2021 सेक्शन
2 गणित
1) 500 या संख्येला रोमन
संख्याचिन्हात कसे लिहले जाते ?
1) L 2) C 3) D 4) M
2) 10.345 या संख्येतील 4 ची
स्थानिक किंमत किती ?
1) 0.004 2) 40 3) 400 4) 0.04
3) _ 2575 - _836 = 28739, तर _ च्या
जागी कोणता अंक येईल ?
1) 2 2) 3 3) 5 4) 6
4) कोनाच्या दोन्ही भुजा
वाढविल्यास कोनाच्या मापात काय फरक पडतो ?
1) कोनाचे माप वाढते 2) कोनाचे माप कमी होते
3) कोनाचे माप तेवढेच राहते 4) कोनाचे माप दुप्पट होते
5) +
= ?
1) 2)
3) 12 4)
6) ‘आठ
अब्ज ऐंशी हजार आठशे आठ’ ही संख्या अंकात कशी लिहाल ?
1) 8,08,00,808 2) 8,00,80,808
3)
80,00,80,808 4)
8,00,00,80,808
7) वर्तुळाची त्रिज्या
2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची
असेल ?
1) 6 2) 5 3)
3 4) 5.5
8) 1 ते 100 या संख्यांमध्ये
किती संयुक्त संख्या आहेत ?
1) 75 2) 25 3)
24 4) 74
9) दोन परस्परांना लंब
असणार्या रेषा कोणत्या प्रकारचा कोण करतात ?
1) विशालकोन 2) काटकोन 3)
लघुकोन 4) प्रविशालकोन
10) 32996,
32296,
229997,
39096 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसर्या संख्येची बेरीज
किती ?
1) 269093 2) 72292 3) 269293 4)
262993
11) 88 मी परीघ असलेल्या
वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेर्या मारते तर एका आठवड्यात ती किती किमी चालते
?
1) 3080 किमी 2) 380 किमी 3) 3.08 कमी 4) 3.8
किमी
12) मोठ्यात मोठी 5 अंकी
संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान
संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?
1) 1,00,098 2) 99,998 3) 99,999 4) 1,00,198
13) प्रदीपने साडेबावीस
हजार रुपयांना घेतलेला मोबाइल एकोणवीस हजार आठशे सत्तर रुपयांना विकला,
या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला ?
1) 2880 रु 2) 2600 रु 3) 2630 रु 4)
3000 रु
14) +
+
+
+
+
= ?
1) 2)
3)
4) 8
15) स्वरदाने द.सा.द.शे.
8 दराने एका बँकेत 25,000 रु 6 वर्षांसाठी ठेवले,
तर 6 वर्षांनंतर तिला किती रुपये व्याज मिळेल ?
1) 12,000 2) 2000 3)
1500 4) 1200
16) ,
,
,
या संख्या चढत्या क्रमाने लिहल्यास पहिल्या
व तिसर्या संख्येची बेरीज किती ?
1) 1 2) 3)
4)
17) ‘सत्तर
लाख सात’
ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्या मध्ये एक शून्य कमी लिहिला तर तिने
लिहलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे ?
1) 77,00,014
ने जास्त 2) 77,00,014
ने कमी
3) 63,00,000
ने जास्त 4) 63,00,000 ने
कमी
18) खालीलपैकी सर्वात
मोठा अपूर्णांक कोणता ?
1) 2)
3)
4)
19) x y y z + x
z z y = y y y y,
तर x, y, z च्या
जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ?
1) 4, 3, 0 2) 2, 4, 2 3)
3, 6, 2 4) 4, 8, 0
20) बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत व
चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल ?
1) 180 रु नफा 2) 190 रु तोटा 3) 190
रुपये नफा 4) 170 रु तोटा
21) खालीलपैकी कोणती आकृती या
अपूर्णांकाचे सममूल्य दाखवते ?
22) गटात न बसणारा पर्याय
शोधा
1) 7 x 7 ÷ 7 x 5 = 35 2) 12 – 3 – 5 +
10 = 14
3) 5 x 3 + 4 x 2 = 70 4) 10 – 2 x 3 + 5 = 9
23) रोशनी सकाळी साडे अकराला अभ्यासाला
बसली व पावणे दोन वाजता उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला ?
1) 3 तास 70 मिनिटे 2) 2 तास 45 मिनिटे
3) 2 तास 15 मिनिटे 4) 2 तास 30 मिनिटे
24) सर्वात मोठी तीन अंकी सम
संख्या व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या यातील फरक किती ?
1) 900 2)
901 3) 902 4) 903
25) जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120
विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200
विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात ?
1) 172 2)
138 3) 182 4) 192
26) पावणे सात हजारातून किती
वजा केल्यास मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या येईल ?
1) 6751 2)
6651 3) 7026 4) 7126
27) ज्युलीने 12 मे ते 26 जून या कलावधीत
मनीबँकमध्ये रोज 10 रुपये प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले
100 रु व बाबांनी केकसाठी दिलेले 240 रु घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता
निधीसाठी दिली. तर तिने एकूण किती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली ?
1) 790 रु 2)
350 रु 3) 800 रु 4) 780 रु
28) जीवनने 50 रु, 100 रु व 500 रु च्या प्रत्येकी दोन नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रु
च्या नोटा मागितल्या. तर त्याला 20 रु च्या किती नोटा परत मिळतील ?
1) 60 2)
65 3) 55 4) 63
29) अशी संख्या शोधा की त्या संख्येला
त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27 च्या सर्व विभाजकाचा गुणाकार असेल.
1) 529 2)
27 3) 9 4) 18
30) सोडवा : 27 ÷ 3 + 6 x 5 = ?
1) 75 2) 15 3)
39 4)
31) धनेशने पॅंटसाठी सव्वा मीटर व शर्टसाठी
पावणे दोन मीटर कापड घेतले तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतले ?
1) तीन 2)
सव्वा तीन 3) अडीच 4) पावणे चार
32) सोहमचा जन्म 15 जून 2011 ला गुरुवारी
झाला तर त्याच्या पाचव्या वाढदिवसाला कोणता वार असेल ?
1) मंगळवार 2) गुरुवार 3) बुधवार 4) शुक्रवार
33)
आकृतीतील रेखांकीत भागाची शेकडेवारी किती ?
1) 12.5% 2)
25% 3) 33% 4) 18.5%
34) एका समभूज त्रिकोणाची बाजू 10 सेमी
आहे. या त्रिकोणाच्या परिमितीइतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती ?
1) 30 सेमी 2) 8 सेमी 3)
7.5 सेमी 4) 10 सेमी
प्रश्न 35 व 36 साठी सूचना : पुढील
चित्ररूप माहितीच्या आधारे उत्तरे लिहा
35) कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल
खेळणार्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत ?
(1) 50 (2)
3 (3) 150 (4) 5
36) क्रिकेट व बास्केटबॉल खेळणार्या
विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणार्या विद्यार्थ्यांच्या
संख्येपेक्षा कितीने कमी आहे ?
1) 75 2) 50 3)
25 4) 150
37) इष्टिकाचितीच्या कडांची संख्या ही
तिच्या पृष्ठांच्या संख्येच्या किती पट असते ?
1) दुप्पट 2)
तिप्पट 3) निमपट 4) चौपट
38) पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य
आहे. त्यापैकी 20% पोती ज्वारीची, 35% पोती गव्हाची, 15% पोती तुरीची व उरलेली पोती सोयाबीनची आहेत. तर एकूण किती पोती
सोयाबीनची आहेत ?
1) 60 2)
120 3) 105 4) 90
39) 144 चौ. मी. क्षेत्रफळाच्या एका
चौरसाकृती मैदानाला फक्त दोन बाजूंनी तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती
लांबीची तर लागेल ?
1) 48 मी 2)
14.4 मी 3) 72 मी 4) 24 मी
40) मे महिन्यात महाबळेश्वरला सव्वा दोन
लाख पर्यटकांनी भेट दिली तर अजिंठा वेरूळ लेण्यांना पाऊण लाख पर्यटकांनी भेट दिली.
तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यांपेक्षा किती जास्त पर्यटकांनी भेट दिली ?
1) 75,000 2) 1,25,000 3) 3,00,000 4) 1,50,000
41) 552 मिनिटे = __तास __मिनिटे
1) 9, 52 2) 5, 52 3) 9, 12 4) 6, 12
42) 2400 कागद म्हणजे किती रिम कागद ?
1) 100 2)
75 3) 50 4) 5
43) रामूने 35 रु लिटर दराने 45 लिटर दूध
खरेदी केले व सर्व दूध 315 रु नफा घेऊन विकले तर दूधाचा प्रतीलिटर विक्रीचा दर
किती ?
1) 37 रु 2)
38 रु 3) 42 रु 4) 44 रु
44) 15 मी 50 सेमी लांबीच्या तारेचे 10
समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती ?
1) 155 सेमी 2) 155 मी 3) 150
सेमी 4) 1.55 सेमी
45) 3250 रु ला घेतलेली सायकल आकाशने एक
वर्षानंतर 2375 रु ला विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला ?
1) 775 रु नफा 2) 875 रु नफा 3) 775
रु तोटा 4) 875 रु तोटा
46) भाजक = 105, भागाकार = 4250, बाकी = 75,
तर भाज्य = किती ?
1) 446250 2)
446325 3) 446225 4) 446625
47) 25 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दीड
मीटर कापड 52 रु प्रती मीटर दराने खरेदी केल्यास किती खर्च येईल ?
1) 1950 2)
1850 3) 2050 4) 2150
48) सोडवा :
1) 2)
3)
4)
49) नागपूरहून पहाटे 4:10 वाजता सुटणारी
केरळ एक्सप्रेस दुसर्या दिवशी 14:15 ला तिरूअनंतपुरम येथे पोहोचते, तर नागपूर ते तिरूअनंतपुरम या प्रवासासाठी लागणारा वेळ किती ?
1) 34 तास 5 मिनिट 2) 24 तास 5 मिनिट
3) 10 तास 5 मिनिट 4) 32 तास 5 मिनिट
50) सरस्वती विद्यालयात 500 मिली च्या 24
पिशव्या दूध आणले, ते दूध 60 विद्यार्थ्यांना
सारख्या प्रमाणात वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिली दूध मिळाले ?
1) 250 मिली 2) 150 मिली 3) 200
मिली 4)
120 मिली
2020
सेक्शन 2 : गणित
1) सतरा लाख + सतराशे + सतरा हजार + सतरा =
किती ?
(1) सतरा लाख सतरा हजार सातशे सतरा 2) सतरा लाख अठरा हजार सातशे
सतरा
(3) सतरा लाख सतरा हजार आठशे सतरा 4) सतरा लाख अठरा हजार आठशे सतरा
2) द.सा.द.शे. 4 दराने 5000 रुपयाचे सरळव्याज
मुद्दलाच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
(1) 50 (2)
25 (3) 5 (4) 20
3) 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी
मोठ्यात मोठ्या सम संख्येने गुणले असता गुणाकार किती येईल ?
(1) 98,99,901 (2) 98,99,802 (3) 97,99,804 (4) 97,99,902
4) बालिका दिंनानंतर किती दिवसांनी
प्रजासत्ताक दिन येतो ?
(1) 23 (2)
24 (3) 22 (4) 26
5) नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या
वाढदिवसाला 10000 रु द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेवले तर तिच्या सहाव्या वाढदिवसाला
तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल ?
(1) 14000 (2)
14800 (3) 15000 (4) 15800
6) 70 हेक्टोग्रॅम = किती ग्रॅम ?
(1) 7 (2)
70 (3) 700 (4) 7000
7) सहलीसाठी 39 विद्यार्थ्यानी प्रत्येकी
252 रु जमा केले. त्यामध्ये 500 रु च्या 40 नोटा व उरलेल्या 5 रु च्या नोटा होत्या, तर त्यात 5 रु च्या किती नोटा होत्या ?
(1) 95 (2)
25 (3)
45 (4) 85
8) सुनंदाताईंनी डाळिंबाच्या विक्रीतून
17000 रु नफा मिळवला. त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी 7000 रु, औषध फवारणीसाठी 5000 रु, मजुरांसाठी 3000 रु व
वाहतुकीसाठी 1000 रु खर्च केला होता तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती ?
(1) 23000 रु (2) 33000 रु (3)
32000 रु (4) 16000 रु
9) 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या एका
बाजूएवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेमी असल्यास आयताची लांबी किती
असेल ?
(1) 4 सेमी (2) 6 सेमी (3) 7 सेमी (4)
8 सेमी
10) सभागृहातील एका ओळीत XXVII पासून ते LXVI पर्यंत आसनक्रमांक आहेत तर त्या ओळीत
किती आसने आहेत ?
(1) 38 (2)
39 (3) 40 (4) 48
11) एका संख्येला 15 ने भागले असता निःशेष
भाग जाऊन भागाकार 12 येतो त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती येईल ?
(1) 180 (2)
4 (3) 6 (4) 14
12) 318.43 या संख्येतील शतक स्थानचा अंक व
शतांश स्थानाचा अंक यांच्या स्थानिक किंमतीत कितीचा फरक आहे ?
(1) 30003 (2)
3003 (3) 300.03 (4) 299.97
13) ऋतुजाने 35 रु प्रती किलो दराने 6 किलो
गहू, 32 रु प्रती किलो दराने 3 किलो ज्वारी व 280 रु
प्रती किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली
तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल ?
(1) 25 (2)
29 (3) 23 (4) 34
14) कोल्हापूर-सोलापूर बस 25 प्रवाशांना घेऊन
कोल्हापूरहून निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. सातार्यात
16 प्रवासी चढले व 9 उतरले. इंदापूरला काही प्रवासी उतरल्यावर सोलापूरला बसमध्ये 15
प्रवासी उरले होते. तर इंदापूरला किती प्रवासी उतरले ?
(1) 25 (2) 29 (3)
23 (4) 34
15) ### x @@@ = 110889 तर # व @ च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ?
(1) 3, 3 (2) 1, 9 (3) 0, 9 (4) 4, 5
16) 100 चा शेकडा 5 हा 10 च्या शेकडा दहा
पेक्षा कितीने लहन किंवा मोठा आहे ?
(1) 4 ने मोठा (2) 4 ने लहान (3) 5
ने मोठा (4) 5 ने लहान
17) क्रमाने येणारा आकृतीबंध कोणता ?
18) रोहितला दरमहा 18000 रु पगार मिळतो
त्यातील 1/9 भाग पेट्रोलवर, 4/9 भाग घरखर्चावर, व 2/9 भाग बँकेच्या हप्त्यावर खर्च करून उरलेली रक्कम तो शिल्लक ठेवतो.
तर तो किती रक्कम शिल्लक ठेवतो ?
(1) 2000 रु (2) 8000 रु (3)
4400 रु (4) 9000 रु
19) नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले
15 दिवस अडीच लिटर दूध व उरलेले दिवस दीड लिटर दूध 52 रु प्रती लिटर या दराने विकत
घेतले तर तिचे त्या महिन्यात दूधासाठी किती पैसे खर्च केले ?
(1) 1320 रु (2) 3120 रु (3)
3140 रु (4) 2350 रु
प्रश्न क्र. 20 व 21 साठी सूचना : खालील
चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा
रोपवाटिकेत असलेली रोपे |
रोपांची संख्या |
गुलाब |
§ § § |
जास्वंद |
§ § § § |
चाफा |
§ § |
मोगरा |
§ § |
प्रमाण : 1 § = 10 रोपे
20) जास्वंद, चाफा व
मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत ?
(1) 70 (2)
80 (3) 90 (4) 110
21) गुलाब व मोगर्याच्या रोपांची संख्या
जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे ?
(1) 20 (2)
10 (3) 50 (4) 30
22) 25 ची 1/5 पट + 100 ची ½ पट = # ची 1/5 पट, तर # च्या ठिकाणी येणारी संख्या लिहा
(1) 275 (2)
55 (3) 125 (4) 250
23)
आकृतीतील रेखांकीत भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवितो ?
(1) (2)
(3) 0.25 (4) 4.16
24) आदित्यचा जन्म 14
जुलै 2001 ला शनिवारी झाला. तर त्याच्या आठव्या वाढदिवशी कोणता वार होता ?
(1) शनिवार (2) सोमवार (3) मंगळवार (4)
बुधवार
25) खाली दिलेल्या
पदावलीत $ च्या ठिकाणी कोणती योग्य
चिन्हे येतील ?
6 $ 2 $ 10 $ 5 $ 5 = 48
(1) ÷, -, x, + (2) x, +, ÷, - (3) ÷, x, +, - (4) ÷, +, x, -
26) 58279 या संख्येमधील
दशहजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी
किमतीचा गुणाकार किती ?
(1) 1000000 (2) 1000 (3)
10000 (4) 100000
27) जोसेफने 1 रिम
कागदांपैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले. तर त्याच्या जवळ किती कागद शिल्लक
राहिले ?
(1) 24 (2) 0 (3) 12 (4) 480
28) 133 च्या सर्व
विभाजकांची बेरीज किती ?
(1) 134 (2) 145 (3) 160 (4) 151
29) साडेदहा मीटर व पाऊण
मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास साडे पाच मीटर उरतील ?
(1) पावणे पाच (2) सव्वा पाच (3) सव्वा चार (4)
पावणे सहा
30) एका कंपनीत 95
कामगार समान पगारावर काम करतात. त्यांच्या पगारासाठी कंपनीला दरमहा 807500 रु
लागतात. तर प्रत्येक कामगाराला किती रु पगार मिळतो ?
(1) 9500 (2) 9400 (3) 8400 (4)
8500
31) खालीलपैकी कोणत्या
वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात ?
(1) वीट (2) कंपासपेटी (3) घनाकृती ठोकळा (4)
काडीपेटी
32) खालील आकृती दुमडून
घन बनविल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही ?
(1) निळा (2) नारंगी (3) पिवळा (4)
हिरवा
33) खालील
अपूर्णांकाच्या जोडीत, [_]
च्या ठिकाणी <, >, = यापैकी
कोणती चिन्हे योग्य ठरतील ? [_]
[_]
(1) <, = (2) <, < (3) >, = (4)
<, >
34) सोनालीने एक घर 37,50,000
रूपायास विकत घेतले, त्या घरासाठी तिने 7,25,000
रुपयांचे फर्निचर बनवले. ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला
सव्वा पाच लाख रु नफा होईल ?
(1) 5,00,000 (2) 50,00,000 (3) 44,75,000 (4) 49,50,000
35) B केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास 6 सेमी हा A
केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेघ AB किती ?
(1) 3 सेमी (2) 6 सेमी (3) 1.5 सेमी (4)
9 सेमी
36) 1 ते 50 पर्यंतच्या
विषम मूळ संख्यांची बेरीज किती ?
(1) 328 (2) 326 (3) 303 (4)
273
37) मध्यान्होत्तर 11
वाजता गणेश गाडीत बसला तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला ?
(1) दुपारी 11 वाजता (2) 21 वाजता (3) रात्री 11 वाजता (4)
23 वाजता
38) एका शाळेतील 2300
विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात. तर किती
विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत ?
(1) 1610 (2) 690 (3)
590 (4) 1410
39) 0, 2, 3, 9, 7 हे अंक एकदाच वापरुन तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या ही हेच अंक
एकदाच वापरुन तयार होणार्या लहनात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?
(1) 117699 (2) 94941 (3)
76923 (4) 76941
40) पुढीलपैकी कोणत्या संख्येस
5, 6, 7 ने भागल्यास बाकी 4 उरेल
?
(1) 42 (2) 214 (3) 206 (4) 210
41) खालील आकृतीतील कोणांची
संख्या मोजा
(1) 10 (2) 9 (3)
8 (4) 7
42) विश्वासने 10 रु ला एक
वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब असल्यामुळे उरलेल्या वह्या
त्याने 720 रु ला विकल्या. या व्यवहारात त्याला प्रत्येक वहिमागे किती रूपयांचा फायदा
झाला ?
(1) 3 (2) 2 (3) 115 (4) 2.5
43) 7 * 5 – 2 * 3 + 4 =
?
(1) 21 (2) 67 (3) 33 (4) 102
44) एका पाण्याच्या टाकीची
धारकता 140 लिटर आहे. त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरला आहे. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी
आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे ?
(1) 60 (2) 70 (3) 80 (4) 90
45) श्रीकांत ताशी 85 किमी
वेगाने गाडी चालवतो. त्याच वेगाने 595 किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी
चालवावी लागेल ?
(1) 7 (2) 6 (3) 8 (4) 5
46) दीपाने 2000 रु 4 वर्षासाठी
द.सा.द.शे. 8 दराने ठेवले आणि रूपाने 4000 रु 4 वर्षासाठी द.सा.द.शे. 4 दराने ठेवले.
तर चार वर्षानंतर दोघींना मिळणार्या रकमांमधील संबंध काय असेल ?
(1) दीपाला रूपापेक्षा जास्त (2) दीपाला रूपापेक्षा कमी
(3) दोघींना समान (4) रूपाला दीपापेक्षा जास्त
47) खालील आकृतीत अनुक्रमे
किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत ?
(1) 4, 2 (2) 5, 5 (3) 5, 6 (4) 4,
4
48) 32976, 23976, 32796, 23796 या संख्या
चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती ?
(1) 56772 (2) 56592 (3) 56952 (4) 56772
49) मध्ये
किती वेळा मिसळले असता उत्तर 1 येईल ?
(1) 7 (2) 6 (3) 49 (4) 14
50) साकोली गावाची लोकसंख्या
154389 आहे. त्यापैकी 108457 लोकांकडे मोबाइल फोन आहेत. तर किती लोकांकडे मोबाइल फोन
नाहीत ?
(1) 45,832 (2) 45,932 (3) 45, 942 (4) 55,942
यणणमरयक्ष
उत्तर द्याहटवा