राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (National Talent Search Exam) - NTSE Maharashtra

Latest News: NTSE National Stage 2 exam date is not announced

ताजी बातमी: NTSE राष्ट्रीय स्तऱ स्टेज 2 परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही

  • NTSE 2020-21 cut off Maharashtra stage 1 - GEN: 158, OBC: 145, SC: 129,  ST: 114, EWS: 141
  • NTSE Result 2020-21 Maharashtra stage 1 - पहा (view)
  • NTSE परीक्षा निकाल 2020-21 महाराष्ट्र स्टेज 1 - पहा (view) 

  • NTSE Answer Key 2020-21 Maharashtra stage 1 - पहा (view)
  • NTSE परीक्षा अंतिम उत्तरसूची 2020-21 महाराष्ट्र स्टेज 1 - पहा (view)
  • NTSE Previous Year Question Papers for class 10 Maharashtra
  1. NTSE stage 1 Maharashtra question paper - 2020-2021 - पहा (view)
  2. NTSE stage 1 Maharashtra question paper - 2019-2020 - पहा (view)
  3. NTSE stage 1 Maharashtra question paper Answer Key - 2020-2021 - पहा (view)
  4. NTSE stage 1 Maharashtra question paper Answer Key - 2019-2020 - पहा (view)
ही माहिती वाचा :

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (National Talent Search Exam) NTSE या नावाने ओळखली जाते. ही परीक्षा प्रत्येक वर्षी इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी देऊ शकतात. NCERT मार्फत ही परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्या दरम्यान या परीक्षेची जाहिरात निघते व जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार पुढील मे महिन्यात ही परीक्षा पार पडते. NTSE मध्ये मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना विविध रकमेची स्कॉलरशिप त्यांची पीएचडी पूर्ण होईपर्यन्त दिली जाते. या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा शाळेमर्फत ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा फॉर्म भरता येतो. ही परीक्षा एकूण दोन स्तरावर होते. पहिला स्तर हा राज्य पातळीचा असतो तर दूसरा स्तर हा राष्ट्रीय पातळीचा. राज्य पातळीवर मेरीट मध्ये येणारे विद्यार्थीच राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेस पात्र ठरतात.

  •  परीक्षा फॉर्मची फी:

  1. परीक्षेला कसलीही फी नाही
  • परीक्षेचा पॅटर्न महाराष्ट्र राज्य स्तर (stage 1):
  1. बुद्धिमत्ता चाचणी हा १०० गुणांचा पेपर १
  2. योग्यता चाचणी हा १०० गुणांचा पेपर २ ( विज्ञान ४० गुण, समाजशास्त्र ४० गुण, गणित २० गुण )
  3. १०० गुणाचे दोन्ही पेपर वेगवेगळे असतात
  4. प्रत्येक पेपरसाठी २ तासांचा वेळ असतो, म्हणजे एकूण ४ तास पेपर होतो
  5. दोन पेपरच्या मध्ये २ तासांचा  ब्रेक (मधली सुटी) दिला जातो
  6. पेपर १ ला MAT तर पेपर २ ला SAT म्हणून ओळखतात
  7. दोन्ही पेपर मध्ये ४०% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक
  • राष्ट्रीय स्तरावर मेरीट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती: 
महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तरावर मेरीट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी इयत्तेनुसार खालील प्रमाणे स्कॉलरशिप मिळते:
  1. ११ वी, १२ वी आणि डिप्लोमा शिक्षण होईपर्यन्त १२५० रु प्रती महिना
  2. डिग्री च्या शिक्षणासाठी संपूर्ण डिग्री होईपर्यंत २००० रु प्रती महिना
  3. इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट व कायद्याची डिग्री घ्यायची असेल तर मात्र द्वितीय वर्षापर्यंतच स्कॉलरशिप मिळते. याव्यतिरिक्त इतर कोर्सेस साठी संपूर्ण कोर्स होईपर्यंत मिळते.
  4. शिष्यवृत्ती निरंतर मिळण्यासाठी कॉलेज मध्ये प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के मिळवणे आवश्यक
  5. कॉलेज मध्ये विषय बॅक राहिले तर शिष्यवृत्ती बंद होऊ शकते
  6. कॉलेज मध्ये तुम्हाला इतर कोणती शिष्यवृत्ती मिळत असेल तर ही शिष्यवृती बंद होते
  7. SC, ST व OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सूची नुसार मेरीट मध्ये राखीव जागा
  • परीक्षेचे महत्व:
  1. विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखण्यास मदत
  2. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते
  3. मेरीट लिस्ट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची खूप वाह वाह होते
  4. खुल्या प्रवर्गातील गरीब व प्रतिभावंत विद्यार्थी यांना या शिष्यवृत्तीचा फायदा होऊ शकतो व काही प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळू शकते. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील कुठलीही इतर शिष्यवृत्ती न मिळणार्‍या गरीब व प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी ही परीक्षा अवश्य द्यायला हवी.
तुळजाई करियर अकॅडमी मध्ये या परीक्षेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नाममात्र शुल्क आकारून मार्गदर्शन केले जाते, सराव परीक्षा घेतल्या जातात.

आम्हाला Facebook वर follow करा- https://m.facebook.com/TuljaiCareerAcademy
आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा- https://t.me/joinchat/aL0E10S98qxjZmVl
NTSE Maharashtra official website - येथे क्लिक करा (Click here)
 

tags: राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, National Talent Search Exam, NTSE, What is NTSE, प्रज्ञाशोध परीक्षा काय आहे?, NTSE Exam Book, NTSE पुस्तक, प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तक, प्रज्ञाशोध परीक्षा निकाल 2020-21, ntse cut off 2021 stage 1 maharashtra, 

टिप्पण्या