Latest News: Scholarship exam is scheduled on 9 August 2021
ताजी बातमी: स्कॉलरशिप परीक्षा ९ ऑगस्ट २०२१ रोजी होणार
हॉल तिकीटसाठी आपल्या शाळेला संपर्क करा
- Maharashtra Scholarship Exam Syllabus 2021 - पहा (view)
- 5th std & 8th std Scholarship Exam Sample Papers - 2020 - पहा (view)
- 5th std & 8th std Scholarship Exam Sample Papers - 2019 - पहा (view)
- 5th std & 8th std Scholarship Exam Sample Papers - 2018 - पहा (view)
ही माहिती वाचा :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दरवर्षी इयत्ता ५ वी व ८ वी वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत परीक्षेसाठी फॉर्म भरावा लागतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे हा या परीक्षेचा उद्देश असतो.
इयत्ता ५ वी:- पात्रता:
- इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात
- ११ वर्षांपेक्षा कमी वय असलेले विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतात
- १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजे त्याचे पालक किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असावे
- पालकांचे उत्पन्न कितीही असले तरी सर्व विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात
- परीक्षा फी:
- मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २० रु
- SBC, OBC, OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८० रु फी
- परीक्षेचा पॅटर्न:
- प्रत्येकी १५० गुणांचे २ पेपर असतात
- पेपर १ मध्ये 'प्रथम भाषा' हा विषय ५० गुणांसाठी २५ प्रश्न व 'गणित' हा विषय १०० गुणांसाठी ५० प्रश्न
- पेपर २ मध्ये 'तृतीय भाषा' हा विषय ५० गुणांसाठी २५ प्रश्न व 'बुद्धिमत्ता' हा विषय १०० गुणांसाठी ५० प्रश्न
- प्रत्येक पेपरसाठी २ तासांचा वेळ दिला जातो
- पेपर मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असतात म्हणजे दिलेल्या पर्यायातून उत्तर निवडायचे
- पेपर १ व पेपर २ यांच्या मध्ये १ तासाचा ब्रेक मिळतो (मधली सुटी)
- मेरीट मध्ये येणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती:
- ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मासिक १०० रु
- राष्ट्रीय ग्रामीण असलेल्या भागात राहत असलेल्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मासिक ५० रु
- विदर्भात शिकत असलेल्या विदर्थ्यांना मासिक २५ रु
- इयत्ता ६ वी व ७ वी या दोन वर्षासाठी ही शिष्यवृत्ती मिळते
- २०२१ या वर्षी होणार्या या परीक्षेसाठी मेरीट मध्ये येणार्या एकूण १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे
इयत्ता ८ वी:
- पात्रता:
- इयत्ता ८ वी च्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात
- १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेले विद्यार्थीच परीक्षेला बसू शकतात
- १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजे त्याचे पालक किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्रात राहत असावे
- पालकांचे उत्पन्न कितीही असले तरी सर्व विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात
- परीक्षा फी:
- मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २० रु
- SBC, OBC, OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८० रु फी
- परीक्षेचा पॅटर्न:
- इयत्ता ५ वी ला जसे परीक्षेचे स्वरूप आहे तसेच इयत्ता ८ वी साठी आहे
- प्रत्येक पेपर मध्ये प्रत्येकी जास्तीत जास्त १५ प्रश्न हे २ उत्तरांचे असतात, विद्यार्थ्यांना असे प्रश्न ओळखून उत्तरांचे दोन्ही पर्याय निवडायचे आहेत
- मेरीट मध्ये येणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती:
- ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मासिक १५० रु
- राष्ट्रीय ग्रामीण असलेल्या भागात राहत असलेल्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मासिक ७५ रु
- विदर्भात शिकत असलेल्या विदर्थ्यांना मासिक ४० रु
- इयत्ता ९ वी व १० वी या दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळते
- २०२१ या वर्षी होणार्या या परीक्षेसाठी मेरीट मध्ये येणार्या एकूण १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे
आम्हाला Facebook वर follow करा- https://m.facebook.com/TuljaiCareerAcademy
आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा- https://t.me/joinchat/aL0E10S98qxjZmVl
tags: 5th std scholarship books pdf, 5th std scholarship books pdf, Maharashtra Scholarship Exam date 2021, Maharashtra state scholarship exam 2021, msce pune scholarship, scholarship exam for class 5, scholarship exam for class 8, Maharashtra state scholarship exam 2021 hall ticket
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू