मैत्री - Exercise Solution

मैत्री

चित्रे पहा. सांगा. (चित्र देखीए. बताइए)

(अ) मुलगा कोठे उभा आहे ? (लडका कहा खडा है ?)

उत्तर: मुलगा झाडापाशी उभा आहे

(आ) मुलगा कोणाला घाबरला? (लडका किससे डर गया ?)

उत्तर: मुलगा हत्तीला घाबरला

(इ) मुलगा झाडावर का चढला? (लडका पेड पर क्यो चढा ?)

उत्तर: हत्तीच्या भीतीने मुलगा झाडावर चढला

(ई) मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले?

उत्तर: हत्तीने सोंड वर करून झाडावरचे फळ घेण्याचा प्रयत्न केला म्हणून

(उ) हत्तीला आनंद का झाला?

उत्तर: मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले म्हणून हत्तीला आनंद झाला

(ऊ) गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते?

उत्तर: तर मी झाडावर चढून बसलो असतो व मोठ्या माणसांना मदत मागितली असती

(ए) तुम्हांला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची एखादी गोष्ट सांगा.

उत्तर: एकदा रमेश शाळेला जात होता. तेव्हा रस्त्यावरील कुत्रा त्याच्या मागे मागे येऊ लागला. रमेशला कुत्र्याची भीती वाटली. त्याने खिशातील खाऊ रस्त्याकडेला ठेवला. कुत्रा तो खाऊ खाण्यात व्यस्त झाला आणि रमेश भराभर चालून शाळेला पोहोचला.


Class 4 Marathi Sulabhbharati excercise solution


टिप्पण्या