अंगावर शहारे येणे, अंगावर शेकणे, अंगावरून वारा जाणे, अंगी आणणे, अंगी लागणे, अंगीकार करणे, अंडी पिल्ली ठाऊक असणे, अंत पाहणे, अंत लागणे, अंतर देणे

 मराठी वाक्प्रचार किंवा मराठी वाक्यप्रचार ३१ ते ४०


अंगावर शहारे येणे - खूप घाबरणे

अंगावर शेकणे - नुकसान सहन करणे

अंगावरून वारा जाणे - पक्षाघात होणे

अंगी आणणे - बिंबवून घेणे, शिकणे

अंगी लागणे - फायदा होणे

अंगीकार करणे - स्वीकारणे

अंडी पिल्ली ठाऊक असणे - एखाद्याच्या गुप्त गोष्टीची माहिती असणे

अंत पाहणे - कसोटी पाहणे, छळणे, गांजणे

अंत लागणे - शेवट दिसणे, खोली समजणे

अंतर देणे - सोडून देणे, परित्याग करणे


इतर वाक्प्रचाराच्या अर्थांसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा

टिप्पण्या