व्याकरणाची पार्श्वभूमी आणि वर्णमालेचे वर्गीकरण

भाषेचे स्पष्टीकरण करणारे किंवा भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भारतात सर्वप्रथम संस्कृत भाषेचे व्याकरण 'पाणिणी' याने रचल्याचे मानले जाते, तर गंगाधर शास्त्री फडके या भारतीय व्यक्तीने सर्वप्रथम मराठीचे व्याकरण लिहले, त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक लिहले.  तर्खडकर यांच्या मराठी व्याकरणातील योगदानासाठी त्यांना 'मराठी भाषेचे पाणिणी' असे म्हटले जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना 'मराठी भाषेचे शिवाजी' तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना 'मराठी भाषेचे जॉन्सन' असे म्हटले जाते.
  • मराठी वर्णमालेत 14 स्वर, 2 स्वरादी, 36 व्यंजने असे एकूण 52 वर्ण आहेत
  • वर्ण : तोंडावाटे बाहेर पडणार्‍या मूलध्वनिंना वर्ण असे म्हणतात
  • अक्षर : आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे.
  • वर्ण हे पाय मोडून लिहले जातात (क्) तर अक्षरे ही पाय न मोडता लिहतात (क) कारण त्यात स्वर मिसळलेला आहे असे मानले जाते
  • शब्द : अक्षरांना किंवा अक्षरांच्या समूहाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला शब्द म्हटले जाते.
  • वाक्य : अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे वाक्य होय
  • स्वर : स्वर हे स्वतंत्र असतात, त्यांच्या उच्चारसाठी इतर वर्णाची आवश्यकता भासत नाही. म्हणून स्वर हे अक्षर व वर्ण या दोन्ही गटात गणले जातात.
  • मराठीत एकूण 14 स्वर आहेत - अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए,अ‍ॅ, ऐ, ओ, ऑ, औ
  • र्‍हस्व स्वर : उच्चार करायला कमी वेळ लागणारे स्वर - अ, इ, उ, ऋ, लृ
  • र्‍हस्व स्वर किंवा व्यंजने उच्चारायला लागणारा जो कालावधी लागतो त्याला 'एक मात्रा' असे म्हणतात.
  • दीर्घ स्वर : उच्चार करायला जास्त वेळ लागणारे स्वर- आ, ई, ऊ
  • दीर्घ स्वर किंवा व्यंजने उच्चारायला लागणारा जो कालावधी लागतो त्याला 'दोन मात्रा' असे म्हणतात.
  • संयुक्त स्वर : ए (अ+इ/ई), ऐ (आ+इ/ई), ओ (अ+उ/ऊ), औ (आ+उ/ऊ)
  • इंग्रजी शबांच्या उच्चारसाठी आलेले स्वर : अ‍ॅ, ऑ
  • सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनातून निघणारे स्वर - अ-आ, इ-ई, उ-ऊ
  • विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनातून निघणारे स्वर - अ-इ, अ-उ, उ-ई, इ-ऊ
  • स्वरादी : जे वर्ण उच्चारताना त्याच्या आधी स्वराचा उच्चार होतो - अं (अनुस्वार), अः (विसर्ग)
  • व्यंजने : क् ते ज्ञ् ही एकूण 36 व्यंजने मानली जातात. व्यंजनाला स्वरान्त किंवा परवर्ण असेही म्हणतात
  • कठोर व्यंजने : जोरात व कठीण उच्चाराची व्यंजने, यांनाच श्वास किंवा अघोष वर्ण असेही म्हणतात
  • मृदु व्यंजने : हळुवार व सोप्या उच्चाराची व्यंजने, यांनाच नाद किंवा घोष वर्ण असेही म्हणतात
वर्णमालेचे वर्गीकरण:

कठोर वर्ण

मृदु वर्ण

अनुनासिक

क् ते म् ही सर्व स्पर्श व्यंजेने आहेत

 

कठोर: जोरात उच्चार होणरी

 

मृदु: हळू उच्चार होणारी

 

अनुनासिक: नाकातून उच्चार होणारी

 

या व्यतिरिक्त सर्व स्वर व स्वरादी, अनुनासिके आणि य,र,ल,व,ळ हे मृदु वर्ण म्हणून गणले जातात.

क्

ख्

ग्

घ्

ङ

च्

छ्

ज्

झ्

ञ्

ट

ठ

ड

ढ

ण

त

थ

द

ध

न

प

फ

ब

भ

म

 

य

र

ल

व

← मृदु वर्ण, अर्धस्वर : स्वरासारखा उच्चार असणारी

श

ष

स

← कठोर वर्ण, उष्मे / घर्षक : उच्चारताना उष्णता/घर्षण निर्माण होणारी

ह

← महाप्राण : उच्चारताना मोठ्या प्रमाणात हवा बाहेर फेकणारी

ळ

← स्वतंत्र वर्ण, मृदु वर्ण, द्रविडियन वर्ण

क्ष

ज्ञ

← संयुक्त वर्ण - दोन वार्णांच्या मिश्रणातून बनलेली


स्वर

व्यंजने / स्वरादी

उच्चारस्थानानुसार वर्णाचा प्रकार

अ, आ, अॅ, ऑ

क, ख, ग घ, ङ, ह, अः

कंठ्य

इ, ई

च, छ, ज, झ, ञ्, य, श

तालव्य

ऋ

ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ

मूर्धन्य

लृ

त, थ, द, ध, न, ल, स

दंन्त्य

उ, ऊ

प, फ, ब, भ, म

ओष्ठ्य

ए, ऐ

-

कंठतालव्य

ओ, औ

-

कंठौष्ठ्य

-

व

दंतौष्ठ्य

-

च, छ, ज, झ

दंततालव्य

-

अं

नासिक्य

 

 

टिप्पण्या