use find in page option from your browser to search
अंगठाछाप – निरक्षर मनुष्य
अंधेरनगरी – ताळतंत्र नसलेला कारभार
अंगावरचे बाळ – आईच्या अंगावर पिणारे बाळ
अंगठाबहाद्दूर – निरक्षर मनुष्य
अंडी पिल्ली – गुप्तगोष्ट
इंगित – मनातल्या भावना
इंद्रजाल – माया, मोहाचे जाळे
इजा बिजा तिजा – त्रिवार प्रयत्न
इडापीडा – सर्व प्रकारची दु:खे किंवा संकटे
इनमीन साडेतीन – फारच थोडी माणसे
ईडलिंबू – आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती
एकभुक्त – दिवसातून एकदाच जेवणारा
एकछत्री अंमल – एकाधिकारशाही
एकांडा शिलेदार – सर्व जबाबदारी आपल्यावर घेणारा
एका माळेचे मणी – सारख्या वृत्तीची माणसे
एरंडाचे गुर्हाळ – कंटाळवाणे लांबलचक भाषण
एरंडोली न्याय – मध्यम मार्गाने वागणे, तडजोड
ऐरावत – श्रेष्ठ व्यक्ती
ओझ्याचा बैल – लादलेले काम निमूटपणे करणारा
ओनामा – प्रारंभ
ओली आग – महापूर
ओली कूस – नुकतीच बाळंत झालेली
औट घटकेचे राज्य – थोडावेळ टिकणारे राज्य
अकबरी प्रथा – चांगली प्रथा
अकरावा रुद्र – अतिशय तापट स्वभावाची व्यक्ती
अक्कलशून्य – बेअक्कल व्यक्ती
अकलेचा कांदा – मूर्ख मनुष्य
अक्काबाईचा फेरा – एकदम दारिद्र्याची अवस्था येणे
अगडबंब – अवाढव्य शरीराची व्यक्ती
अग्निदिव्य – ध्येयप्राप्तीसाठी भोगाव्या लागणार्या यातना
अजागळ – निरुपयोगी व्यक्ती, कर्तृत्वशून्य मनुष्य
अजातशत्रू – शत्रू नसलेला, सर्वांचा मित्र
अजापुत्र – ज्याला कोणी वाली नाही असा
अटकेपार झेंडा – एखाद्या कार्यात गाठलेली यशाची परिसीमा
अठराविश्वे दारिद्र्य – अत्यंत दारिद्र्य अवस्था
अठरा धान्याचे – निरनिराळ्या गोष्टींचे मिश्रण, कडबोळे
अडणीवरचा शंख – उच्च पदावरील अपात्र व्यक्ती
अडेलतट्टू – अत्यंत हट्टी, आपलाच हेका चालविणारा
अर्धचंद्र – गचांडी देणे, काढून घेणे
अनुचित – अयोग्य
अनागोंदी कारभार – ताळतंत्र नसलेला कारभार
अनेक कोटीसार – अतिधनवान व्यक्ती
अभिजात – उच्च दर्जाचा
अभिवृद्धी – उत्कर्ष, भरभराट
अमरपट्टा – आश्वासन, खात्री
अरण्यपंडित – नको तिथे पांडित्य दाखविणारा
अरण्यरुदन – मोठ्याने केलेला दुर्लक्षित आक्रोश, निरुपयोगी कृत्य
अलकानगरी – अतिशय समृद्ध नगर
अलबत्या-गलबत्या – कोणीतरी क्षुल्लक माणूस
अल्लाची गाय – निरुपद्रवी व्यक्ती
अव्वाच्या सव्वा – आहे त्यापेक्षा जास्त सांगण्याची वृत्ती
अवकाळी – अवेळी
अवदसा – संकट, भांडखोर स्त्री, वाईट स्थिती होईल अशी बुद्धी
अष्टपैलू – अनेक बाबतीत प्रवीण असलेली व्यक्ती, सर्वगुणसंपन्न
अस्थिपंजर – अत्यंत काटकुळी व्यक्ती
अस्तनीतील निखारा – घरभेदी, पदरी असलेला कपटी, धोकेबाज
अस्मानी-सुलतानी – एकदाच आलेली नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे
अळवावरचे पाणी – क्षणभंगुर गोष्ट
अक्षरशत्रू – ज्याला अक्षर ओळख नाही असा, निरक्षर
आंधळाकारभार – अंदाधुंदीचा कारभार
आंधळ्याची काठी – आंधळ्या व्यक्तीला आधार देणारा
आंधळ्याची माळ – अंधश्रद्धेने वागणार्या मूर्ख लोकांची चौकडी
आकाशाची कुर्हाड – निसर्गाने अकस्मात आणलेले भयंकर संकट
आखाडसासरा – पोकळ पाटीलकी करणारा
आग्यावेताळ – अत्यंत रागीट मनुष्य
आनंदीबाई – दुष्ट, पाताळयंत्री स्त्री
आंबट द्राक्ष – मिळण्यास कठीण असलेल्या गोष्टीला नावे ठेवणे
आयव्यय – जमा-खर्च
आयुष्याची शिदोरी – जीवनभर पुरणारी गोष्ट, आयुष्याची मर्यादा
आळशावर गंगा – एखादे कार्य न करता झालेला लाभ
उंटाचे पिल्लू – क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट
उंटावरचा शहाणा – कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा
उंबराचे फूल – दुर्मीळ गोष्ट, कधीच न घडणारी काल्पनिक गोष्ट
उचापती – सतत खोड्या करणारा
उचलबांगडी – पदावरून काढणे
उजवा हात – अत्यंत उपयोगी व्यक्ती
उपटसुंभ – पोकळ अधिकार गाजवणारी व्यक्ती
उभा दावा – हाडवैर
उल्लू का पठ्ठा – मूर्ख मनुष्य
उलटी अंबारी – भिक्षा मागण्याची झोळी
उलट्या काळजाचा – अतिशय निष्ठूर माणूस
खंक – दरिद्री व्यक्ती
खंडीच्या पिंडी – गरजेपेक्षा जास्त, भलतेच काहीतरी
खंडीभर – भरपूर प्रमाणात
खग्रास ग्रहण – पूर्णपणे नाशाची अवस्था
खडखडाट – चणचण, टंचाई
खडाजंगी – कडाक्याचे भांडण
खडाष्टक – हाडवैर, दोन व्यक्तींतील वैर
खडूस – ऐटीत राहणारी गर्विष्ठ व्यक्ती
खरखर मुंडा – हट्टी भिक्षेकरी
खुशालचेंडू – अतिशय चैनी व निष्काळजी माणूस
खेटराने पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे
खोंडकालवडी – अंधाधुंदी, गदारोळ
खो-खो चा खेळ – अनिश्चिततेची अवस्था
खोगीरभरती – निरुपयोगी वस्तूंची किंवा माणसांची भरती
कंचनी - नृत्यांगना
कंटक - अत्यंत कडक स्वभावाची व्यक्ती
कच्चे मडके - अर्धवट ज्ञानी
कर्दनकाळ - अत्यंत क्रूर, तापट व उग्र व्यक्ती
कडू कारले - अंगभूत वाईट गुण
कडेलोट - अतिरेक
कपिलाषष्ठीचा योग - अतिशय दुर्मिळ, खूप वेळाने येणारी संधी
कफल्लक - अत्यंत गरीब व्यक्ती
कर्णाचा अवतार - दानशूर व्यक्ती, अतिशय उदार
कत्तलीची रात्र - अतिशय घाईगर्दीची रात्र
कर्मचांडाळ - कृतीने घातकी मनुष्य
कर्मधर्म संयोग - अकल्पितपणे घडणार्या गोष्टी
कलमकसाई - लेखणीने इतरांचे नुकसान करणारा
कलीचा संचार - भांडणे लावीत फिरणारा
कवडीचुंबक - अत्यंत कंजूस वृतीची व्यक्ती
कळसूत्री बाहुली - इतरांच्या मताप्रमाणे वागणारी व्यक्ती
कळीचा नारद - लावावावी करणारा
कांचनभट - पैशाच्या लोभाने म्हातार्याला मुलगी देणारा बाप
कागदी घोडे - व्यर्थ खटाटोप, कागदपत्रे वाढवून कामाचा दिखावा करणे
काडीपैलवान - अशक्त मनुष्य
काथ्याकूट - निरर्थक चर्चा
कामाला वाघ - आपल्या कामात जागरूक व दांडगा उरक असलेला
कायापालट - एकदम बदल
कावळ्यांची कावकाव - निंदकाची ओरड
कावळ्याचा शाप - क्षुद्र व्यक्तीने केलेली निंदा
काळाबाजार - खोटा व्यवहार
काळे पाणी - दीर्घ कालावधीचा तुरुंगवास
काळ्या दगडावरची रेघ - शाश्वत, कधीही न बदलणारे, खोटी न ठरणारी गोष्ट
कुंभकर्ण - झोपाळू व्यक्ती
कुंभकर्णी झोप - खूप गाढ झोप
कुबेर - अतिशय श्रीमंत माणूस
कुत्र्याचे शेपूट - कधीही सुधारता येणार नाही असे
कुलांगणा - कुलीन स्त्री
कूपमंडूक - संकुचित वृत्तीची व्यक्ती
कैकेयी - शिरजोर, कजाग स्त्री, भांडखोर व त्रासदेणारी स्त्री
कृष्ण कारस्थान - गुप्तपणे आखलेला कपटी बेत
कोंड्याचा मांडा - वाईटातून चांगले घडविण्याची कृती
कोटकल्याण - पराकोटीचे कल्याण
कोडगा - लोचट माणूस, बेपर्वा व्यक्ती
कोल्हेकुई - दुर्जनांनी केलेली निंदा
कोरडे पाषाण - उपदेशाचा परिणाम न होणारी व्यक्ती
कोळशातले माणिक - अत्यंत काळीभोर व्यक्ती
गंगाजळी - शिल्लक रक्कम
गंगायमुना - अश्रुधारा
गंडांतर - भीतिदायक संकट
ग ची बाधा - व्यर्थ गर्व
गजान्त लक्ष्मी - दारात हत्ती झुलण्याएवढी अफाट संपत्ती
गटार यंत्र - चकाट्या पिटण्याची जागा
गडबडगुंडा - पैशाची अफरातफर
गतानुगतिक - अज्ञानाने रूढी अनुसरणारा
गनिमी कावा - आडमार्गाने शत्रूला जेरीस आणणे
गप्पीदास - निव्वळ थापा व गप्पा मारणारा मनुष्य
गबाळग्रंथी - वेंधळा
गर्भपंडित - जन्मजात पंडित
गर्भशूर - जन्मजात शूर
गर्भश्रीमंत - जन्मापासून श्रीमंत माणूस
ग्यानबाची मेख - निरुत्तर करणारी बाब
गरुडाची झेप - दूरवरची दृष्टी
गळ्यातला ताईत - अत्यंत प्रिय व्यक्ती
गळ्यातली धोंड - लादलेले काम, केवळ भार असलेली व्यक्ती
गाजरपारखी - चांगल्याची पारख नसलेला
गाढवाचा खरारा - मूर्ख मनुष्य
गाढवाचा नांगर - विध्वंस, नाश
गावमामा - गावात सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, शहाणा माणूस
गावभवानी - गावच्या उठाठेवी करणारी स्त्री
गाळीव मूर्ती - अट्टल, लफंगा
गुलाबाचे फूल - नाजुक व सुंदर व्यक्ती
गुलाबी थंडी - हवीहवीशी वाटणारी, उत्साह आणणारी थंडी
गुरुकिल्ली - एखादे मर्म, रहस्य
गुळाचा गणपती - कर्तृत्वहीन मनुष्य
गोकुळ - मुलाबाळांनी भरलेले घर
गोगलगाय - निरुपद्रवी व्यक्ती, स्वभावाने अतिशय गरीब
गोगलगाय पोटात पाय - आतल्या गाठीचा माणूस, कारस्थानी माणूस
गोमा गणेश - उपटसुंभ व्यक्ती
गौडबंगाल - दुसर्यांना आकलन न होणारे, चमत्कारिक व गूढ, अनाकलनीय
घटकेचे घड्याळ - क्षणभंगुर देह
घटोत्कच - कपटी मनुष्य
घटोत्कचाची माया - फसविण्याचा प्रकार
घमंडानंदन - घमेंडी मनुष्य
घरकोंबडा - आपले घर सोडून न जाणारा
घरभेद्या - गुपित गोष्टी शत्रूला सांगणारा
घाण्याचा बैल - सतत कामाला जुंपलेला मनुष्य
घाशीराम कोतवाल - अन्यायी मनुष्य
घोडामैदान - कसोटीची वेळ
घोडचूक - फार मोठी चूक
घोडनवरा/घोडनवरी - प्रौढ वयाचा नवरा / प्रौढ वयाची नवरी
घिसाडघाई - अतिशय घाई
घोरपड - नसते लचांड
चंदूलाल - अत्यंत चैनी व्यक्ती
चंडिका - रागीट व कजाग स्त्री
चतुर साबाजी - मूर्ख मनुष्य
चतुराई - हुशारी
चर्पटपंजरी - पाल्हाळ, निरर्थक व लांबलचक भाषण
चर्वितचर्वण - त्याच त्या गोष्टीची वारंवार चर्चा
चांडाळ चौकडी - दुष्ट व कारस्थानी माणसांचा गट
चंद्रमौळी घर - गरिबाचे मोडकेतोडके घर, अतिशय दारिद्र्य
चांभारचौकशी - नसती उठाठेव
चामुंडा - भांडखोर व कजाग वृत्तीची स्त्री
चावून चिकट - अत्यंत घासाघीस करीत कंटाळा आणणारी व्यक्ती
चारशे वीस - बादमश व्यक्ती
चालता काळ - वैभवाचा काळ
चिटपाखरू - कोणीही नसणे
चित्रगुप्त - आयव्यय, जमाखर्च मांडनीत पटाईत कारकून
चुटक्याचे मांडव - पोकळ प्रतिष्ठेचे बोलणे
चौकोनी चिरा - हरकामात पटाईत, व्यवहार चातुर्य व अनेक गुण असलेला व्यक्ती
चौदा चौकड्यांचे राज्य - चिरकाल टिकणारे राज्य
चौदावे रत्न - भरपूर मार देणे
चौर्यांशीचा फेरा - चौर्यांशीवेळा जन्म घेणे
छत्तिसचा आकडा - विरोधी मते, दोघांत अत्यंत वितुष्ट
जखमेवर मीठ - आधीच्या दु:खात पुन्हा अपमान
जगन्नाथाचा रथ - सर्वांनी मिळून करावयाचे काम
जगतशेटीचा नातू - निराश्रित माणूस
जडभरत - सुस्त व आळशी माणूस
जमदग्नी - अत्यंत रागीट मनुष्य, शीघ्रकोपी व्यक्ती
जमालगोटा - अत्यंत जालिम उपाय
जमीन अस्मानचे अंतर - दोन विरोधी गोष्टी
जयचंदी वृत्ती - फितुरीची वृत्ती, द्रोही वृत्ती
जरत्कारु - अशक्त व्यक्ती
जांबुवंत - म्हातारा व अनुभवी नेता
जावईशोध - भलताच शोध
जावयाचा बेटा - निरुपयोगी आप्त
जिभेचा पट्टा - तोंडाला येईल ते बोलणे
जिवाची मुंबई - अतिशय मौजमजा करणे, चैन करणे
जीवश्च कंठश्च - अत्यंत जिवलग मित्र
जीव की प्राण - अतिशय प्रिय
जुलमाचा रामराम - बळजबरीने करावे लागणारे काम
झाकलेला माणिक - दिसण्यात साधा, फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य
झाकली मूठ - गुपित गोष्ट, झाकून ठेवलेले व्यंग
झारशाही - हुकुमशाही अंमल
झारीतील शुक्राचार्य - आपलीच आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती
झोटिंगशाही - जुलमी कारभार
टवाळकी - उडाणटप्पूपणा
टांगती तलवार - एखादी गोष्ट घडण्याची सतत भीती वाटणे
टोळभैरव - उडाणटप्पू व गुंड मनुष्य
ठणठणपाळ - निर्धन, बुद्धीहीन, कर्तुत्वहीन माणूस
डकविणे - चिकटविणे
ढागलजभवानी - विनाकारण पुढे पुढे करणारी स्त्री
ढेगूजी - बढाईखोर
तमोगुणी - शीघ्रकोपी
तरते कूळ - वेळेवर कर्ज फेडणारा
तळहातावरचा फोड - अतिशय काळजीचे, फार प्रिय
तक्षक - घातकी मनुष्य
ताकापुरती आजी - काम साधण्यापुरती खुशामत
ताकापुरते रामायण - आपले कार्य साधण्यापुरते आर्जव
ताकपिठ्या - नवशिक्या कलाकार
ताटाखालचे मांजर - मिंधा मनुष्य, पुर्णपणे अंकित असलेली व्यक्ती
तारेवरची कसरत - अनेक व्यवधाने सांभाळत करावयाचे कार्य
तिखट जीभ - झोंबणारे शब्द बोलणे
तिरकमशेठ - चकणा मनुष्य
तिरसिंगराव - तिरसट मनुष्य
तिस्मारखा - अरेरावी करणारी व्यक्ती
तिस्मारगिरी - बढेजाव करणे
तुकाराम बुवा - भाविक पण भाबडी व्यक्ती
तुकाराम बुवाची मेख - गूढ व अनाकलनीय गोष्ट
तुळशीत भांग - चांगल्यात वाईट
तेलभंट - अतिशहाणा व कंजूष माणूस
तोंड पाटिलकी - आपण काहीही न करता इतरांना हुकूमवजा गोष्टी सांगणे
तैलबुद्धी - बुद्धिमान
त्राटिका - कजाग बायको
त्रिशंकू - अधांतरी, धड इकडे ना टिकडे
त्रिस्थळी यात्रा - एकाच व्यक्तीला अनेक ठिकाणी कामे करावे लागणे
थंडा फराळ - खायला न मिळाल्याने घडलेला उपवास
थापाड्या - बंडलबाज - थापा मारणारा
दंभ - ढोंग
दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द
दळूबाई - कर्तृत्वशून्य, भेकड व रडकी व्यक्ती
दामाजीपंत - पैसा
द्राविडी प्राणायाम - सरळ धोपट मार्ग सोडून आडमार्गाचा वापर करणे
दिवटा - कुलाला
दिव्याखाली अंधार - मोठ्याचे ठायी दोष
दीपस्तंभ - चारित्र्यवान व ध्येयनिष्ठ व्यक्ती
दीड शहाणा - फाजील शहाणा, मूर्ख
दुढ्ढाचार्य - प्रौढी मिरवणारा
दुधावरची साय - नातवंडे
दुधात साखर - दोन चांगल्या गोष्टींचा मिलाफ
दुपारची सावली - अल्पकाळ टिकणारे
दुर्वास - शीघ्रकोपी मनुष्य
दुर्योधनी हट्ट - आत्यंतिक हट्ट
देवजी धसाडा - कुरूप व धष्ठपुष्ठ माणूस
द्रौपदीची थाळी - नेहमी गरज भागवणारे
'ध' चा 'मा' - चांगल्याचा केलेला वाईट बदल
धनदांडगा - संपत्तीमुळे शेफारलेला
धन्वंतरी - कुशल वैद्य
धर्मावतार - न्यायाने वागणारा
धुमश्चक्री - घनघोर युद्ध
धर्मराज - सच्छिल व्यक्ती, शांत, सात्विक व न्यायप्रिय व्यक्ती
धारवाडी काटा - न्यायाने वागणारा
धुतला तांदूळ - निर्मळ मनाचा माणूस
ध्रुवतारा - समोर असलेले आदर्श/ध्येय
धूळभेट - उभ्या उभ्या घेतलेली थोड्या वेळाची भेट
नंदनवन - आनंददायी ठिकाण
नंदीबैल - स्वतःची बुद्धी न चालवता समोरच्या व्यक्तीच्या इशार्यावर वागणारा
नक्राश्रू - खोटे अश्रू, मनात आनंद पण बाहेर दु:ख
नखशिखान्त - सर्व शरीरभर
नगद नारायण - कंगाल माणूस
नरसिंह - उग्र व पराक्रमी मनुष्य
नर्मदेचा गोटा - ठोंब्या मनुष्य
नवकोट नारायण - अपार धनसंपत्ती असणारा
नवोढा - नववधू
नृसिंहावतार - उग्र व पराक्रमी मनुष्य
नाकाकानाचा वैद्य - वैद्याच्या संगतीला राहून वैद्यकी करणारा
नाना फडणवीस - मुत्सद्दी माणूस, बुद्धिमान माणूस
निबर - बोथट झालेला
पंढरीची वारी - वारंवार करावे लागणारे निष्फळ हेलपाटे
पंक्तिप्रपंच - भेदभाव, पक्षपात
पढतमूर्ख - पुस्तकी ज्ञानाने शहाणा, शिकलेला पण मूर्ख मनुष्य
प्रमदा - तरुण व सुंदर स्त्री
परसातील भाजी - केव्हाही सहज प्राप्त होणारी वस्तू
पराचा कावळा - एखादी गोष्ट वाढवून सांगणे, अतिशयोक्ती करणे
पर्वणी - दुर्मिळ योग
पळते पीक - पिकाचा शेवटचा बहर
पक्षपात - असमदृष्टी
पांचजन्य - बोंब
पांढरा कावळा - निसर्गात नसलेली गोष्ट
पांढरा परीस - लबाड माणूस
पांढरा हत्ती - खर्चीक बाब, फुकटखाऊ
पांढरे कपाळ - दुर्दैवी स्त्री, वैधव्य येणे
पांथस्थ - वाटसरु
पाताळयंत्री - अत्यंत कुटिल, कारस्थानी
पाप्याचे पितर - रोडका, सडपातळ व दुबळा मनुष्य
पाण्यावरील बुडबुडा - क्षणभंगुर गोष्ट
पाण्यावरील रेघ - क्षणभंगुर गोष्ट
पायाची वहाण - खालचे स्थान, योग्य स्थानी योग्य वस्तू
पायातील काटा - मार्गातील अडथळा
पायातील बेडी - अडचण
प्राणप्रतिष्ठा - स्थापना करून शुभारंभ करणे
पावसाळी छत्र्या - निरुपयोगी पण थोडा काळ टिकणारी वस्तू
पिंडीवरील विंचू - थोराच्या आश्रयाने राहणारा दुष्ट
पिंपळावरचा मुंजा - सतत भटकंती करणारा
पिकलेले पान - अतिशय वृद्ध मनुष्य
पूतनामावशी - दिसायला सुंदर पण दुष्ट स्त्री, बाहेरून प्रेमळ पण आतून कुटिल स्त्री
पूर्णविराम - समाप्ती
पेल्यातील वादळ - तात्पुरता वाद
पैठणी आदर - दिखाऊ प्रेम दाखविणे
पोटचा गोळा - स्वतःचे मूलबाळ
पोटपूजा - भोजन
पोपटपंची - अर्थहीन पाठांतर, घोकंपट्टी
पोलादी पुरुष - करारी मनुष्य
फकीरी बाणा - साधेपणाने राहणारा
फटकळ - स्पष्टवक्ता
फटकडी - चुणचुणीत सुंदर मुलगी
फाल्गुन वाद्य - बोंब, शंख
फुकट फौजदार - उगाचच उठाठेव करणारा
फुगीचा दोडका - गर्विष्ठ, बढाईखोर
फुटका मणी - क्षुल्लक वस्तू
बकासुर - खादाड व्यक्ती
बत्तीशी - दातांची कवळी
बलाकमाला - बगळ्यांची रांग
बळीचा बकरा - नसता त्रास सहन करावा लागणारा
ब्रम्हगाठ - विवाहबंधन
ब्रम्हघोटाळा - मर्यादेबाहेर गोंधळ
ब्रम्हसंमंध - सारखा सतावणारा
ब्रम्हलिखित - अटळ घटना
बृहस्पती - विद्वान मनुष्य
बाजीराव - चैनी, अहंमन्य व्यक्ती
बाजीरावाचा बेटा - श्रीमंत कर्तुत्ववान वडिलांचा गर्विष्ठ मुलगा
बादरायण संबंध - ओढून ताणून जोडलेला संबंध
बारभाईचा कारभार - भोंगळ कारभार, दुष्ट कारस्थान
बावनकशी - अनेक कसोट्यांतून पार पडलेले, शुद्ध स्वरूपाचे, अस्सल, सर्वोत्कृष्ट
बाळकडू - लहानपणापासून लागलेले वळण
बाळबोध - सदाचरणी, नीतीमान
बिनपाण्याची हजामत - कठोर शब्दांनी बोलणे
बिनबुडाचे भांडे - थोडीही स्थिरता नसलेला माणूस
बिनभाड्याचे घर - तुरुंग
बिरबल - चतुर, हजरजबाबी मनुष्य
बिवलवरी कित्ता - अक्षरांचे नमुनेदार वळण, दानेदार अक्षर
बीजारोपण - आरंभ, सुरुवात
बोंबल्या गणेश - नेहमी अमंगळ बोलणारा
बोकेसंन्यासी - ढोंगी व्यक्ती, भोंदू मनुष्य
बोलका ढलपा - बोलणारी निर्जीव वस्तू, ग्रंथ
बोलघेवडा - वाचाळ, बडबडा
बोलाचाच भात - काहीही न देता, केवळ गोड बोलून संतुष्ट करणे
भगीरथ प्रयत्न - अतिशय पराकोटीचे प्रयत्न, आटोकाट प्रयत्न
भद्रेश्वर दीक्षिती - मध्यस्थी करणे
भ्रमाचा भोपळा - पोकळ कल्पना
भ्रमरवृत्ती - भटका स्वभाव
भरतभेट - फार काळाने झालेली दोन प्रियजणांची भेट
भस्मासूर - विनाश करणारा
भांगेत तुळस - वाईट आईवडिलांपोटी चांगली संतती, दुर्वर्तनी पित्याचा सत्प्रवृत्त पुत्र
भाऊबंदकी - भावा-भावतील वैर
भाकड - दूध न देणारे जनावर
भाकडकथा - निरर्थक गोष्ट
भोजनभाऊ - ऐतखाऊ लोक, फक्त चांगल्या काळात साथ देणारे
भाड्याचा बैल - खायला न देता कामाला जुंपलेला
भानामती - जादू, जादूगारीण
भारुड - कंटाळवाणे लांबलचक कथन
भिकार चाळे - दरीद्र्याची लक्षणे
भिकेचे डोहाळे - गरीबी आणणारे वर्तन
भिजत घोंगडे - लांबणीवर पडलेले काम
भित्री भागूबाई - पुळचट मनुष्य
भीष्म प्रतिज्ञा - अत्यंत खडतर प्रतिज्ञा
भेंडीची भाजी - निष्क्रिय व्यक्ती
भोळा सांब - भोळा माणूस
मंगलाचरण - कार्यारंभ
मंथरा - दुष्ट, मत्सरी व कलागती लावणारी स्त्री
मखलाशी - चलाखीने केलेली सारवासारव
मख्खीचूस - अत्यंत कंजूष मनुष्य
मगरमिठी - पक्की मिठी, कायम संबंध
मधाचे बोट - खोटी आशा
मदनाचा पुतळा - अत्यंत देखणा पुरुष
मनातले मांडे - मनातल्या अवास्तव कल्पना, मनोराज्य
मनमुराद - मनसोक्त
मायासुरी प्रकार - नाटकी प्रकार
म्युनिसिपालिटी - घोटाळे, गोंधळ, अव्यवस्था असलेली संस्था
मायेचा पूत - पराक्रमी पुत्र
मृगजळ - आभास
मराठमोळा - साधासुधा, आडदांड व राकट
मल्लिनाथी - ढोंगीपणाची टीका
महाभारत - मोठे भांडण
मक्षिका - माशी
माकडचेष्टा - पोरकट चाळे
माणूसघाण्या - माणसात मिसळण्यास अनुत्सुक
मानाचे पान - सन्मानदर्शक वस्तू
मारूतीचे शेपूट - न संपणारे, लांबत जाणारे काम
महामाया - जहॉबाज पत्नी
मिचखडा - चलाख मुलगा
मिरजाफरी वृत्ती - द्रोह करण्याची वृत्ती
मिस्किल - खोडकर
मुबलक - पुष्कळ
मुक्ताफळे - वेडेवाकडे बोल
मुखस्तंभ - मुखदुर्बल मनुष्य, बोलता येत असून मुक राहणारा
मुलूखमैदान तोफ - मोठमोठ्याने भांडनारी स्त्री
मुष्टिमोदक - मुठीने मारलेले ठोसे
मुसळकंद - धटिंगण, आडदांड मनुष्य
मुसळदेवता - आडदांड स्त्री
मेघश्याम - ढगासारखा सावळा
मेतकूट - घनिष्ट मैत्री
मेषपात्र - कर्तृत्वशून्य व्यक्ती, बावळट, फारसा दर्जा व महत्व नसलेली व्यक्ती
मोगलाई - अंधाधुंदी, अन्यायाचे राज्य
यशिद - लहान तट्टू
यळकोट - गोंधळ, खंडोबाचा जयजयकार, सामूहिक प्रयत्न
यादवी - आपापसातील भांडण, अंधाधुंदीचा कारभार
यमपुरी - तुरुंग
यक्षप्रश्न - निर्णय घेण्यास कठीण प्रश्न
यावच्चंद्रदिवाकरौ - निरंतर, चंद्रसूर्य असेपर्यन्त टिकणारे
युधिष्ठिर - निधड्या छातीचा
योगक्षेम - उदरनिर्वाह
रंभा - स्वर्गातील सुंदर स्त्री
रकाबत - भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजविणारा
रडतोंडीचा घाट - कायम दुर्मुखलेला मनुष्य
रफूचक्कर - पळून जाणे
राईचा पर्वत - काट्याचा नायटा, अतिशयोक्ती
राखरांगोळी - सत्यानाश
राघोभरारी - दूरवरचा प्रवास जलदगतीने करणारा
राजापूरची गंगा - अनपेक्षितपणे दृष्टीस पडलेले
राणाभीमदेव गर्जना - काम न करता ओरडणे, वल्गना
रामबाण - अचूक गुणकारी उपाय
रामायण - कंटाळवाणी गोष्ट
रामरट्टा - जोराचा प्रहार
रामगराडा - अतिशय गर्दी
रामराज्य - नीती, न्यायाने चालणारे राज्य
रामलक्ष्मण - एकमेकांवर प्रेम करणारे भाऊ
रामशास्त्री - स्पष्टवक्ता न्यायाधीश
राहू केतू - नाशांसाठी टपलेले
रिंगमास्तर - आपल्या मताप्रमाणे इतरांना वागविणारा
रुद्राजी - संतापी
रुद्रावतार - अती तापट माणूस
रुपेरी बेडी - चाकरी, बंधन
रेशीमगाठ - प्रेमाचे संबंध
लंकेची पार्वती - अत्यंत गरीब स्त्री, अंगावर अलंकार नसलेली स्त्री
लंबकर्ण - मूर्ख, गाढव
लटपटपंची - घाबरल्याणे धरसोडीचे बोलणे
लठ्ठंभारती - लठ्ठ व मंद मनुष्य
ललाटी - कपाळी
लवंगी मिरची - मनाला झोंबेल असे फटफट बोलणारी स्त्री
लक्ष्मण रेषा - मर्यादा, संयम
लांगूलचालन - स्वार्थासाठी केलेली खुशामत
लाखोली - शिवी, एक लक्ष, मोजून केलेली स्त्री
लाट्यागंगाजी - दिसेल ते हस्तगत करणारा
लाडोबा - लाडावलेला मुलगा
लालबावटा - धोक्याची सूचना
लोखंडाचे चणे - फार कष्ट
लोणकढी थाप - खोटी थाप
वज्रलेख - कायम टिकणारे
वज्राघात - फार मोठे संकट
वर्म - रहस्य
व्यतिपात - वारंवार संकट ओढवून घेणारा
व्युत्पत्ती - उगम
वरणभात - विजोड जोडपे
वाचस्पती - वाचाळ, बडबड्या
वाचाळवीर - बोलण्यात पटाईत असणारा काम चुकार माणूस
वाघिणीचे दूध - अंगात शौर्य उत्पन्न करणारी
वाटाण्याच्या अक्षता - नकार
वामकुक्षी - दुपारच्या जेवणानंतरची विश्रांती
वामनमूर्ती - बुटका, ठेंगू
विंचवाचे बिर्हाड - मागेपुढे कोणी आप्त नसलेला, सडाफटिंग मनुष्य
विकतचे श्राद्ध - गरज नसताना अंगावर घेतलेले काम
विश्वामित्र - अहंमन्य मनुष्य
विळ्या भोपळ्याएवढे सख्य - पक्के शत्रूत्व
वीरभद्र - अतिशय अक्राळविक्राळ व दुराग्रही व्यक्तिमत्व
वैरण - ज्वारीची ताटे, जनावरांचे खाद्य
शंखध्वनी - ओरडून सांगणे
शंभरनंबरी - पूर्णपणे सत्य, अस्सल, उत्तम
शकुनीमामा - कपटी आप्त
शबरीची बोरे - भक्तिभावाने अर्पण केलेली क्षुल्लक वस्तू
शरपंजरी - मृत्यूशय्येवर असणारा
शिकंदर - भाग्यवान
शिराळशेठ - रंगेल, चैनी माणूस
शिराळशेटी ऐश्वर्य/राज्य - क्षणभंगुर ऐश्वर्य/राज्य
शेंदाड शिपाई - भित्रा मनुष्य
शिकंदर नशीब - चांगले नशीब
शुंभ - धष्टपुष्ट मात्र बुद्धीने मंद
शुक्राचार्य - कृश मनुष्य, व्रतस्थ
शुक्लकाष्ठ - नसते लचांड
शूर्पणखा - कुरूप स्त्री
शेंडेफळ - शेवटचे अपत्य
शेंडेनक्षत्र - अचानकपणे दीर्घकाळानंतर भेटलेले
शेलापागोटे - मस्करीत बोलण्याचा काव्यात्मक प्रकार
शेळीचे शेपूट - कशाचाच उपयोग नसणारी वस्तू
श्रीगणेशा - एखाद्या गोष्टीचा आरंभ
श्रीमुख - तोंड
सतीचे वाण - दृढनिश्चय
सरकारी पाहुणा - कैदी
सदावर्त - धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
सडासोट - बायकामुले नसलेला
सतीचा लाल - श्रेष्ठ मातेचा पराक्रमी पुत्र
सतीसावित्री - पतीव्रता स्त्री
समर्थाघरचे श्वान - थोराच्या आश्रयाने उन्मत्त झालेला हीन
समुद्रमंथन - यश प्राप्तीसाठी करावयाचे अपार कष्ट
स्मशान वैराग्य - मृत्यूमुळे आलेले तत्कालीन वैराग्य
सरड्याची धाव - बुद्धीचा तोकडेपणा
सवती मत्सर - स्वार्थासाठी दोघांत निर्माण झालेले मत्सर
सव्यसाची - एखादे काम डाव्या व उजव्या हाताने कुशलतेने करणारा
स्वल्पविराम - क्षणभर विश्रांती
सशाचे शिंग - अस्तित्वात नसलेली गोष्ट
सह्याजीराव - केवळ सहीचा अधिकारी
सांबाचा अवतार - अत्यंत भोळा माणूस
साखर पेरणे - गोड बोलून दुसर्याला वश करून घेणे
साठमारी - दोन व्यक्तींमधील भयानक मारहाण
साडेसाती - आपत्तीचा काळ
सापाची जात - दुष्ट बुद्धीची व्यक्ती
सारवासारव - खरे न सांगता वेळ मारून नेणे
साग्रसंगीत - आरंभापासून शेवटपर्यन्त रीती रिवाजानुसार पार पडणे
सावळा गोंधळ - अव्यवस्थितपणाचा कारभार
साष्टांग नमस्कार - शरणागती पत्करणे
सिंहावलोकन - गतकाळाचे अवलोकन
सुंदोपसुंदी - दोन भावांतील भांडण
सुदाम्याचे पोहे - भक्तीने अर्पण केलेली साधी गोष्ट
सुलतानशाही - जुलमी कारभार
सुवर्णमध्य - तडजोड
सुळावरची पोळी - जिवावर बेतणारे काम, जीवन धोक्यात घालून होणारा फायदा
सूर्यवंशी - सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठणारा
सोटभैरव - धिप्पाड व आडदांड मनुष्य
सोनेरी टोळी - लबाडांची टोळी
हंडापळी - विजोड जोडपे
हत्तीचे पिलू - लठ्ठ मनुष्य
हमखास - खात्रीने
हरईची मुळी - त्रास सहन करून देखील टिकून राहणारी वस्तू
हरीचा लाल - चैनी, खुशालचेंडू व्यक्ती
हरिश्चंद्र - सत्यवचनी माणूस
हरदासी कथा - मूळ मुद्द्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे
हरबर्याचे झाड - लबाडीने खोटी स्तुती
हलक्या कानाचा - ऐकीव गोष्टीवर सहज विश्वास ठेवणारा
हातचा मळ - सहज शक्य असणारी गोष्ट
हातचे कांकण - स्पष्ट दिसणारी गोष्ट
हातमिळवणी - संगनमत
हिंगाचा खडा - विघ्नसंतोषी व्यक्ती
हिडिंबा - कुरूप व थोराड स्त्री
हिरवे निशाण - कार्यारंभास अनुमती
हुंडी उपवर - लग्नाची मुलगी
हुकमी एक्का - खात्रीलायक साधन
होयबा - स्वतःची बुद्धी न चालवता दुसर्याचे ऐकणारा
होळी - एखाद्या वस्तूचा नाश
क्षुब्ध - अत्यंत चवताळलेला
क्षौरकार्य - हजामत
ज्ञानांजन - ज्ञानरूपी काजळ
ज्ञानोबाची मेख - निरुत्तर करणारी बाब
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू