शब्दांचे अर्थ

use find in page option from your browser to search

अंगाई/अंगाईगीत - लहान मुलांना झोपविण्यासाठी गायले जाणारे गाणे

अंकित - दुसर्‍याच्या ताब्यात असलेला

अंगचोर - अंग राखून काम करणारा, कामचुकार

अनुपम/अनुपमेय - ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे

अनमोल - ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे

अत्युच्च - अतिशय उंच

अनावृष्टी - पाऊस न पडणे

अविनाशी - कधीही नाश न पावणारे

अवर्णणीय - वर्णन करता येणार नाही असे

अफवा - खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी

अप्पलपोटा - स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा

अतुलनीय - तुलना करता येणार नाही असे

अजिंक्य - कधीही पराभूत न होणारा

अनाथाश्रम - निराश्रितास आश्रय देणारी संस्था

अगणित - मोजता न येणारे

अमर - ज्याला मरण नाही असा

अमृत महोत्सव - पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा उत्सव

अजरामर - ज्याला जरा (म्हातारपण) व मरण नाही तो

अतिथी - पाहुणा / घरचा नसलेला

अनुयायी - एखाद्याच्या मागून जाणारा

अग्रज - आधी जन्मलेला

अनुज - मागून जन्मलेला / लहान भाऊ

अग्यारी - पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ

अपूर्व - पूर्वी कधी न पाहिलेले / ऐकलेले

अजातशत्रू - ज्याला कोणीही शत्रू नाही असा

अल्पसंतुष्ट - थोडक्यात समाधान मानणारा

अष्टावधानी - अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा

आगंतुक - तिथी, वार न ठरवता आलेला, अचानक आलेला

अनाकलनीय - समजण्यास कठीण, आकलन होण्यास कठीण

अभूतपूर्व - पूर्वी कधीही न पाहिलेले

अश्रुतपूर्व - पूर्वी कधीही न ऐकलेले

अदृष्टपूर्व - पूर्वी कधीही न पाहिलेले

अप्सरा - देवलोकातील स्त्रिया

अभ्राच्छादित, मेघच्छादित - ढगांनी झाकलेला

अविस्मरणीय - कधीही विसर पडणार नाही असे

अनाथ - कोणीही पालक नसलेला

अनावर - पडदा दूर करणे

अवीट - कधीही न विटणारे

अन्योक्ती - एकाला उद्देशून दुसर्‍याला बोलणे

अल्पायुषी, अल्पायु - कमी आयुष्य असलेला

अहेर - लग्नात द्यावयाची भेट

आजानुबाहू - ज्याचे हात गुढग्यापर्यन्त पोचतात असा

आपादमस्तक - पायापासून डोक्यापर्यंत

आत्मश्लाघा - स्वतःची स्वतःच स्तुती करणे

आस्तिक - ईश्वरावर विश्वास ठेवणारा

आसेतुहिमाचल - हिमालय पर्वतापासून लंकेपर्यन्त

आबालवृद्ध - लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यन्त

आत्मवृत्त - आपली हकिकत स्वतःच निवेदन करणे

आदिवासी - अगदी पूर्वीपासून राहणारे

आंतरराष्ट्रीय - राष्ट्राराष्ट्रांतील

आजन्म - जिवंत असेपर्यंत

आमरण - मरेपर्यंत

आशीर्वाद - तुमचे चांगले होवो असे बोलणे

आल्हाददायक - मनाला आल्हाद देणारा

आकाशगंगा - आकाशातील तार्‍यांचा पट्टा

ऋणको - पैसे कर्जाऊ घेणारा

उ:शाप - शापापासून काही अटींवर सुटका

उपनगर - मोठ्या शहराजवळ असलेले लहान शहर

उपकृत, लाचार - उपकाराखाली ओशाळ बनलेला

उदयोन्मुख - उदयाला येत असलेला

उभयचर - जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारा

उत्तरायण - सूर्याचे उत्तरेकडे जाणे

उपर्‍या - घरदार नसलेला

ऐतखाऊ - कामधंदा न करता दुसर्‍याच्या जिवावर जगणारा

ऐतोबा - श्रम न करता खाणारा, दुसर्‍याच्या श्रमावर खाणारा

कलाकार, कलावंत, कलावन - अंगी एखादी कला असणारा

कर्तव्यपराड्मुख - कर्तव्याकडे पाठ फिरविणारा

कवी - कविता रचणारा

कवयित्री - कविता रचणारी

कर्णमधुर - कानास गोड वाटणारे

कर्मभूमी - कार्य करण्याचा प्रदेश, कर्तृत्व गाजवलेला प्रदेश

कल्पवृक्ष - सर्व इच्छा पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष

कनवाळू - दुसर्‍याचे दु:ख पाहून कळवळणारा

कष्टसाध्य - कष्टाने मिळणारी

कंजूस - खूप कमी खर्च करणारा

कामधेनू - सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय

कानउघडणी - कठोर शब्दांनी केलेला उपदेश

काव्यगायन - कविता तालासुरात गाऊन दाखवणे

काथवट - भाकरी करण्याची लाकडी परात

कार्यक्षम - कार्य करण्यास पात्र असलेला

कासार - काचेच्या बांगड्या बनविणारा

कुंभार - मडकी बनविणारा

कुंजविहार - कुंजात विहार करणारा

कोरीव लेणी - दगडात कोरलेली लेणी

कोडगा - निर्लज्ज, ज्याला लाज नाही असा

कोट्यधीश - कोट्यवधी रूपयांचा धनी

कोंडवाडा - मोकाट जनावरांना कोंडून ठेवण्याचे ठिकाण

कृतज्ञ - केलेले उपकार जाणणारा

कृतघ्न - केलेले उपकार न जाणणारा

कृष्ण पक्ष - अंधार्‍या रात्रीचा पंधरवडा

खग - आकाशात गमन करणारा

खर्चिक, उधळ्या - सतत पैसे खर्चणारा

खेळाडू - खेळाची आवड असणारा, खेळ खेळणारा

खेळगडी - आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र

गर्भश्रीमंत - जन्मापासून संपत्ती असणारा

गाभारा - मूर्ती जिथे असते तो देवळातील भाग

गायरान - गाईला चरण्यासाठी राखलेले रान

गावकूस - गावाभोवतालचा तट

गावगाडा - गावचा कारभार

ग्रामपंचायत - गावाच्या पंचाचे राज्य

गिरीजन - डोंगरात राहणारे लोक

गीतकार - गीते रचणारा

गोदाम, कोठार, वखार - धान्य साठविण्याची बंदिस्त जागा

गोठा - गाई/गुरे जेथे बांधतात ती जागा

गुरुबंधू - गुरुकडे आपल्याबरोबर शिकणारा

गुप्तहेर, हेर - गुप्त बातम्या काढणारा

घरकोंबडा - नेहमी घरात बसून राहणारा

घरभेदी - घरात भांडणे लावणारा, शत्रूला सामील झालेला, फितूर

घोकंपट्टी - मोठ्याने केलेले पाठांतर

चर्च - ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ

चक्रधर, चक्रपाणि - ज्याच्या हाती चक्र आहे असा

चक्रव्यूह - सैन्याची चक्राकार केलेली रचना

चव्हाटा, चौक - चार रस्ते एकत्र येतात ती जागा

चहाडखोर - चहाड्या सांगणारा

चातुष्पाद - चार पायावर चालणारा

चावडी - गावच्या कामकाजाची जागा

चांभार - पादत्राणे बनविणारा

चिंतामणी - चिंता हरण करणारा मणी

चिरंजीव - पुष्कळ दिवस जगणारा

चुघलखोर - चुगल्या सांगणारा

जलचर - पाण्यात राहणारा

जयघोष, घोषा - नावाचा एकसारखा उच्चार

जन्मभूमी, मायभूमी - जेथे आपण जन्मतो तो देश

जगज्जेता - जग जिंकणारा

जागल्या - रात्री जागून गावाचे रक्षण करणारा

जिल्हापरिषद - जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था

जिवलग - जिवाला जीव देणारा

जितेंद्रिय - ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत असा

जिज्ञासू - जाणून घेण्याची इच्छा असणारा

जेता - विजय मिळविलेला

झंझावात - सोसाट्याचा वारा

टाकसाळ - नाणी पाडण्याची जागा

डोळस - डोळ्यांनी पाहावयास समर्थ असलेला, जाणता

ढगाच्छादित, मेघाच्छादित - ढगांनी भरलेले, आच्छादून गेलेले

तपोवन - तप करण्याची जागा

तबेला, पागा - घोडे बांधायची जागा

तगाई - शेतकर्‍यांना मिळणारे सरकारी कर्ज

तट - किल्ल्याच्या भोवतीची भिंत

तत्कालीन - त्यावेळचा

तहनामा - तहांच्या अटींचा तर्जुमा

ताम्रपट - तांब्याच्या पत्र्यावर लिहलेले लेख

तिठा - तीन रस्ते एकत्र येतात ती जागा

तितिक्षा - हालअपेष्टा सहन करण्याचा गुण

तोंडपूजेपणा - तोंडावर स्तुती करण्याचा गुण

तुरुंग, बंदीशाळा, कारागृह - कैदी जेथे ठेवतात ती जागा

त्रैमासिक - तीन महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे

दरवेशी - अस्वलाचा खेळ करणारा

दानशूर - दानधर्म करण्यात प्रसिद्ध

दाता - दानधर्म करणारा

द्विज - दोनदा जन्मलेला

दिवाभीत - दिवसाला भिणारे

दिर्घोद्योगी - सतत उद्योग करणारा

दीर्घायुषी, दीर्घायू - खूप आयुष्य असलेला

दीपस्तंभ - जहाजांना दिशा दाखविणारा दिवा असलेला मनोरा

द्वीपकल्प - तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश

द्विसाप्ताहिक - आठवड्यातून दोन वेळा

दुराचारी - वाईट आचरण असलेला

दुतोंड्या - दोन्ही बाजूंनी बोलणारा

दुआब, दोआब - दोन नद्यांमधील जागा

दृष्टी - गुणाकडे डोळेझाक करून केवळ दोष काढण्याचा स्वभाव

देशभक्त, देशसेवक - देशाची सेवा करणारा

दैनिक - दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र

दैववादी - दैवावर, भाग्यावर भरवसा ठेऊन राहणारा

दंतकथा - एकाने दुसर्‍यास सांगून चालत आलेली गोष्ट

धनको - पैसे कर्जाऊ देणारा

धर्मांतर - दुसर्‍या धर्मात प्रवेश करणे

धबधबा - उंचावरून पडणारा पाणलोट

धर्मशाळा - प्रवाशांना, पांथस्थांना विनामूल्य राहण्याचे ठिकाण

ध्येय - आयुष्यात शेवटी मिळवायचे ते

नखशिखान्त - पायाच्या नखापासून शेंडीपर्यन्त

नट - नाटकात भूमिका/अभिनय करणारा 

नभोवाणी, आकाशवाणी - आकाशातून ऐकू येणारी वाणी

नवमतवादी, पुरोगामी - नव्या मताप्रमाणे वागणारा

नवज्वर - नऊ दिवस टिकणारा ताप

नाटककार - नाटक लिहिणारा

नाविक, नावाडी - होडी, नाव चालविणारा

नास्तिक - ईश्वर नाही असे मानणारा

नागरिक - देशात कायम वस्ती करणारा

नादिष्ट - रात्रंदिवस एकाच गोष्टीचा नाद असलेला

निरिच्छ - कशाचीही इच्छा न करणारा

निराधार - कुणाचाही आधार नसलेला

निर्वाळा - खात्रीपूर्वक

निर्वासित - घरदारास व देशास पारखा झालेला

निर्व्यसनी - कोणतेही व्यसन नसलेला

निसर्गसुंदर - मूळचेच सुंदर असलेले

नियतकालिक - ठराविक वेळी निघणारे

निरक्षर - लिहिता-वाचता न येणारे

निर्माल्य - देवाला वाहून शिळी झालेली फुले

नि:पक्षपाती - कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा

निर्भय - ज्याला भीती नाही असा

निशाचर - रात्री फिरणारा

निपुत्रिक - मुलगा नसलेला

निरपेक्ष - कशाचीही अपेक्षा नसणे

नैपुण्य - कौशल्य, कसब

नंदादीप - देवापुढे मंद पण सतत जळणारादीप

नंदनवन - स्वर्गातील इंद्राची बाग

नांदी - नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत

न्यायनिष्ठ - न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष

न्यायनिष्ठुर - न्याय देण्याच्या बाबतीत कठोर

परावलंबी - दुसर्‍यावर अवलंबून असणारा

परिचारिका - रुग्णांची सेवा करणारी

परस्परावलंबी - एकमेकांवर अवलंबून असणारे

परोपकारी - दुसर्‍यावर उपकार करणारा

पडळ - शेतात बांधलेली पडवी

परोपजीवी - दुसर्‍याच्या जिवावर जगणे

परदेशगमन - दुसर्‍या देशात जाणे

परदेशभ्रमण - दुसर्‍या देशात हिंडणे

परिसर - भोवतालचा प्रदेश

पादचारी - पायी चालणारा

पाणपोई - मोफत पाणी मिळण्याची सोय

पाणवठा - गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा

पाक्षिक - पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे

पारदर्शक - ज्यातून आरपार दिसते असे

पाषाणहृदयी - दगडासारखे हृदय असणारा

पागा - घोडे बांधण्याची जागा

पाणबुडी - पाण्याखालून संचार करणारी जहाज

पाणंद - शेतातून जाणारी अरुंद वाट

पाणथळ - पाणी साचलेली जागा

पांजरपोळ - जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण

पूरग्रस्त - पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे असा

पूर्वज - पूर्वी जन्मलेला

पेय - पिण्यास योग्य असा पदार्थ

पूर्वाभिमुख - पूर्वेकडे तोंड करून असलेला

पाश्चिमात्य - पश्चिम भागातील 

पोरका, अनाथ - ज्याला आईवडील नाही असा

पोपटपंची - अर्थ न समजता केलेले पाठांतर

पौर्वात्य - पूर्व भागातील लोक

पंचांग - तिथी, वार, नक्षत्र यांची पुस्तिका

पंकज - चिखलात उगवलेले कमळ

पंचवटी - पाच वडांचा समुदाय असलेली जागा

पंचक्रोशी - पाच कोसांचा प्रदेश

प्रेक्षक - पाहण्यासाठी जमलेले लोक

प्रलयकाळ - जगाचा नाश होण्याची वेळ

प्रतिगामी, सनातनी - जुन्या रूढीना चिकटून राहणारा

प्रजासत्ताक - लोकांच्या मताने चाललेले राज्य

प्रदर्शन - पाहण्यासाठी म्हणून वस्तू मांडणे

फितूर - शत्रूला सामील झालेला

बहुरूपी - निरनिराळी सोंगे घेणारा

बहुश्रुत - ज्याने खूप ऐकले असा

बारभाई - बारा लोकांनी केलेला कारभार

बातमीदार, वार्ताहार - बातमी आणून देणारा

बिनतक्रार - कोणतीही तक्रार न करता

बुद्धिजीवी - बुद्धीचा उपयोग करून जगणारे

बेवारशी - वारस नसलेला

बोगदा - डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता

बोलभाषा, बोलीभाषा - बोलण्याची भाषा

भाकडकथा - निरर्थक सांगितलेल्या गोष्टी

भाट - स्तुती करणारा

भांडकुदळ, भांडखोर - भांडनाची खोड असलेला

भूचर - जमिनीवर राहणारा

मदारी - माकडाचा खेळ करून दाखविणारा

मनकवडा - दुसर्‍याच्या मनातले ओळखणारा

महत्वकांक्षी - मोठ्या इच्छा असणारा

मल्लिनाथी - एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका

मनमिळावू - सर्वांशी मिळून वागणारा

मनोहर - मन हरण करणारा

मनसोक्त - मन मानेल तसा

मशालजी - मशाल धरणारा नोकर

माच - पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव

माजघर - घरातील मधले दालन

मार्गदर्शक - इतरांना मार्ग दाखविणारा

माधुकरी - अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा

माहूत - हत्तीला काबूत ठेवणारा

माहेर - लग्न झालेल्या मुलींच्या आईबापाचे घर

मानधन - कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन

मासिक - महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे

मारेकरी - दुसर्‍याला मारण्यासाठी पाठविलेला माणूस

मितभाषी - मोजके असे बोलणारा

मिश्रविवाह, आंतरजातीय विवाह - भिन्न जातीतील वधुवरांचा विवाह

मिंधा - उपकाराखाली ओशाळ बनलेला

मिताहारी - मोजका आहार नेमाने घेणारा

मीनाक्षी - माशासारखे डोळे असणारी

मूर्तिकार - मूर्ती घडविणारा

मूर्तिपूजक - मूर्तीची पूजा करणारा

मूर्तिभंजक - मूर्तीचा नाश करणारा

मेंढवाडा - पाळलेल्या मेंढ्यांचे राहण्याचे ठिकाण

म्हातारचळ - म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार

मृगाक्षी, मृगनयना - हरिणासारखे डोळे असणारा

मृत्युंजय - मृत्यूवर विजय मिळविणारा

यथाशक्ती - शक्य असेल त्याप्रमाणे

योगशाळा - योग करण्याची जागा

रणगाडा - तोफ असलेला गाडा

राजमान्य - राजाने दिलेली मान्यता

रामबाण - अचूक गुणकारी असणारे

रामप्रहर - पहाटेचा पवित्र काळ

रुग्णालय - रोगी ठेवण्याची जागा

रोजखर्डा - रोजच्या हिशोबाची टिपणवही

लघुकथाकार - लघुकथा लिहिणारा

लखपती, लक्षाधीश - लाखो रुपये जवळ असलेला

लेणे - डोंगरात कोरलेले मंदिर

लेखनशैली - लिहिण्याची हातोटी

लोकमान्य - लोकांनी मान्यता दिलेला

लोहार - लोखंडाच्या वस्तू बनविणारा

वदंता - ऐकीव गोष्टी

वर्‍हाडी - लग्नासाठी जमलेले लोक

वक्ता - भाषण करणारा

वक्तृत्व - भाषण करण्याची कला

वल्कल - झाडाच्या सालींपासून बनविलेले वस्त्र

वनवासी - वनात राहणारे लोक

वामकुक्षी - दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप

वावटळ - वर्तुळाकार फिरणारा सोसाट्याचा वारा

वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक

वाचनालय - वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके वाचण्याचे ठिकाण

वाटाड्या - वाट दाखविणारा

वात्सल्य - आईचे मुलाविषयी प्रेम

विधवा - पती मरण पावला आहे अशी स्त्री

विधुर - ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष

विघ्नहर्ता - संकट दूर करणारा

विदुषी - विद्वान स्त्री

वीरमरण - रणांगणावर आलेले मरण

वैमानिक - विमान चालविणारा

वैष्णव - विष्णुची भक्ती करणारा

वृत्तनिवेदक - बातमी सांगणारा

व्यासपीठ - भाषण करण्याची उंचावरील जागा

शरणागत - शरण आलेला

शतपावली - जेवण झाल्यावर शंभर पावले फिरण्याची क्रिया

शाप - एखाद्याचे वाईट व्हावे असे बोलणे

शिलालेख - दगडावर कोरून लिहलेले लेख

शिल्प - दगडावर कोरलेले कोरीव काम

शिक्केनस्बी - राजाचा शिक्का सांभाळणारा

शीघ्रकोपी - अतिशय लवकर रागावणारा

शुक्ल पक्ष - अमावास्येपासून पौर्णिमेचा पंधरवडा

शेजारधर्म - शेजार्‍याशी वागण्याची पद्धत

शैव - शंकराची भक्ती करणारा

षण्मासिक - सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

सधवा - जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री

सत्यवचनी - नेहमी सत्य बोलणारा

सत्याग्रही - सत्यासाठी झगडणारा, सत्यासाठी आग्रही असणारा

समाजसेवक - समाजाची सेवा करणारा

समाजकंटक - समाजातील त्रास देणारे लोक

समयसूचक - योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणारा

सदावर्त, अन्नछत्र - मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण

सहजसाध्य - सहजरीतीने मिळणारे असे

सनातनी - जुन्या चालीरितींना चिकटून राहणारा

सदाचारी - चांगले आचरण करणारा

साम्यवादी - समतेचा आग्रह धरणारा

साक्षर - लिहितावाचता येणारा

सांगकाम्या - सांगितलेले तेवढेच काम करणारा

सांडणीस्वार - उंटावरून टपाल नेणारा स्वार

सिंहावलोकन - मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे

सुस्कारा - दु:खामुळे सोडलेला दीर्घ श्वास

सुखलोलुप - सुखाच्या मागे लागलेला

सुखासीन - सुखाने काळ कंठणारा, सुखाच्या आहारी गेलेला

सुतार - लाकडाच्या वस्तू बनविणारा

सुभाषित - सुंदर शब्दातील बोधपर वाक्य

संकलक - बातमी, मजकूर संकलन करणारा

संपादक - संपादन करणारा

संगम - दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा

संस्मरणीय - काम स्मरणात राहील असे

संधिप्रकाश - सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश

स्वगत - स्वतःशी केलेले भाषण

स्वच्छंदी - आपल्या लहरीप्रमाणे वागणारा

स्वयंसेवक - स्वतः होऊन दुसर्‍याच्या सेवेचे व्रत घेणारा

स्मारक - मरण पावलेल्याची आठवण राहावी म्हणून योजलेली गोष्ट

स्वामिनिष्ठ - मालकाची/धन्याची प्रामाणिक सेवा करणारा

स्वावलंबी - स्वतःवर अवलंबून असणारा

स्थानबद्ध - एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला

स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, स्थिरमति - कोणत्याही स्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते असा

हस्तलिखित - हाताने लिहिलेले

हटवादी, हेकेखोर - आपल्याच मताप्रमाणे चालणारा

हुतात्मा - देशासाठी प्रणार्पण केलेला

हेर, खबर्‍या - शत्रूकढील बातमी काढून आणणारा

हृदयस्पर्शी - हृदयाला भिडणारे

हृदयद्रावक - मनाला पाझर फोडणारे

हत्तीखाना - हत्ती बांधण्याची जागा

हजारजबाबी - प्रश्न विचारताच त्याचे योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा

क्षितिज - जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा

क्षणभंगुर - थोडा काळ टिकणारे

श्रमजीवी - श्रम करून उपजीविका करणारे

श्रद्धाळू - अतिशय श्रद्धावान मनुष्य

श्रोते - भाषण ऐकणारे
 

  



  

 

टिप्पण्या