बनते
4) कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो
2) 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' या म्हणीचा अर्थ काय ?
1) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे
2) परस्पर दुसर्याची वस्तू तिसर्याला देणे
3) स्वतःवरील संकट दुसर्यावर ढकलणे
4) स्वार्थी वृत्तीने वागणे
3) 'जसे करावे तसे भरावे' म्हणजे काय ?
1) आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे
2) पापाला प्रायश्चित्त मिळणे
3) जेवढे नुकसान तेवढी भरपाई
4) वाईटाचे फळ वाईट मिळणे
4) 'नावडतीचे मीठ अळणी' या म्हणीचा अर्थ काय ?
1) नावडतीचे मीठ अळणी असते
2) नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
3) नावडत्याने केलेले कार्य अळणी मिठासारखे असते
4) वरीलपैकी एकही नाही
5) 'पळसाला पाने तीनच' या म्हणीचा अर्थ काय ?
1) पळसाची झाडे सर्व सारखीच दिसतात
2) पळसाच्या देठाला तीनच पाने असतात
3) पळसाच्या देठाला पाने तीन असली तरी झाड शोभून दिसते
4) कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यतः सारखीच असते
6) 'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' या म्हणीचा अर्थ काय ?
1) फुंकल्याने डोळ्यात केर जातो
2) रोगावर अनेक उपाय
3) रोग एक आणि उपाय निराळाच
4) उपायाशिवाय रोग बरा होत नाही
7) 'उथळ पाण्याला खळखळाट फार' म्हणजे काय ?
1) उथळ पाणी खळखळ वाहते
2) अल्पज्ञान; पण ताठा फार
3) उथळ पाणी चांगले असते
4) उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते
8) 'काखेत कळसा गावाला वळसा' म्हणजे काय ?
1) काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे
2) एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे
3) वस्तू जवळच असूनही ती शोधत फिरणे
4) नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्विकारणे
9) 'दृष्टीआड सृष्टी' या म्हणीचा अर्थ काय ?
1) आपल्यामागे काय चालते ते दिसू शकत नाही
2) दृष्टीशिवाय सृष्टी दिसत नाही
3) दुर्लक्ष करणे
4) दृष्टीत दोष असणे
10) 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' म्हणजे काय ?
1) बोलल्याप्रमाणे कृती करणार्यास मान द्यावा
2) खरे बोलनार्याचे पाय वंदावे
3) वंदन करणे चांगले
4) बोलणार्याचा मान राखावा
11) 'उंटावरचा शहाणा' म्हणजे काय ?
1) मूर्खासारखा सल्ला देणारा
2) शहाणपण शिकवणारा
3) योग्य सल्ला देणारा
4) मदत करणारा
12) 'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा अर्थ काय ?
1) कोल्हा काकडी खातो
2) लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात
3) कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच
4) चतुर माणसे संकटावर मात करतात
13) 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे' या म्हणीचा अर्थ काय ?
1) विनाकारण छळ सहन करणे
2) अगतिक स्थिती होणे
3) विनातक्रार छळ सहन करणे
4) न बोलता मार सहन करणे
14) 'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हातार्याला आले बाळसे' या म्हणीचा अर्थ काय ?
1) तरुण म्हातारे दिसतात आणि म्हातारे तरुण दिसतात
2) अस्वाभाविक; पण उलटा प्रकार आढळून येणे
3) नको त्याला नको ते मिळणे
4) उलटे पडणे
15) 'कानामागून येणे नि तिखट होणे' म्हणजे काय ?
1) मागून येऊन वरचढ होणे
2) कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे
3) डोईजड होणे
4) मागून येऊन मोठेपण मिळणे
16) 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' या म्हणीचा अर्थ काय ?
1) दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
2) स्वतःचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
3) आईला बाईचा आधार असणे
4) आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून असते
17) 'आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला' म्हणजे काय ?
1) ज्या दोषाबद्दल इतरांना हसतो तो दोष आपल्या अंगी असणे
2) गरजेमुळे अडनार्याला दुसर्याचे बोलणे ऐकावे लागते
3) दुसर्याचे वाईट चिंतले की ते आपल्यावरच उलटते
4) दोषाबद्दल दुसर्याला हसावे
18) 'ये रे कुत्र्या, खा माझा पाय' म्हणजे काय ?
1) भूतदया दाखविणे
2) आपणहून संकट ओढवून घेणे
3) एखाद्याला कुत्रा म्हणून त्याचा अपमान करणे
4) त्याग करण्याची तयारी ठेवणे
19) 'रात्र थोडी सोंगे फार' या म्हणीचा अर्थ काय ?
1) सोंगे करायला रात्र पुरत नाही
2) रात्रीचा वेळ कामात चटकन जातो
3) कामे भरपूर; पण वेळ थोडा
4) रात्री कामे भरभर होत नाहीत
20) 'साखरेचे खाणार त्याला देव देणार' म्हणजे काय ?
1) गोड खाल्ले, की देव भरपूर देतो
2) देवाने दिले तर गोड खावे
3) जो चांगली इच्छा करतो, त्याला चांगला लाभ होतो
4) जशी इच्छा तसे फळ मिळत नाही
21) 'अर्धी टाकून सगळीसाठी धावू नये' म्हणजे काय ?
1) सबंध वस्तूमागे धावताना अर्धीही बरोबर न्यावी
2) सबंध वस्तूपेक्षा अर्धी वस्तू कधीही श्रेयस्कर
3) सबंध वस्तू मिळविण्यासाठी मिळालेली अर्धी टाकू नये, परिणामी दोन्ही जातात
4) यापैकी नाही
22) 'असतील शिते तर जमतील भुते' या म्हणीचा अर्थ काय ?
1) शिताभोवती भुते गोळा होतात
2) भुतांना शिते फार आवडतात
3) जवळ माया असेल तर नातेवाईक मंडळी जमतात
4) शिते टाकून भुते गोळा करता येतात
23) 'आपली पाठ आपणास दिसत नाही' या म्हणीचा अर्थ काय ?
1) स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही
2) स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत
3) आपले दोष शोधले पाहिजेत
4) आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते दिसत नाही
24) 'तळे राखी तो पाणी चाखी' या म्हणीचा अर्थ काय ?
1) तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही
2) तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच
3) ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच
4) तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो
25) 'बैल गेला अन झोपा केला' या म्हणीचा अर्थ कोणता ?
1) एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे
2) एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे
3) बैल मेल्यावर निवारा करणे
4) एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे
26) 'विंचवाचे बिर्हाड पाठीवर' या म्हणीचा अर्थ काय ?
1) विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बिर्हाड घेऊन फिरावे लागते
2) गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे
3) गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे
4) गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे
27) 'राजाला दिवाळी काय माहीत ?' म्हणजे काय ?
1) राजाची दिवाळी रोजचीच असते
2) श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही
3) रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही
4) सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात
28) म्हण पूर्ण करा - 'अडाण्याची मोळी_____'
1) भलत्यासच जाळी
2) भलत्यासच मारी
3) भलत्यासच गिळी
4) भलत्यासच टाळी
29) 'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा अर्थ कोणता ?
1) खोल पाण्यात बुडणे
2) अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे
3) जीव वाचविता न येणे
4) खोल खड्ड्यात जाने
30) म्हण पूर्ण करा - 'पदरी पडले झोंड______'
1) हासून केले गोड
2) रडून केले खोंड
3) हसत झेलली धोंड
4) मारून केले गोड
31) 'भीक नको; पण कुत्रा आवर' या म्हणीचा अर्थ काय ?
1) चांगले करायला गेले असता वाईट घडणे
2) भीक मागायला गेले असता कुत्रा अंगावर येणे
3) उपकार नकोत, पण छळ आवर
4) मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे
32) 'दाम करी काम' म्हणजे काय ?
1) पैशांच्या सहाय्याने काम होणे
2) सर्व सेवा पैशाने प्राप्त होतात
3) पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे
4) दाम अधिक तर काम अधिक
33) 'ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी' या म्हणीचा अर्थ काय ?
1) एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात
2) बोरी व बाभळी एकाच गावात असणे
3) मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे
4) जसे करावे तसे भरावे लागते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू