महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (Maharashtra Talent Search Exam) - MTSE Maharashtra

Latest News: MTSE 2021 exam date is not announced

ताजी बातमी: MTSE २०२१ परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही

  • MTSE Exam Application Form (Registration) - भरा (fill) (2021 deadline passed)
  • MTSE परिक्षा फॉर्म - भरा (fill) (२०२१ ची तारीख निघून गेली)
ही माहिती वाचा :

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (Maharashtra Talent Search Exam) MTSE या नावाने ओळखली जाते. ही परीक्षा प्रत्येक वर्षी इयत्ता ८, ९, १० वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी देऊ शकतात. प्रत्येक वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्या दरम्यान या परीक्षेची जाहिरात निघते व जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार साधारण डिसेंबर महिन्यात ही परीक्षा पार पडते. राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी 'राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा' (NTSE) या' परीक्षेसाठी MTSE परीक्षेचा अभ्यास उपयुक्त ठरतो. MTSE मध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध बक्षिसे दिली जातात. या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा शाळेमर्फत ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा फॉर्म भरता येतो. 

  •  परीक्षा फॉर्मची फी:

  1. ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरल्यास २०० रु. फी
  2. ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरल्यास (१७७ रु + पोस्टेज ५० रु) = २२७ रु फी
  • परीक्षेचा पॅटर्न:
  1. बुद्धिमत्ता चाचणी हा १०० गुणांचा पेपर
  2. योग्यता चाचणी हा १०० गुणांचा पेपर ( विज्ञान ४० गुण, समाजशास्त्र ४० गुण, गणित २० गुण )
  3. दोन्ही पेपर एकाच प्रश्नपत्रिकेत असतात फक्त प्रश्नपत्रिकेत २ विभाग केलेले असतात
  4. दोन्ही पेपर मिळून ३ तासांचा वेळ असतो
  5. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी ५० गुणांची मुलाखत (interview) असते
  • मेरीट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे:
  1. राज्य पातळीवर पहिला, दूसरा व तिसरा क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५००० रु, ३००० रु व २००० रु
  2. राज्य पातळीवर मेरीट लिस्ट मध्ये येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला १००० रु
  3. जिल्हा पातळीवर मेरीट लिस्ट मध्ये येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला ४०० रु
  4. तालुका पातळीवर मेरीट लिस्ट मध्ये येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला १५० रु
  5. २०० पैकी ७० पेक्षा जास्त मार्क मिळवणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र
  • परीक्षेचे महत्व:
  1. विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखण्यास मदत
  2. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते
  3. तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मेरीट लिस्ट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची खूप वाह वाह होते
तुळजाई करियर अकॅडमी मध्ये या परीक्षेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नाममात्र शुल्क आकारून मार्गदर्शन केले जाते. गरीब विद्यार्थ्यांना कसलेही शुल्क आकारले जाणार नाही. या परीक्षांसाठी आवश्यक पुस्तक तुळजाई करियर अकॅडमी मध्ये उपलब्ध.
 

आम्हाला Facebook वर follow करा- follow करण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा- ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा


tags: महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, Maharashtra Talent Search Exam, MTSE Books, MTSE Result 2021, MTSE Exam 2021, mtse full form, mtse syllabus, mtse online form, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तक

टिप्पण्या