खेळातील स्वयंपाक - Marathi Poem Class 4 - meaning in Marathi, Hindi, English and Exercise Solution

Read Marathi poem & Scroll down for Hindi and English Meaning, also check meaning of words from this poem in Hindi & English below | Find more poems and exercise solution: Check Labels

मराठी कविता:

पिठामध्ये पाणी घालतो,
तिंबून तिंबून कणीक मळतो,
भरभर भरभर पोळी लाटतो.
पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो,
गरमगरम पोळी वाढतो.

विळीवरती वांगी चिरतो,
गरम मसाला त्यात भरतो.
कढईत तेल, मोहरी फुटता,
तिखट घालून रस्सा करतो.

डाळ, तांदूळ भांड्यात भरतो,
पाण्याची वर धार धरतो.
कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो,
स्वयंपाक झाला, जाहीर करतो.

स्वयंपाक माझा डबीत मावतो,
तरीही आम्ही पोटभर जेवतो.
पचनासाठी दोन फळे,
प्रत्येकाला देऊन ठेवतो.

हिंदी अनुवाद:

आटे मे पानी डालता हूं,
गिला गिला कर के (आटा) सानता हूं.
तेज तेज रोटी बेलता हूं, 
रोटी का  गुब्बारा तवे पर फुलता है,
गरमगरम रोटी परोसतां हूं.

बोटीपर बैंगण काटता हूं,
गरम मसाला उसमे भरता हूं.
कढाई मे तेल, सरसों फुटते ही,
तिखीमिर्च डालकर रस्सा बनाता हूं.

दाल, चावल बर्तन मे भरता हूं,
पाणी की धार उपर पकडता हूं.
कुकर के मुह मे सिटी डालता हूं,
खाना बनाना होगया जाहीर करता हूं.

बनाया हुआ खाना डिब्बी मे समाता है,
फिर भी हम पेट भर खाते है.
पचन के लिए दो फल,
हर एक को दे के रखता हूं.

English Meaning:

I pour water into the flour,
by making it wet I knead dough,
fast fast I roll Roti,
Roti's balloon inflates on the pan,
I serve hot-hot Roti.

I cut brinjal on vegetable-cutter,
I fill spices in it,
oil in cauldron, when mustard breaks,
I make gravy by adding chilly-powder.

I fill lentils, rice in a pot,
I pour water in it from above,
I put the whistle in the mouth of pressure-cooker,
I announce that cooking is done.

cooked food fit into the small box
yet we eat full of stomach,
two fruits for digestion
I give it to everyone.


Exercise - स्वाध्याय :

खालील कामांसाठी कवितेत आलेल्या कृती क्रमाने सांगा. (नीचे दिए काम के लिए कविता मे आई कृतीया क्रम से लिखे)
(अ) पोळी करणे
उत्तर: पिठामध्ये पाणी घालणे, तिंबून तिंबून कणीक मळणे. भरभर भरभर पोळी लाटणे. पोळी तव्यावरती भाजणे.
(आ) भाजी करणे. 
उत्तर: विळीवरती वांगी चिरणे, गरम मसाला त्यात भरणे. कढईत तेल, मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करणे.
(इ) भात करणे.
उत्तर: डाळ, तांदूळ भांड्यात भरणे, पाण्याची वर धार धरणे. कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबणे.
खालील कृतींसाठी कोणती साधने लागतात ते सांगा. (नीचे दिए कृतीयो के लिए कौनसे साधन लगते है वो लिखे)
(अ) पोळी भाजणे - तवा, उलतणे, शेगडी
(आ) भाजी चिरणे - विळी / चाकू, प्लेट
(इ) भात करणे - कुकर, तांदूळ, पाणी, शेगडी
खालील अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. (नीचे दिए अक्षरो से नया शब्द बनाइए)
(अ) का, पा, य, ल - काल, काय, पाक, पायल, पाय, पाल
(आ) प, ना, सा, ट, क - नाटक, नाक, साप, कप, टक
(इ) क, मा, स, वी, र - वीर, कर, कवी, वीस, रवी, कसर
(ई) मो, री, ह, र, णी, पा - मोर, मोह, पाणी, हरीण, मोहर
चित्र पहा. वर्णन करा. (चित्र देखो. वर्णन करो)
उदाहरण: एका नदीच्या काठी काही घरे आहेत. नदीच्या पलीकडे डोंगर दिसत आहेत. एक घर एका झाडाखाली आहे. एक घर मोकळ्या जागेत आहे. घरांवर छप्पर दिसत आहे. नदीकाठाचा परिसर हिरवागार झालेला दिसत आहे.





Khelatil Swayampak, Class 4 Marathi Sulabhbharati Exercise Solution, std 4, 4th std, kavita, translate, Swaypak, Svaypak, Svayampak, इयत्ता चौथी, 4 थी, वर्ग 4 था, कक्षा 4 थी, चौथा, Maharashtra State Board, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, translation

टिप्पण्या