अंग काढणे, अंकित करणे, अंग घेणे, अंग चोरणे, अंग झडणे, अंग झाकणे, अंग झाडणे, अंग धरणे, अंग मोडून काम करणे, अंग मोडून येणे

मराठी वाक्प्रचार किंवा मराठी वाक्यप्रचार १ ते १०


अंग काढणे - एखाद्या कार्यातून आपला संबंध काढून घेणे

अंकित करणे - पूर्ण ताब्यात घेणे, दुसर्‍याच्या अधीन असणे

अंग घेणे - लठ्ठ होणे

अंग चोरणे - अगदी थोडे काम करणे, कामात कुचराई करणे

अंग झडणे - रोडावणे, कृश होणे

अंग झाकणे - एखाद्या कार्याशी असणारा आपला संबंध उघड न करणे

अंग झाडणे - झिडकारणे, नाकबूल करणे, जबाबदारी झटकणे, अव्हेरणे

अंग धरणे - बाळसे घेणे, तब्येत सुधारणे, रुजणे

अंग मोडून काम करणे - अतिशय कष्ट करून एखादे काम करणे

अंग मोडून येणे - ताप येण्यापूर्वी कसकसणे


इतर वाक्प्रचाराच्या अर्थांसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा

टिप्पण्या