राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS)- ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी
NMMS परीक्षेचा निकाल येथे पहा
Check NMMS exam result Here
केंद्र शासनामार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या मार्फत या योजनेसाठी इयत्ता ८ वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. दरवर्षी साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान परीक्षेची जाहिरात निघते व फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान परीक्षा पार पडते. आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणासाठी सहाय्य व्हावे हा या योजनेचा हेतु असतो.
- पात्रता:
- इयत्ता ८ वी वर्गात शिकणारे असे विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी आहे
- विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी विद्यालय या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकत नाहीत, तसेच शासकीय वसतिगृहात राहणारे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला बसू शकत नाहीत
- इयत्ता ७ वी मध्ये ५५% असणे आवश्यक (SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५०% असणे आवश्यक)
- तहसिलदार/तलाठ्यांकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला शाळेत जमा करणे आवश्यक
- परीक्षा फी:
- सर्व विद्यार्थ्यांसाठी १०० रु इतकी परीक्षा फी आहे
- शाळेमर्फत विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात
- परीक्षेचा पॅटर्न:
- बुद्धिमत्ता चाचणी हा ९० गुणांचा ९० प्रश्न असलेला पेपर १
- योग्यता चाचणी हा ९० गुणांचा ९० प्रश्न असलेला पेपर २
- प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा वेळ व दोन पेपर च्या मध्ये १ तास ब्रेक (मधली सुटी)
- योग्यता चाचणी मध्ये ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमवार आधारित सामान्य विज्ञान ३५ गुणांसाठी, समाज शास्त्र ३५ गुणांसाठी व गणित २० गुणांसाठी
- मेरीट मध्ये येणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती:
- दरमहा १००० रु प्रमाणे वार्षिक १२००० रुपये
- इयत्ता ९ वी ते १२ पर्यन्त ही शिष्यवृत्ती मिळते
- शिष्यवृत्ती निरंतर मिळण्यासाठी ९ वी व ११ वी ला ५५% मिळवणे आवश्यक तर १० वी ला ६०% मिळवणे आवश्यक (SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५% सूट)
- साधारण ११ हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेसाठी महाराष्ट्रातून निवडले जाते
- परीक्षेचे महत्व:
- आर्थिक दुर्बल विद्यार्थी ही परीक्षा पास होऊन त्यांचा ९ वी ते १२ वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च भागवू शकतात
- इतर शालेय परीक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारी परीक्षा व योजना
- मेरीट मध्ये येणार्या विद्यार्थ्यांची खूप वाह वाह होते
आम्हाला Facebok वर follow करा- follow करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा- ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू