१. १९२३ साली 'भारतीय हिंदू शुद्धी महासभा' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) वि. दा. सावरकर २) लाला हंसराज ३) स्वामी दयानंद ४) स्वामी श्रद्धानंद
२. फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला ?
१) रमाबाई रानडे २) अवंतिकाबाई जोशी ३) हंसा मेहता ४) लक्ष्मी स्वामिनाथन
३. १७ जून १९४८ ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ?
१) न्या. एस. के. दार २) एस. के. पाटील ३) ब्रिजलाल बियाणी ४) काकासाहेब गाडगीळ
४. जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व कोणी केले ?
१) रमाबाई रानडे २) अवंतिकाबाई जोशी ३) हंसा मेहता ४) लक्ष्मी स्वामिनाथन
५. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले ?
१) कृष्णाजी सदाशिव सिंदकर २) व्यंकटराव व बापूजी ३) रामजी सिरसाट ४) बाबासाहेब शिर्के
६. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि _____ यांची सही होती.
१) बाळशास्त्री जांभेकर २) जगन्नाथ शंकरशेठ ३) पंडिता रमाबाई ४) वि. रा. शिंदे
७. 'भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) वि. रा. शिंदे २) भाऊराव पाटील ३) डॉ. बी.आर. आंबेडकर ४) महात्मा फुले
८. महाराष्ट्रातील वाघ्या-मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली ?
१) लोकमान्य टिळक २) वि. रा. शिंदे ३) गो. ग. आगरकर ४) महर्षी कर्वे
९. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने _____ यांना आजीव सदस्यत्व बहाल केले होते
१) बाळशास्त्री जांभेकर २) महात्मा गांधी ३) महात्मा फुले ४) धों. के. कर्वे
१०. लोकमान्य टिळकांशी संबंधित घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा
अ) साराबंदी मोहीम ब) गणेश उत्सव क) होमरूल लीग ड) छ. शिवाजी उत्सव
१) अ, क, ब, ड २) अ, ब, क, ड ३) ब, ड, अ, क ४) ड, क, ब, अ
११. 'बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन' चे संस्थापक सदस्य कोण होते ?
अ) के. टी. तेलंग ब) फिरोजशाहा मेहता क) बदृद्दीन तय्यबजी ड) म. गो. रानडे
१) अ, ब, ड २) ब, क, ड ३) अ. ब, क ४) क, ड, अ
१२. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता ?
अ) खानदेशात ब) नगर जिल्ह्यात क) कोल्हापूर ड) सोलापूर
१) अ आणि ब २) क आणि ड ३) फक्त ड ४) फक्त अ
१३. १९१२ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात अस्पृश्य व ब्राम्हण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता ?
१) वि. रा. शिंदे २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) धों. के. कर्वे ४) शाहू महाराज
१४. जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम _____ या समाजसुधारकाने मांडला
१) महात्मा फुले २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) महर्षी शिंदे ४) राजा राममोहन रॉय
१५. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरविली ?
१) वि. रा. शिंदे २) महात्मा फुले ३) धों. के. कर्वे ४) गो. ग. आगरकर
१६. १८९१ साली 'भाला' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
१) शि. म. परांजपे २) भास्करराव भोपटकर ३) मुकुंद पाटील ४) कृष्णराव जवळकर
१७. अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
१) १९०० २) १९०१ ३) १९०३ ४) १९०४
१८. १९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकर्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली ?
१) महात्मा गांधी २) साने गुरुजी ३) महात्मा फुले ४) वि. रा. शिंदे
१९. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकरी मिळावी म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली ?
१) शिवराम जानबा कांबळे २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) बी. सी. कांबळे ४) गोपाळबुवा वलंगकर
२०. नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
१) बाजीराव २) बाळाजी विश्वनाथ ३) बाळाजी बाजीराव ४) रघुनाथराव
२१. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी ______ ह्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली
१) डॉ. भालचंद्र मुणगेकर २) डॉ. विजय भटकर ३) डॉ. नरेंद्र जाधव ४) डॉ. वसंत गोवारीकर
२२. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले ?
१) अखिल भारतीय हिंदू महिला परिषद २) अखिल भारतीय महिला परिषद ३) अखिल महिला धर्म परिषद ४) अखिल भारतीय आर्यभगिनी परिषद
२३. खालीलपैकी कोणी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशउत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे ?
१) वि. दा. सावरकर २) बाळ गंगाधर टिळक ३) दामोदर हरी चाफेकर ४) नरसिंह चिंतामण केळकर
२४. कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांना दारूगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा काढून देणारी यांत्रिकी अभियंता होती ?
१) दामू जोशी २) राजाराम वझे ३) भालचंद्र केतकर ४) रामचंद्र गोखले
२५. कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात 'पीरखान' या नावाने सक्रिय सहभाग घेतला ?
१) पांडुरंग सदाशिव खानखोजे २) राम बिहारी बोस ३) लक्ष्मण शर्मा ४) गजानन पाठक
२६. लेखक व त्यांनी लिहलेल्या नाटकांच्या जोड्या जुळवा
अ) वासुदेव पुरुषोत्तम साठे १) वंगभंग
ब) अनंत वामन बर्वे २) स्वदेशीची चळवळ
क) लक्ष्मण नारायण जोशी ३) भीमराव
ड) इस्माईल युसुफ ४) महाराणा प्रताप सिंह
१) अ-१, ब-४, क-३, ड-२ २) अ-१, ब-२, क-३, ड-४ ३) अ-२, ब-१, क-४, ड-३
२७. 'संयुक्त महाराष्ट्र सभा' ची स्थापना कोठे झाली ?
१) मुंबई व पुणे २) मुंबई ३) मराठवाडा ४) बेळगांव
२८. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ?
१) प्रेमा कंटक २) कृष्णा घुटकर ३) अवंतिकाबाई गोखले ४) अरुणा आसफ अली
२९. १८३९ मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला ?
१) कोळी २) भिल्ल ३) वारली ४) कथकरी
३०. 'महात्मा मुन्शी राम विज' म्हणजेच _______
१) पं. मालविय २) स्वामी श्रद्धानंद ३) स्वामी स्वरुपानंद ४) स्वामी दयानंद
३१. 'न्यू इंग्लिश स्कूल पुणे' चे संस्थापक सदस्य कोण होते ?
अ) लोकमान्य टिळक ब) गो. ग. आगरकर क) विष्णुशास्त्री चिपळूणकर ड) दा. पां. तर्खडकर
१) फक्त अ २) अ आणि ब ३) अ, ब आणि क ४) वरील सर्व
३२. १८५७ च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते ?
अ) काजीसिंग नाईक ब) भीमा नाईक क) भागोजी नाईक ड) दौलतसिंग
१) फक्त अ २) फक्त ब आणि क ३) अ, ब आणि क ४) वरील सर्व
३३. आर्थिक व कृषिविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले ?
१) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन २) इंडियन असोसिएशन ३) पुणे सार्वजनिक सभा ४) मद्रास असोसिएशन
३४. १८५५ च्या अँग्लो-अफगाण युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबीयांना मुंबईत फंड गोळा करून कोणी आर्थिक मदत केली ?
१) बाळशास्त्री जांभेकर २) लोकमान्य टिळक ३) भाऊ दाजी लाड ४) दादाभाई नौरोजी
३५. १८६९ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते ?
१) दादाभाई नौरोजी २) नाना शंकरशेठ ३) भाऊ दाजी लाड ४) दा. पां. तर्खडकर
३६. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातील क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
१) किचकवध २) सुभद्राहरण ३) सौभद्र ४) कट्यार काळजात घुसली
३७. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश काय होते ?
अ) हिन्दी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा ह्याची दखल घेणे
ब) हिन्दी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे
क) इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे
ड) सनदशीर मार्गाने लोकांची ग-हाणी सरकार पर्यन्त पोहोचविणे
१) अ आणि ड २) ब आणि क ३) क आणि ड ४) अ आणि ब
३८. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते ______ हे होते
१) अॅनी बेझंट २) लोकमान्य टिळक ३) बॅरि. खापर्डे ४) बी. एस, मुंजे
३९. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेल्या रंगो बापूजी गुप्ते यांनी निराश होऊन परत आल्यावर कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला ?
१) जमीनदार २) शेतकरी ३) आदिवासी ४) सैनिक
४०. जोड्या जुळवा
अ) किचकवध १) गणेश बल्लाळ फणसळकर
ब) स्वदेशी २) वासुदेव पुरुषोत्तम साठे
क) वंगभंग ३) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
ड) भीमराव ४) लक्ष्मण नारायण जोशी
१) अ-३, ब-१, क-२, ड-४ २) अ-३, ब-४, क-१, ड-२ ३) अ-३, ब-२, क-१, ड-४
४१. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?
१) जमीनदार २) राष्ट्रीय नेते ३) गिरणी कामगार ४) व्यापारी
४२. मध्यवर्ती प्रांत व बेरारपर्यन्त होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ) दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे शाखा स्थापन केली
ब) बाळकृष्ण मुंजे यांनी नागपूरजवळ शाखा स्थापन केली
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब ४) कोणतेही नाही
४३. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले ?
१) तात्या टोपे २) नानासाहेब पेशवे ३) बहादुर शाह जफर ४) अझिमुल्लाह
४४. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य ______ संघटनेने केले
१) प्रार्थना समाज २) सत्यशोधक समाज ३) आर्य समाज ४) ब्राम्हो समाज
४५. न्या. रानडे यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासोबत १८८७-१८९५ या काळात संयुक्तपणे घेतले गेले ?
१) डेक्कन सभा २) सार्वजनिक सभा ३) सामाजिक परिषद ४) औद्योगिक परिषद
४६. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला ?
१) अंबापणी २) नांदगाव ३) नांदुरशिंगोटे ४) पेठ-सुरगणा
४७. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी कोणत्या सिद्धांतानुसार झाली ?
१) रिकॉर्डोंचा खंड सिद्धान्त २) प्रिंगलचा खंड सिद्धान्त ३) नॅशचा खंड सिद्धान्त ४) गोल्डस्मिथचा सिद्धान्त
४८. १८८९ च्या मुंबई कॉंग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्या दोन महिला प्रतिनिधी कोण ?
१) दुर्गाबाई देखमुख आणि लिला रॉय २) पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर
३) गोदावरी परूळेकर आणि अनुसयाबाई काळे ४) अनी बेझंट आणि मादाम भिकाजी कामा
४९. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी झाले ?
१) मुंबई, १९४२ २) ठाणे, १९४५ ३) टिटवाळा, १९४५ ४) पुणे, १९४२
५०. केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी 'संगीत मानापमान' नाटकाचा प्रयोग करून ______ च्या मदतीसाठी रुपये पंधरा हजार जमविले
१) दुष्काळ निवारण फंड २) टिळक स्वराज्य फंड ३) महात्मा स्वराज्य फंड ४) यापैकी नाही
५१. परमहंस सभेची कोणती उद्दिष्ट्ये होती ?
अ) जातीसंस्था नष्ट करणे ब) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे क) पुनर्विवाहास प्रोत्साहन देणे ड) मूर्तिपूजा करण्यास उत्तेजन देणे
१) अ, ब, क २) ब ३) क ड) अ आणि ड
५२. १८९२ च्या फॅक्टरी अॅक्ट प्रमाणे
अ) स्त्री कामगारांना ११ तास काम करण्याची परवानगी देण्यात आली
ब) स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली
क) स्त्री-पुरुष कामगारांचे आठवड्याच्या कामाचे साठ तास निश्चित करण्यात आले
ड) आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आली
१) अ, ब, ड २) फक्त क ३) फक्त ड ४) फक्त अ
५३. 'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता कोणत्या कवीने चौरी-चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणार्या कैद्याला उद्देशून लिहली होती ?
१) कुंजविहारी २) कुसुमाग्रज ३) गोविंद ४) नारायण बेहरे
५४. १८७५ च्या शेतकरी उठावासंदर्भात कोणते विधान सत्य आहे ?
अ) १२ मे १८७५ रोजी सुपे येथे शेतकर्यांनी पहिला उठाव केला
ब) १५ जून १८७५ रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील 'मुधाळी' गावात झाला
क) नील चार्ल्सवर्थने 'Myth of the Deccan Riots' या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे
१) फक्त अ २) फक्त ब ३) अ आणि ब ४) अ, ब आणि क
५५. योग्य जोड्या लावा
अ) महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन १) श्रीधर वामन नाईक
ब) महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन २) काशीनाथ वैद्य
क) महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन ३) बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा
ड) महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन ४) गोविंदराव नानल
१) अ-२, ब-१, क-४, ड-३ २) अ-४, ब-३, क-२, ड-१ ३) अ-३, ब-४, क-१, ड-२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू