जवाहर नवोदय विद्यालय विषयी सर्व माहिती जाणून घ्या....

प्रवेश परीक्षेचे एडमिट कार्ड येथून मिळवा

Get selection test admit card From Here

प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी नियोजित

Exam is scheduled on 11th August 2021


  • जवाहर नवोदय विद्यालयं ही भारत सरकार द्वारा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या देखरेखीत देशभर चालणारी सरकारी व स्वायत्त विद्यालयं आहेत. देशाच्या ग्रामीण भागातील व मागास वर्गातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण मिळावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मॉडर्न युगाच्या स्पर्धेत टिकून राहता यावं, त्यांच्यात देशप्रेम, नैतिक मूल्य रुजावीत, पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने येथे दर्जेदार शिक्षण दिलं जातं.
  • नॅशनल पॉलिसी ऑन एड्युकेशन-1986 नुसार जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे आजतागायत देशात ६६१ नवोदय विद्यालयं आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तेथे इयत्ता ६ वी, ९ वी, ११ वी या वर्गांसाठी प्रवेश दिला जातो. इयत्ता ६ वी ला एकदा प्रवेश घेतला की दहावी पर्यन्त तिथच शिक्षण घेता येतं. जर आठवी नंतर ९ वी च्या वर्गात जागा रिकाम्या राहिल्या तर त्यासाठी इयत्ता ९ वी ला ८ वी पास झालेल्या इतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. तर ११ वी चा प्रवेश हा दहावीच्या परीक्षेतील मार्कांवर दिला जातो.
  • विद्यालयातील सोयी सुविधा व फी:   
  1. इयत्ता ६ वी ला प्रवेश घेतल्यावर ८ वी पर्यन्त मोफत शिक्षण
  2. ८ वी पर्यन्त मोफत हॉस्टेल व मेस
  3. ८ वी पर्यन्त वह्या, पुस्तकं, स्टेशनरी, युनिफॉर्म, स्कूल बॅग, विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनात लागणार्‍या वस्तु मोफत
  4. ९ वी आणि १० वी वर्गासाठी सर्व मुलींना सर्व सुविधा मोफत
  5. ९ वी आणि १० वी वर्गासाठी SC, ST प्रवर्गातील व दारिद्र रेषेखालील मुलांना सर्व सुविधा मोफत
  6. ९ वी आणि १० वी वर्गासाठी इतर प्रवर्गातील मुलांना महिना ६०० रु फी तर सरकारी नोकरदारांच्या मुलांना महिना १५०० रु फी  
  7. CBSE बोर्डानुसार अभ्यासक्रम
  • प्रवेश प्रक्रिया इयत्ता ६ वी:
  1. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये प्रवेश परीक्षेची जाहिरात निघते. 
  2. इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकत असलेले ९ ते १३ वयोगटातील विद्यार्थी या प्रवेश परीक्षेससाठी आपल्या शाळेतून फॉर्म भरू शकतात. किंवा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात
  3. फॉर्म भरल्यानंतर परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक मिळते, त्यामध्ये बुद्धिमत्ता, गणित व भाषा हे तीन विषय असतात
  4. एकूण १०० मार्कांची परीक्षा येणार्‍या मार्च ते मे महिन्या दरम्यान होते.
  5. ५० मार्क बुद्धिमत्ता, २५ मार्क गणित आणि २५ मार्क भाषा असा पेपर असतो व यासाठी एकूण वेळ २ तास इतकाच असतो
  6. परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची असते. म्हणजे दिलेल्या पर्यायातून उत्तर निवडायचे
  7.  परीक्षेचा निकाल लागल्यावर मेरीट नुसार प्रवेश दिला जातो, SC, ST व OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय आरक्षण सूची नुसार आरक्षणाचा लाभ घेता येतो. आरक्षणाचा टक्का हा ज्या त्या जिल्ह्यातील लोकसंख्येवर अवलंबून असतो. 
  8. एकूण प्रवेशापैकी ७५% जागा या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात
  9. साधारणतः प्रत्येक विद्यालयात ६ वी साठी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
  • तुळजाई करियर अकॅडमी मध्ये ६ वी च्या प्रवेश परीक्षेची तयारी ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करून घेतली जाते. लवकर अभ्यास सुरू करणे फायद्याचे ठरते. अधिक महितीसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉइन होऊ शकता तेथून आमच्याशी संपर्क करू शकता. 
  • टेलिग्राम ग्रुप ची लिंक:  https://t.me/joinchat/aL0E10S98qxjZmVl

tags: jawahar navodaya vidyalaya admission form 2020-2021 class 6th, javahar navodaya vidyalaya admission form 2020-2021, javahar navodaya vidyalaya selection test 2021, jawahar navodaya vidyalaya selection test 2021, javahar navodaya vidyalaya entrance exam 2021 classes, Tuljai Career Academy, jnv selection test 2021, jnv entrance exam 2021, jnv selection test result, jnv tuljapur result 2021

टिप्पण्या