मराठी वाक्यप्रचार किंवा वाक्प्रचार - ५१ ते २५०
Use find in page from your browser to search
अक्कल पुढे धावणे - बुद्धीचा योग्य प्रकारे वापर न करणे
अक्कल मिळकत खाणे - दुसर्याचे ऐकून वागणे, दुसर्याच्या विचाराप्रमाणे वागणे व बोलणे
अक्कल विकत घेणे - अनुभावातून आलेले शहाणपण
अक्कल सांगणे - शहाणपण शिकविणे, चांगल्या गोष्टी सांगणे
अकलेचा खंदक - मूर्ख, बेअकली माणूस, विचार न करता काम करणारा
अकलेचा कांदा असणे - बुद्धी न वापरता वागणे
अकलेचा बंद असणे - हुशारीने वागणे, दूरदर्शीत्व, शहाणपण असणे
अकलेचे तारे तोडणे - ताळमेळ नसणारे बोलणे, अविचाराने बडबड करणे
अकरावा गुरु होणे - भाग्य उजळणे
अकरावा रुद्र असणे - अतिशय तापट स्वभाव असणे
अकसारणे - प्रसिद्ध होणे
अकांडतांडव करणे - रागाने आदळाआपट करणे, रागाने विनाकारण आरडाओरडा करणे
अक्रीताचा व्यवहार - भ्रष्ट व्यवहार करणे, नुकसानकारक व्यवहार करणे
आखाड्यात उतरणे - विरोधकाशी सामना देण्यास तयार होणे
अखेर होणे - मरण पावणे
अखेरी मारणे - शेवटचा डाव जिंकणे
अगडीदगडी जीव घालणे - अडचणीत येणे
अगा बांधणे - तर्क काढणे
अग्निकांड घडविणे - कपटाने आग लावणे, लावालावी करणे, आगीत तेल ओतणे
अग्निकाष्ठ भक्षणे - स्वतःस जाळून घेणे
अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीस उतरणे, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अलौकिक कृती करणे
अग्नि देणे - सरणावरील मृतदेह पेटविणे
अग्निप्रवेश करणे - सती जाणे, स्वतःस जाळून घेणे
अग्निसात होणे - आगीत नष्ट होणे
अघळपघळ बोलणे - उगाच बडबड करणे
अचंबा वाटणे - चकित होणे
अचकल मिचकल खाणे - काहीही खाणे
अचांगीने बोलणे - चुकीचे बोलणे
अजमाईसीस येणे - अनुभवास येणे, प्रत्ययास येणे, लक्षात येणे
अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे
अट घालणे - शर्त घालणे
अठरा विश्व दारिद्र्य असणे - अतिशय दारिद्र्य असणे
अडक्याची भवानी असणे - क्षुल्लक असणे
अडणीवरचा शंख असणे - निरुपयोगी असणे
अडकित्त्यात सापडणे - दोन्हीकडून संकटात सापडणे
अढंच असणे - एखाद्याला वर चढवणे
अढीच्या दिढी - अव्वाच्या सव्वा, फाजीलपणा
अढी धरणे - अडून बसणे, एखाद्याविषयी मनात आकस बाळगणे
अत्तर मुरणे - उगीच आव आणणे
अत्तराचे दिवे लावणे - खूप खर्च करणे, बेसुमार उधळपट्टी
अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट
अतिप्रसंग करणे - अयोग्य वर्तन करणे
अद्दल घडवणे - धडा शिकविणे
अद्दल घडणे - चांगली शिक्षा मिळणे
अद्वातद्वा बोलणे - वेडेवाकडे बोलणे, शिवीगाळ करणे, ताळतंत्र सोडून बोलणे
अधःपतन होणे - विनाश होणे, संपूर्ण जाणे
अधःपात होणे - वाईट स्थिती प्राप्त होणे
अर्धचंद्र देणे - गचांडी देणे, उचलबांगडी करणे
अर्ध्या वचनात असणे - आज्ञापालनास तत्पर असणे, पूर्ण कह्यात असणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा लाभाने अति आनंदित होणे
अनर्थ गुदरणे - अचानक संकट ओढवणे, एकाएकी मोठे संकट येणे
अन्न अन्न करणे - खायला अन्न न मिळणे
अन्नत्याग करणे - उपोषण करणे, काहीही न खाणे
अन्नपाणी सोडणे - उपोषण करणे, आजाराने काहीही खाता न येणे
अन्नाची लाज धरणे - उपकाराची जाणीव ठेवणे
अन्नात माती कालवणे - स्वतःच्या निर्वाहाचे साधन नष्ट करणे
अन्नान्न दशा होणे - भिकेला लागणे
अन्नावर तुटून पडणे - अधाशीपणे खाणे
अन्नास जागणे - कृतज्ञ असणे, उपकाराची जाणीव ठेवणे
अन्नास मोताद होणे - उपासमार होणे, वाईट दिवस येणे, गरिबीत दिवस काढणे
अन्नास लावणे - निर्वाहाचे साधन मिळवून देणे
अनाकानी करणे - दुर्लक्ष करणे
अनुग्रह करणे - कृपा करणे, स्वीकार करणे, उपकार करणे
अनुमान करणे - तर्क लावणे
अपराध पोटात घेणे - क्षमा करणे
अबदा धरणे - सांभाळ करणे
अब्रूवर पांघरूण घालणे - प्रतिष्ठा जपणे
अब्रू वेशीवर टांगणे - बेअब्रू करणे
अभय देणे - जीवनदान देणे, क्षमा करणे, सुरक्षितपणाची हमी देणे
अभिवादन करणे - नमस्कार करणे
अमरपट्टा घेऊन येणे - अमर असण्याचे आश्वासन मिळविणे, कायमस्वरूपी जीवंत राहणे
अमृतकळा सोसणे - जीव घाबरा होणे
अमृत शिंपडणे - गोडगोड बोलणे
अमावस्या जीवनात येणे - जीवनात दु:खमय अंधकार येणे
अरत्र ना परत्र - इहलोक ना परलोक
अर्धचंद्र देणे - गचांडी धरणे, हकालपट्टी करणे
अर्ध्या वचनात असणे - बिनतक्रार आज्ञा पाळणे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा लाभाने अतिआनंदित होणे
अलभ्य लाभ होणे - दुर्मिळ गोष्ट मिळणे
अल्ला अल्ला करणे - ईश्वराची करुणा भाकणे
अल्लाची गाय होणे - अतिशय गरीब व निरुपद्रवी होणे, गयावया करणे
अलीचा दरबार फिरणे - अत्यंत थाटमाट असणे
अवगत होणे - माहिती होणे
अवटणे - ओहोटी लागणे
अवघडल्यासारखे वाटणे - शरमल्यासारखे वाटणे
अवदसा आठवणे - स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे, अविचाराने वागणे
अवढणणे - वीट येणे
अवलोडणे - पाण्यात बुडणे
अवतार संपणे - मृत्यू होणे, जनमातून मुक्ती मिळविणे
अवलंब करणे - अनुसरणे
अवसान येणे - स्फुरण येणे
अवाक्षर न काढणे - तोंडातून ब्र न काढणे, अक्षरही न बोलणे
अव्हेरणे - नाकारणे
अव्हेर करणे - दूर लोटणे
असंगाशी संग करणे - नको त्या व्यक्तीशी संबंध येणे
अस्तन्या सावरणे - हाणामारीस तयार होणे, सरसावणे, कामासाठी तयार होणे
अस्मान ठेंगणे होणे - गर्वाने फुगून जाणे
अस्मानाला भिडणे - अहंकार होणे, प्रगती होणे
असे होणे - वैधव्य प्राप्त होणे
अहमहमिका लागणे - चढाओढ लागणे
अळंटळं करणे - कामचुकारपणा करणे, आळस करणे
अक्षत देणे - आमंत्रण देणे
अक्षता देणे - लग्न होणे
अक्षता पडणे - लग्न लागणे
अक्षता पाठवणे - लग्नासाठी आमंत्रण देणे
अक्षर वाङमय असणे - चिरकाल टिकणारी साहित्यकृती
अज्ञातवासात असणे - निर्जनस्थळी वास करणे
आंगवणे - नवस करणे
आंदकण - नाउमेद होणे
आंतरिक आच असणे - मनातील इच्छा असणे
आंबटशौक करणे - भलत्यासलत्या चैनी करणे
आईमाई करणे - गयावया करणे, मनधरणी करणे
आकांत करणे - रडून आरडाओरडा करणे
आकारास येणे - मार्गास लावणे
आकाश ठेंगणे होणे - गर्वाने फुगून जाणे
आकाश पाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे, क्षोभ किंवा कल्लोळ करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे
आकाश फाटणे - चोहोबाजूने संकटे येणे
आकाशाची कुर्हाड - परमेश्वराची अवकृपा होणे, सर्व बाजूंनी संकटे येणे
आकाशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे
आकाशाला झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम करणे
आकाशाला ठिगळ लावणे - फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे
आखूडशिंगी बहुदुधी - सर्व चांगल्या गोष्टी एकत्र असणे
आखाड्यात उतरणे - एखाद्या वादास किंवा संघर्षास सिद्ध होणे, दोन हात करण्यास तयार होणे
आख्यान मांडणे - कंटाळवाणे कथन करणे
आग ओकणे - रागाने फटकळ बोलणे
आग पाखडणे - शिव्यांचा वर्षाव करणे, रागाने मोठ्या आवाजात बोलणे
आगीत उडी घालणे - एखादे संकट ओढवून घेणे
आगीत तेल ओतणे - भांडण विकोपास जाईल अशा तर्हेने भर घालणे
आगीतून निघून फुफाट्यात पडणे - एका संकटातून दुसर्या संकटात सापडणे
आघाडीवर असणे - पुढे असणे
आघाडी साधणे - वेळ साधणे
आटापिटा करणे - प्रयत्नांची पराकाष्ठा करणे
आटे ढिले होणे - अतिश्रमाने अंगी त्राण न उरणे
आडपडदा न ठेवणे - मनमोकळेपणाने आपल्या सर्व गोष्टी सांगणे
आडवा पालव घालणे - एखादे कृत्य गुप्तपणे करणे
आडव्यात शिरणे - मुख्य मुद्दा सोडून भलतेच बोलणे
आड-विहीर जवळ करणे - आत्महत्या करणे
आडवे घेणे - एखादी गोष्ट सरळ सरळ असताना देखील त्यात व्यंग काढणे
आडवे येणे - कार्यात अडथळा आणणे
आडात सोडून दोर कापणे - विश्वासघात करणे
आडून गोळी मारणे - दुसर्यामार्फत कार्य साधून घेणे
आढेवेढे घेणे - एखाद्या गोष्टीला एकदम तयार न होणे
आतड्याला पीळ पडणे - कळकळ वाटणे, दयेने कळवळणे, काळजाला पाझर फुटणे
आतडे तुटणे - जीव कळवळणे
आत्मा थंड करणे - मन तृप्त होणे/करणे
आत्मसात करणे - पुर्णपणे माहिती करून घेणे
आधाधिणे - भीती वाटणे
आनंद गगनात मावेनासा होणे - खूप आनंद होणे
आनंदाला उधाण येणे - खूप आनंद होणे
आनंदाला पारावार न उरणे - अति आनंद होणे
आपल्या पोळीवर तूप ओढणे - आपलाच स्वार्थ साधणे
आपली पोळी पकविणे - आपलेच मत खरे म्हणणे, हेकेखोर स्वभाव
आपलेच घोडे पुढे दामटणे - आपलाच स्वार्थ आधी साधून घेणे
आफळासाफळ करणे - रागाने आदळाआपट करणे
आबाळ होणे - हेळसांड होणे, दुर्लक्ष होणे
आभाळ कोसळणे - फार मोठा अनर्थ ओढवणे
आभाळ ठेंगणे होणे - अत्यानंद होणे
आभाळ फाटणे - सर्व बाजूंनी संकटे येणे
आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे - इतरांनी कष्टाने मिळविलेल्या गोष्टींवर चैन करणे
आयुष्याची दोरी तुटणे - मृत्यू ओढवणे
आव आणणे - अवसान आणणे, जे नाही ते दाखविण्याचा प्रयत्न करणे
आवळ्या भोपळ्याची मोट बांधणे - भिन्न प्रवृत्तीच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे
आवळा देऊन कोहळा काढणे - लहान वस्तु देऊन एखाद्याकडून मोठी वस्तु उकळणे
आ वासून पाहणे - आश्चर्याने थक्क होऊन पाहणे
आसन जमणे - चांगला जम बसणे, स्थिरता येणे
आसन डळमळणे - बसलेला जम विस्कटणे
आहारी जाणे - पूर्ण ताब्यात जाणे
आहुति देणे - प्रणार्पण करणे
आळ घेणे - दोषारोप करणे, खोटा आरोप करणे
आळा घालणे - मर्यादा किंवा नियंत्रण घालणे
इंगा जिरविणे - अद्दल घडविणे
इंगा दाखवणे - गर्व दूर करणे, एखाद्याची खोड मोडण्यासाठी आपली ताकद दाखवून जरब बसविणे
इंगळ्या डसणे - मनाला झोंबणे, वेदना होणे
इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे कार्य पार पाडणे
इजा बिजा तिजा - एकामागून एक असे तीन वेळा
इटामाती/विटामाती वाहणे - हलके शारीरिक कष्ट करणे
इडापिडा टळणे - सर्व संकटे, त्रास दूर होणे
इतरपितर काढणे - शिव्या देणे
इतिश्री होणे - शेवट होणे
इन्कार करणे - नकार देणे
इमानास जागणे - कृतज्ञता पाळणे, सचोटीने वागणे, वचन पाळणे
इरेस पडणे - अडचणीत सापडणे, गोत्यात येणे
इरेस पेटणे - चुरशीने कंबर कसून सज्ज होणे, जिद्दीने कार्य आरंभ करणे
ईप्सित घडणे - इच्छिलेले घडणे
उंटावरचा शहाणा - मूर्खपणाची सल्लामसलत देणारा
उंटावरून शेळ्या हाकणे - शहानपणाणे दूर राहून इतरांना उपदेश देणे
उंबराठे झिजवणे - हेलपाटे मारणे
उंबराचे फूल - दुर्मिळ गोष्ट, क्वचित भेटणारी व्यक्ती
उकळ्या फुटणे - अनुकूल प्रवृत्ती होणे, मनोमन आनंद घेणे
उकिरडे फुंकणे - अत्यंत हीन गोष्ट करणे
उखळ पांढरे होणे - वैभव प्राप्त होणे
उखाळ्यापाखाळ्या काढणे - एकमेकांचे दोष काढणे
उगीदुगी करणे - मध्ये-मध्ये बोलणे
उघडा पडणे - निराधार होणे
उचंबळून येणे - भावना अनावर होणे
उच्चाटन करणे - नष्ट करणे
उचल खाणे - एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणे, एकाएकी कामाला लागणे
उचलबांगडी करणे - हाकलून देणे, कामावरून कमी करणे, एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध दुसरीकडे नेणे
उचलून गोष्ट सांगणे - विरोध करणे, दर्शविणे
उच्छाद मांडणे - भंडावून सोडणे, त्रास देणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू